Sunday, November 21, 2010

अंगाऽऽई, गाऊ किती तुज बाई... निज ना लडिवाळे

॥ श्री स्वामी समर्थ॥
लोकहो, 

आम्ही भविष्यकथनाचे जे  कार्य करतो त्यात अडलेल्यांची कामे व्हावीत, लोकांची स्वप्ने साकारली जावीत, त्यांची इच्छापूर्ती व्हावी, हाच मुख्य उद्देश असतो. या कार्याला स्वामींचे आशीर्वाद असल्यामुळे आणि त्यांच्याच कृपेने हा "खेळ मांडियेला" असल्यामुळे जे बोलतो तसं होतं.

त्यामुळे लोकांना आमच्या भविष्यकथनाचे जे अनुभव येतात त्यात "आम्ही कुणी मोठे आहोत" असे आम्हांला समजण्याचे काही कारण नाही आणि आम्ही तसे समजतही नाही.
 

जेव्हा केलेल्या भविष्यकथनाची प्रचिती लोकांना येते, तो क्षण मात्र अत्यंत आनंददायी असतो. तो आनंद आम्ही पैशात मोजू शकत नाही. कारण पैशात गोष्टी मोजण्याची सवय आम्हांला नाही. जेव्हा शास्त्राच्या प्रचितीची बातमी कळते तेव्हा आनंदाने स्वामींपुढे नतमस्तक होणे, एवढेच आम्ही करतो.
 

गेल्यावर्षी याच सुमारास म्हणजे ३० नोव्हेंबर २००९ रोजी  डॉक्टर किरण धांडे यांनी आमच्याशी संततीच्या प्रश्नासाठी संपर्क साधला होता. आम्ही त्या दोघांच्या पत्रिका पाहून त्यांना तोडगा आणि मंत्र सांगितला होता. तसेच पुढे मार्च महिन्यात वहिनींना सुरू होणारी  दशा पाहून संततीयोग वर्तवला होता.

त्यासाठी IUI  ५ मार्च पासून पुढे वहिनींच्या पिरियड नुसार करून घ्या असे सांगितले होते. त्याआधी दिवस जाण्याची शक्यता नसतांना कशाला पैसे फुकट घालवायचे? त्यामुळे ५ मार्च पासून पुढे करून घ्या असे सांगितले. त्यानुसार ५ मार्चला त्यांनी IUI केले आणि वहिनींना दिवस गेल्याचे समजले.  डॉक्टरांनी त्या वेळेस पाठवलेले पत्र  "जातकांचा प्रतिसाद - IUI ची तारीख या शीर्षकाखाली तेव्हा प्रसिद्ध केलेले आहे. त्याचा दुवा खाली देत आहोत. 


http://dhondopant.blogspot.com/2010/04/iui.html


दिनांक १६ नोव्हेंबर रोजी डॉक्टरांनी सिझेरियनच्या मुहूर्तासंबंधी विचारणा केली. फार दिवस हातात नव्हते. आम्ही रेवती या अत्यंत शुभ नक्षत्रावरचा १८ तारखेचा मुहूर्त काढून दिला.
  

त्यानुसार वहिनींचे सिझेरियन होऊन डॉक्टर धांडे दांपत्याला कन्यारत्नाचा लाभ झाला. बाळ-बाळंतिणीस आमच्या हार्दिक शुभेच्छा. स्वामीचरणी विनम्र दंडवत.
 

आपला,

(सर्वांचे सर्वकाळ भले चिंतणार) धोंडोपंत
 

ता. क. - वर रेवती नक्षत्राचा उल्लेख केला आहे. त्यामुळे त्याबद्दल लिहिणे गरजेचे आहे. रेवती हे बुधाचे देवगणी शुभ नक्षत्र आहे. 


बुध कुठल्याही घटनेची पुनरावृत्ती करतो म्हणून, प्रेयसीला भेटायचे असेल तर या नक्षत्रावर भेटावे. कुठलेही शुभ आणि फायद्याचे काम या नक्षत्रावर करावे.पण......
 

विवाहाला हे नक्षत्र घेऊ नये. तसेच परीक्षेचा फॉर्म या नक्षत्रावर भरू नये. नाहीतर पुन्हा विवाह करायला लागतो आणि परीक्षेला पुन्हा बसावं लागतं. 


डॉक्टरांना एवढेच सांगणे की, आता वहिनींच्या जवळ जातांना जरा जपून जा. 
नाहीतर वर्षभरात पुन्हा पाळणा. :) 

आपला,

(आचरट) धोंडोपंत 


fromKiran Dhande
toधोंडोपंत
date21 November 2010 20:41
mailed-bygmail.com
Signed bygmail.com

hide details 20:41 (29 minutes ago)

                                      II स्वामी समर्थ ll

नमस्कार पंत ,

कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की,  दिनांक १८ रोजी आम्हांला मुलगी झाली.

आपण दिलेल्या सल्ल्यामुळे आम्ही १८ तारखेला मुहूर्ताप्रमाणे सीझर केले आणि
आता बाळ व बाळाची आई दोघेही सुखरूप आहेत.

तसेच तुम्ही आम्हाला ९ महिने जे मार्गदर्शन केले, त्याबद्दल आपले शतशः धन्यवाद. 

स्वामींचा आशीर्वाद आणि आपले मार्गदर्शन आमच्यापाठी असेच राहो हीच स्वामी चरणी प्रार्थना.
धन्यवाद. 


आपलाआभारी, डॉ किरण धांडे .
 Reply
 Forward
किरण is not available to chat

4 comments:

Surendra said...

Pant,

Kontya veLes konate nakshatra chalu aahe he kase shodhave? Panchang kase pahaave?

umesh said...

पंत,
म्हणजे जे कार्य पुन्हा पुन्हा व्हावे असे वाटत असेल ते रोहिणी नक्षत्रा वर करावे?

ऊमेश.

धोंडोपंत said...

पंचांग कसे पहावे हा मोठा विषय आहे. तो इथे अभिप्रायात सांगता येणार नाही.

पण दररोजचे नक्षत्र मराठी दिनदर्शिकेत दिलेले असते. कालनिर्णय दिनदर्शिकेत प्रत्येक महिन्याच्या पृष्ठाच्या मागील बाजूस त्या महिन्यातील प्रत्येक दिवशीचे नक्षत्र आणि त्याची समाप्ती याची वेळ दिलेली असते.

धोंडोपंत

धोंडोपंत said...

रोहिणी नाही हो रेवती. काय तुम्ही पण?