Monday, May 18, 2009

योगायोग ?


लोकहो,
आज दहा दिवसांनी आम्ही हा लेख लिहितोय. कार्यबाहुल्ल्यामुळे लेखन होऊ शकलं नाही. आठवडाभर काही लिहिले नाही की वाचकांचे फोन आणि गुगलनिरोपकावर निरोप येणे सुरू होते. तसे ते झालेही. मग ईपत्रे यायला लागली. आज सकाळी आमचे चाकण, जिल्हा पुणे येथील जातक श्री. जावेदभाई यांचे हे पत्र आले आणि ठरवले की आज लिहायचेच.

from javved inamdar <>
hide details 10:55 (12 hours ago)

to

Dhondopant Apte<>

date 18 May 2009 10:55

subject
NAMASKAR

mailed-by gmail.com

Namaskar Pant ,

Maghil 10 Diwsapasun kahi Lekh Alle nahite.

Thanks & Regards,
Javved Inamdar
तर लोकहो,

प्रेमविवाहातून घटस्फोटाकडे वाटचाल केलेल्या तरूणाची ही कुंडली आहे. ज्या व्यक्तीवर या तरूणाने प्रेम करून १२ वर्षे संसार केला, ती त्यांची पत्नी तिच्या कार्यालयातील एका अविवाहित आणि तिच्याहून वयाने अंदाजे पाच सहा वर्षाने लहान असलेल्या तरूणाच्या प्रेमात पडली.

मग त्या दोघांच्या गाठीभेठी, त्यांच्या फोनवरील लडीवाळ संभाषणाचे ध्वनीमुद्रित पुरावे, मग त्यातून मनस्ताप, तिच्या आईवडीलांना झालेला त्रास, या मुलाच्या घरात झालेला हलकल्लोळ, तरीही तिने त्या मुलाशी असलेले संबंध तोडण्यास दिलेला नकार, त्यातून घटस्फोटाची केस, मग रितसर कायदेशीर विभक्तता, मध्ये दोन वर्षे प्रचंड एकाकी जीवन, मदिरेचा आसरा, त्यानंतर पुन्हा आयुष्यात आलेली नवी जोडिदारीण, तिच्या बरोबर फुललेले प्रेमसंबंध आणि मग मागच्या महिन्यात म्हणजे एप्रिल २००९ साली द्वितीय विवाह अशा अनेक वळणांची साक्षीदार असलेली ही कुंडली आहे.

सदर कुंडलीत काय योग आहेत हे अभ्यासण्यासाठी ही घेतली आहे. महादशांचा तक्ता, जन्मतारिख समजू नये म्हणून प्रसिद्ध केलेला नाही. केवळ चालू दशांचा उल्लेख केलेला आहे. जेणेकरून अभ्यासकांना कार्येशत्वासाठी काही अडचण येणार नाही. असो.

ही कुंडली भाव-नवमांश पद्धतीने सोडविलेली आहे. त्यामुळे भावचलित कुंडली पाहण्याची आवश्यकता नाही.
मागे एका वाचकांनी प्रश्न विचारला होता की भावचलित का नाही घेतली? तर त्याचे उत्तर हे आहे. या पद्धतीत साध्या जन्मलग्नकुंडलीवरून केपी इतके अचूकपणे भविष्यकथन करता येतं. अर्थात अयनांश कृष्णमूर्ती पद्धतीचेच हवेत.

