Friday, November 5, 2010

हम भी है क्या अजब के कड़ी धूँप के तले..... सहरा ख़रीद लाये है बरसात बेचकर

|| श्री स्वामी समर्थ||
लोकहो,

चार दिवसांपूर्वी पत्रिकामेलनासाठी आलेल्या पत्रिकांमधील एका पत्रिकेचे कोष्टक बनवले. मुलाचे नक्षत्र रेवती दुसरा चरण आणि मुलीचे नक्षत्र उत्तराभाद्रपदा दुसरा चरण. म्हणजे गुणमेलनाच्या कोष्टकाप्रमाणे ३६ पैकी ३४ गुण जमत आहेत. म्हणजे नाडीदोष वगैरे काही नाही.

तेवढ्यात दारावरची बेल वाजली. कुरीअरवाला आला असेल असे समजून दार उघडले तर दारात अमेय गोरे. "चांगल्या मुहूर्तावर उगवलास" असे म्हणून त्याला घरात घेतला.

अमेय गोरे हा आमच्या फडके नावाच्या स्नेह्यांचा शेजारी. दोन्ही कुटुंबांचा एकदम घरोबा. म्हणजे फडक्यांची पत्नी कुठे बाहेरगावी गेली असेल तर फडके जेवायला गोर्‍यांकडे. आणि गोरे काकू कुठे बाहेरगावी गेल्या असतील तर गोरे कुटुंबीय जेवायला फडक्यांकडे.

हा अमेय पारंपारिक ज्योतिषशास्त्राचा विद्यार्थी आहे. फडक्यांचा आणि आमचा स्नेह असल्यामुळे "तुला ज्योतिषशास्त्राबद्दल काहीही शंका असतील तर धोंडोपंतांकडे जाऊन विचारत जा." असे फडक्यांनी त्याला सांगून ठेवले आहे. त्यामुळे तो अधूनमधून (गोरे घराण्याच्या एकंदर परंपरेला अनुसरून) फोन वगैरे न करता आमच्याकडे प्रश्न विचारायला येत असतो.
  
परवा तो आल्यावर आम्ही त्याला संगणकासमोर बसवला आणि "या दोन कुंडल्या जुळत आहेत का?" असे विचारले. त्याने गुण पाहण्यासाठी पंचांग उघडले. आम्ही संगणकावर गुणमेलन कोष्टकातील गुणांचे पान आणि मुलामुलीच्या कुंडल्या स्क्रीनवर आणल्या. त्यापैकी गुणमेलन कोष्टक, जिच्याशी पत्रिकामेलन करायचे आहे त्या मुलीची कुंडली व तिच्या महादशांचा तक्ता खाली दिला आहे. तिचे नाव व जन्मतपशील दिलेले नाहीत. 


३४ गुण जमत आहेत हे पाहून तो म्हणाला,

"वा. गुण चांगले जमताहेत. नाडी जमतेय, मंगळाचा तसा काही प्रॉब्लेम म्हणावा असं नाहीये. मुलीच्या पत्रिकेत मंगळाचा बंदोबस्त करण्याची ग्रहस्थिती आहे. सप्तमेश षष्ठात आहे पण षष्ठेशही सप्तमात गेल्यामुळे परिवर्तन योग होतोय. त्यामुळे त्याची काही चिंता नाही." असे म्हणून त्याने आम्हांलाच विचारले, " काय पंत, बरोबर ना?"

म्हटलं, " अरे भोसडीच्या, मी तुला विचारतोय की तुझ्या अभ्यासानुसार यांनी लग्न करावे की नाही. तर तू मलाच उलटं विचारतो आहेस बरोबर आहे ना? म्हणून."

मग आम्ही त्याला समजावून सांगितले की, पत्रिकामेलन करतांना जे गुण जमतात त्यावर जाऊ नये. या गुणांना काही अर्थ नाही. मुळात दोघांच्या पत्रिकांचा सखोल अभ्यास करून निर्णय कसा घ्यावा हे आम्ही त्याला सांगितले.  

जे स्थळ सांगून आले आहे त्या पत्रिकेत वैवाहिक सौख्य, संततीसौख्य, आयुष्ययोग, स्वभाव व करिअर या पाच गोष्टी पाहिल्या पाहिजेत. पत्रिकेतील उणीवा जातकाला स्पष्टपणे सांगितल्या पाहिजेत. पुढे येणार्‍या संभाव्य अडचणींची कल्पना त्याला दिली पाहिजे. जीवनातल्या कुठल्या क्षेत्रात त्रास संभवतो, कुठे कॉम्प्रोमाईज करायला लागेल, हे त्याला सांगितले पाहिजे.

आता या मुलीच्या कुंडलीत पहा. या कुंडलीत वैवाहिक सौख्यच नाहीये. विवाह हा वैवाहिक सौख्यासाठी करायचा असतो. तेच ज्या पत्रिकेत नाहीये तिथे काय कॉम्प्रोमाईज करणार? आडात नाही तर पोहर्‍यात कुठून येणार?

परवा संध्याकाळी त्या मुलाचा फोन आला होता. त्याने मुलगी पाहिली होती. दोघांकडून पसंती झाली होती. फक्त निर्णय घ्यायचा होता. आम्ही स्पष्टपणे सांगून टाकले की, हिचा विचारही करू नको.

त्याचे वय २९ वर्षे आहे. त्यामुळे पालकांना त्याचे लग्न आता लवकरात लवकर व्हावे असे वाटू लागले आहे. आणि तसे वाटणे स्वाभाविक आहे. पण म्हणून कोणीही गळ्यात बांधून घ्यायची याला अर्थ नाही.

हिच्याशी लग्न करणं म्हणजे आयुष्याचं वाळवंट करून घेण्यासारखं आहे.

हम भी है क्या अजब के कड़ी धूँप के तले
सहरा ख़रीद लाये है बरसात बेचकर..........

हे म्हणायची पाळी आयुष्यात यायला नको. 

आपला,
(परखड) धोंडोपंत

3 comments:

ATUL said...

Dhondo pant kharach parkhad aahat buwa tumhi. Pan Manawe lagel tumhi jasa vichar gunmelanacha karta tasa vichar saglyani (Jyanna Patrika Pahata Yete) karawa. me pahilyandach blog pahato aahe. ani tippanni pan @ Atul Sohoni, Adv. Amravati.

swapnil said...

Pant,

Ya mulila vivah sukh naahi. yaach khulasa karal ka?

धोंडोपंत said...

हे खुलासे क्लासमध्ये शिकवतांना.