लोकहो,
कळविण्यास आनंद होतो की, तुमच्या सर्वांच्या आवडत्या या "धोंडोपंत उवाच" ब्लॉगाला " ब्लॉग माझा" या "स्टार माझा" वाहिनीने घेतलेल्या स्पर्धेत पारितोषिक मिळाले आहे.
काल रात्री ८.०० वाजता "ब्लॉग माझा" या कार्यक्रमात त्याची घोषणा करण्यात आली, असे आम्ही ऐकून आहोत. त्यावेळेस आम्ही ज्योतिषविषयक कन्सलटेशनमध्ये व्यग्र असल्याने आम्ही तो कार्यक्रम पाहू शकलो नाही. पण अनेकांचे अभिनंदनाचे फोन आले. सर्वप्रथम मृदुलाताई तांबे यांचा फोन आला तेव्हा आम्हाला ही बातमी कळली. त्यानंतर लगेच श्री. अमोल केळकर यांचा फोन आला आणि मग फोनवर फोन येत होते. काही जणांनी गुगल निरोपकावर संपर्क साधला, काहींनी ईपत्र पाठवले.
आमच्या लेखनावर प्रेम करणार्या सर्व चाहत्यांना, तसेच स्टार माझा चे संचालक श्री. राजीव खांडेकर, श्री. प्रसन्न जोशी आणि या स्पर्धेचे अत्यंत ज्ञानी आणि व्यासंगी परीक्षक, संगणक क्षेत्रातील अग्रणी, अष्टपैलू व्यक्तिमत्व श्री. अच्युतराव गोडबोले यांना आमचा दंडवत आणि धन्यवाद!!!
लोकहो,
आम्ही गेले दीड वर्ष या शारदेच्या यज्ञात ज्या समिधा अर्पण केल्या, ज्योतिषशास्त्राचा समाजाला उपयोग व्हावा म्हणून जे रोप लावले, त्या "इवल्याशा रोपाचा वेलू गगनावरी गेला" याचा आनंद आहे. या ब्लॉगाला तुमच्यासारख्या वाचकांचे प्रेम लाभले, अनेक जण या ब्लॉगाच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचले, जगातल्या बहुतेक सर्व भागात राहणार्या अनेकांशी स्नेह निर्माण झाला, अनेकांना जे मार्गदर्शन हवे होते ते मिळाले.
"याचसाठी केला, होता अट्टाहास..... शेवटला दिस, गोड व्हावा"
एखाद्या अज्ञात शक्तीकडून प्रेरणा आल्यासारखे या ब्लॉगावरील सर्व लिहून झाले आहे. कुठल्याही नोट्स, कुठलेही पॉईंट्स, कुठलीही कात्रणे न काढता, जे जे त्यावेळेस "तो" सुचवायचा, ते ते आम्ही टंकित केले आहे. त्यामुळे या लेखनात जिवंतपणा आहे, याचा अनुभव तुम्ही घेतला आहेच.
"तुका म्हणे माझे, हेचि भांडवल..... बोलविले बोल, पांडुरंगे"
हे सर्व "त्याच्या" कृपेनेच झाले आहे त्यामुळे या ब्लॉगाला मिळालेली वाचकांची दाद, यश आणि पारितोषिक याबद्दल सर्वांना दंडवत घालतो आणि हे सर्व "त्यालाच" अर्पण करून आम्ही मोकळे होतो.
आम्ही तेणे सुखी। म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी॥
तुमचे येरं वित्त धन। ते मज मृत्तिकेसमान॥
कंठी मिरवा तुळशी। व्रत करा एकादशी॥
म्हणवा हरिचे दास। तुका म्हणे मज ही आस॥
आपला,
(नामानिराळा) धोंडोपंत
Sunday, October 12, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
17 प्रतिसाद:
Heartiest congratulations! You deserved this award!
अभिनदंन,तुमच्या ब्लाँगला पारीतोषिक मिळाले.असेच पुढे लिखान सुरु ठेवावे.
विवेक तवटे.
पंत,पारितोषिकाबद्दल अभिनंदन !!! आपल्या ब्लॊगची भरभराट हाच आमचा आनंद आहे. तेव्हा लिहित राहा !!! आपल्या लेखनास आमच्या मन:पूर्वक शुभेच्छा !!!
पंत,
हार्दिक अभिनंदन. आपली लेखनशैली ओघवती तर आहेच, पण फलज्योतिषाकडे पाहण्याचा योग्य दृष्टिकोण देण्याच्या कार्यामुळे त्याची उपयुक्तता जास्त आहे. "स्टार माझा" वाहिनीने याची योग्य दखल घेतली ही आनंदाची बाब आहे.
तुमचा ब्लॉग आम्हा वाचकांना असंच मंत्रमुग्ध करित राहो ही ईश्वराजवळ प्रार्थना.
आपला,
(शुभेच्छुक) प्रशांत
अभिनंदन !!! आपण असेच लेखन करत राहाल ही ईश्वरचरणी प्रार्थना ...
स्वप्नील काळे
धोंडोपंत,
हार्दिक अभिनंदन! असेच यश तुम्हाला या पुढेही मिळत राहो आणि आपल्या मनोकामना पूर्ण होवोत या शुभेच्छांसह,
आपला,
अनामिक
पंत, आपले अभिनंदन
अमोल
Heartiest Congratulations!
धोंडोपंत, आपले मन:पुर्वक आभिनंदन..
आपल्या लिखाणाची अनोखी पद्धत,त्यातुन मिळणारी माहिती, त्यातली मार्मिकता,त्यातुन दिसणारा भारतीय संस्क्रुतीबद्दलचा आदर, या सगळ्याचे योग्य पारितोषिक आपणास मिळाले असे मला वाटते. आपल्या हातुन असेच सुंदर लिखाण व्ह्यावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना..
आदित्य
Pant heartiest congratulatios.
We are glad that you got the award.
we are praying for god that you will continue to guide us in our difficult times.
congratulations!!!!!!!!!a very deserving award.....
मित्रवार्य,धोंडोपंत, मिसळपाव वर आम्हाला ही आनंदाची बातमी मिळाली. पंत आम्ही "धोंडोपंतांच्या ब्लॊगचे सौंदर्य आवडणारा" असे मिपावर सुचक वक्तव्य केले होते .त्यातच हे भाकित दडले होते. असो आपल्या कार्याला शुभेच्छा
Pantkaka, a lot of congratulations!!!!!!!!!a very deserving award.....
Sorry for late wishing you, due to the interupted internet service.
Once again congrats and waiting to more listen from you.
Maneesh Pathak.
मित्रहो,
तुम्हां सर्वांना आमचा दंडवत आणि धन्यवाद. आम्ही आमच्या परीने शास्त्राची माहीती तुम्हांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करू या आश्वासनासह..
आपला,
(आभारी) धोंडोपंत
Dear Sh. Dhondopant,
Congratulations!!!!!!!!!!!
Best wishes for your future projects.
From
Govind Kulkarni and family from Goa.
Dhondopant
Is there any link on internet where we can read this news ?
Apla shubhachintak mitra
Prasanna
Dear Shri Dhondopant,
Congratulations! Keep it up!
Thanks for all you are doing.
May i request you to write about saadesati to Leo star? Did not get anything to read about Leo & Saadesati to Leo.
Thanks!
Mangesh
Post a Comment