आमचे विद्वान, गुरूतुल्य ज्योतिर्विद स्नेही श्री. विजय हजारी ( दूरदर्शनवर "मी मराठी" या वाहिनीवर "विधिलिखित" या लोकप्रिय ज्योतिषविषयक कार्यक्रमात आपण ज्यांना रोज पहात असाल ते श्री. विजय हजारी) यांनी ही भाव- नवमांश पद्धती संशोधित करून ज्योतिषशास्त्रात मोलाची भर घातली आणि फलादेशात सुलभता आणली त्याबद्दल श्री. विजय हजारी यांचे आभार मानावे तेवढे थोडेच.
आम्हाला भाव नवमांश पद्धत ही त्या पद्धतीच्या जनकाकडून म्हणजे स्वतः श्री. विजय हजारी यांच्याकडूनच शिकण्याचे भाग्य लाभले.
श्री. हजारी यांचा आणि आमचा स्नेह आणि ऋणानुबंध आहे याचे कारण त्यांचे आणि आमचे रुलिंग प्लॅनेट्स समान आहेत. ज्या व्यक्तींचे आणि आपले रुलिंग प्लॅनेट्स समान असतात त्या व्यक्तींचे आपल्याशी चांगले पटते. असो.

वरिल कुंडलीला ०७/१०/१९८८ ते ०७/१०/१९९५ या काळात मंगळ महादशा होती.

तसेच पुढील राहू महादशा सध्या म्हणजे ०७/१०/१९९५ ते ०७/१०/२०१३ पर्यंत आहे.

वरील सर्व चक्रावणारा घटनाक्रम हा राहू महादशेत घडलेला असल्याने राहूचे कार्येशत्व आधी पाहू. राहू त्याच्या महादशेत कशी धूळधाण उडवतो हे ज्यांना त्याची महादशा येऊन गेलेय त्यांच्याकडून ऐकावे म्हणजे राहूचे कारकत्व काय ते समजेल. असो.

राहू वरिल कुंडलीत लग्नस्थानी आहे. राहू मंगळाच्या नक्षत्रात मंगळ व्ययात असून चतुर्थेश व लाभेश आहे. राहू मकरेत असून शनी चतुर्थात लग्नेश आणि धनेश. शनी रविच्या नक्षत्रात रवि चतुर्थात व अष्टमेश. शनीची दृष्टी सहा, दहा आणि एक या स्थानी.

वरील कार्येशत्व पाहिल्यावर वैवाहिक सौख्याचे काय तीन तेरा या महादशेत वाजू शकतील याची कल्पना सुज्ञ अभ्यासकांना आली असेल.
पारंपारिक ज्योतिषशास्त्रानुसार पहायचे झाल्यास, सप्तमेश चंद्र व्ययात मंगळयुक्त आहे. अशा योगात वैवाहिक सौख्य बिघडतेच. व्ययातला मंगळ हे घटस्फोटाचे फार मोठे कारण आहे असे आमचे मत आहे. या मंगळाची आठवी दृष्टी सप्तमावर येते आणि जर सप्तमेशही वाईट स्थितीत असेल तर वैवाहिक सौख्यात बिब्बा कालवला जातोच जातो. तर हे झाले पारंपारिक ज्योतिषशास्त्रानुसार वैवाहिक सौख्य बिघडवणार्‍या योगाचे स्पष्टीकरण. असो.

तर, या तरूणाचा पहिला विवाह हा मंगळ महादशेत, चंद्राच्या अंतर्दशेत झाला. यांच्याच इमारतीत राहणार्‍या एका मुलीच्या ऑफिसात काम करणार्‍या तिच्या मैत्रिणीला याने पटवली आणि त्यांचा प्रेमविवाह झाला. नवमांश सप्तमेश गुरू हा पंचमस्थानाचा कार्येश आहे त्यामुळे प्रेमविवाह झाला. प्रेमविवाह होता, मियाँ बिबी राजी होते त्यामुळे अर्थात पत्रिका पाहण्याचा काही प्रश्न नव्हता. दोघेही एकाच जातीतले त्यामुळे घरातून विरोध होण्याचा काही प्रश्न नव्हता.
काही वर्षे संसार झाला. पुढे राहू महादशेत बुधाची अंतर्दशा सुरू झाली आणि तिचे रंग तिने दाखवायला सुरूवात केली. तो पर्यंत तिने पहिली नोकरी बदलून एका मोठ्या ट्रॅव्हल आणि टुरिझम कंपनीत नोकरी धरली होती. त्या तिथे तिचे त्याच कंपनीत काम करणार्‍या, तिच्याहून वयाने लहान असलेल्या एका अशिक्षित, सडकछाप आणि छपरी मुलावर प्रेम बसले. दोघांच्या प्रेमक्रीडा सुरू झाल्या. त्याची कुणकुण घरी लागली. मग पुढचे सर्व वादळ, कोर्टकचेर्‍या आणि घटस्फोट.

