Wednesday, March 21, 2007

सप्रेम नमस्कार


सप्रेम नमस्कार,

लिहीण्यास कारण की समस्त मैत्रपरिवाराच्या आग्रहवजा सूचना, हेकटपणा, दडपण, धमक्या ह्या गोष्टींना बळी पडून आम्ही आमचे नवीन संकेतपृष्ठ आजपासून सहर्ष सादर करीत आहोत.

जगातील कोणत्याही विषयावरील आमची मते येथे मांडू शकू ही आनंदाची बाब आहे.

कारण ब्लॉग ही आपल्या हक्काची मालमत्ता असल्यामुळे, आम्हाला जे वाटते ते बोलायला आम्ही मोकळे आणि समर्थ आहोत.

आपण आमच्या ह्या ब्लॉगवर नियमित येणे करावे ही विनंती.

आपला,
(आभारी) धोंडोपंत