बुधाचे कुंडलीतले कार्येशत्व पहा. बुध चतुर्थात असून षष्ठेश आणि भाग्येश. बुध केतूच्या नक्षत्रात केतू सप्तमात. केतु पुन्हा बुधाच्याच नक्षत्रात आणि चंद्राच्या राशीत. चंद्र व्ययात व सप्तमेश. चंद्र शुक्राच्या नक्षत्रात शुक्र धनात, पंचमेश आणि दशमेश. चंद्राची दृष्टी षष्ठावर. अर्थात या अंतर्दशेत घटस्फोट अटळ होता.

गेल्या वर्षी जुलै महिन्यात हा तरूण आम्हाला हिंदु कॉलनीत जवळजवळ चार वर्षांनी भेटला आणि ही सर्व हकिकत त्याने कथन केली. दुसरा विवाह कधी होईल? हा त्याचा प्रश्न होता. आम्ही त्याला दुसर्‍या दिवशी फोन करायला सांगितले. त्याने प्रश्न विचारला तेव्हा राहू महादशेत शुक्राची अंतर्दशा सुरू होती. अजूनही तीच सुरू आहे.

भाव नवमांश पद्धतीनुसार, द्वितीय विवाह पाहतांना नवमांश धनेशाचा विचार करावा लागतो. या कुंडलीत तो शुक्रच आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे शुक्र धनात पंचमेश आणि दशमेश आहे. शुक्र गुरूच्या नक्षत्रात, गुरू लाभात व्ययेश आणि तृतीयेश. शुक्राचा उपनक्षत्रस्वामी चंद्रच आहे म्हणजे या तरूणाचा दुसरा विवाह शुक्र अंतर्दशेत व्हायला काही हरकत नाही. तसेच शुक्र पंचमाचा कार्येश आहे तसेच नवमांश पंचमेश शनी हा धनस्थानाचा (दुसरा विवाह) कार्येश आहे. त्यामुळे दुसरा विवाहसुद्धा प्रेमविवाहच असेल.

फेब्रुवारी महिन्यात हा तरूण एका मुलीची पत्रिका घेऊन आला. खरे तर त्यांचे प्रेमपुष्प आधीच फुलले होते आणि त्याचा दरवळही पसरलेला होता. त्यामुळे तो अफाट आनंदात होता. पण पहिल्या वेळेस पत्रिका पाहिली नाही आता पाहूनच काय ते करू या उद्देशाने त्याने आम्हाला पत्रिका दाखवली.
दोघांच्या पत्रिका चांगल्या जुळत होत्या. नवमांश द्वितीयेशाचे कार्येशत्व पाहून त्याला त्या आनंदातून बाहेर काढावे असे आम्हाला वाटले नाही. एक सावधानतेचा सल्ला दिला. प्लॅनिंगच्या फंदात न पडता विवाहानंतर लगेच संततीसाठी प्रयत्न करण्यास सांगितले.
गेल्या महिन्यात त्या दोघांचा नोंदणीकृत पद्धतीने विवाह झाला. सर्वात योगायोगाची गोष्ट म्हणजे, त्यांच्या पहिल्या पत्नीचाही दुसरा विवाह त्याच दिवशी त्या छपरी पोराशी झाला.
असा योगायोग आम्ही पाहिलेला नाही.

आपला,
(विस्मित) धोंडोपंत

3 comments:

jaie said...

Sagalyannach rahu mahadasha vait jate ka? ... ki position wise Uttam pan tharate .ani 12th position madhalya mangalabaddal navi mahiti milali...thanks

Ravindra A. Gangal said...

दीपावली शुभचिंतन!

Ravindra A. Gangal said...

दीपावली शुभचिंतन!