|| श्री स्वामी समर्थ||
लोकहो,
आमच्या सल्ल्यानुसार वागून फायदा झालेले असंख्य लोक आहेत. त्यातले काही अभिप्राय ब्लॉगावर प्रसिद्धही केलेले आहेत. फायदा होऊनही अभिप्राय न देणारेही, अनेक आहेत. आम्ही कुणाच्या मागे लागत नाही. नसेल द्यायचा अभिप्राय तर नका देऊ. पुढच्या वेळेस याल तेव्हा पाहू, :) एवढे म्हणून सोडून देतो.
नुकताच गेल्या महिन्यात, एका मुलाच्या कोर्ट केसचा निकाल लागला. गेल्या वर्षभरापासून कोर्टात घटस्फोटाची केस सुरू होती. मुलीकडच्या लोकांनी घटस्फोट देण्यासाठी भरमसाठ मागण्या केल्या होत्या. हा मुलगा आणि त्याचे वडील आमचा सल्ला घ्यायला नेहमी येतात.
आम्ही गेल्यावर्षी त्याला सांगितले होते की, " १५ ऑक्टोबर २०१० पर्यंत केस चालेल तशी चालू द्या. अजिबात घाई करू नका. केसचा निकाल १५ ऑक्टोबर नंतर लागेल असे पहा. समोरच्यांना डेट घ्यायच्या असतील, तर तुम्ही अजिबात आडकाठी करू नका. आपल्याला हे मॅटर लवकर संपायला नको आहे. लांबेल तेवढे लांबू द्या. १५ ऑक्टोबर नंतर आपल्या बाजूने गोष्टी घडतील."
सांगितल्यानुसार तारखा पडत गेल्या. १५ ऑक्टोबर नंतर निकाल लागला. जी पार्टी चाळीस लाखाची मागणी करत होती, त्यांना कोर्टाच्या आदेशानुसार तीन लाखावर समाधान मानावे लागले. पण या मुलाने साधा चार ओळीचा अभिप्रायही अजून लिहिलेला नाही. केस सुरू असतांना प्रत्येक डेट च्या आदल्या दिवशी,
" काका, उद्या डेट आहे, काय तोडगा करू" " काका असं करू का", " काका तसं करू का" असे त्याचे फोन यायचे.
निकाल लागल्यावर त्याने कळविले देखील नाही. आम्हांला ही गोष्ट त्याच्या मावस काकांकडून कळली. नंतर त्याच्या वडिलांचा फोन आला. ते आम्हांला 'गुरू' म्हणून संबोधतात. म्हणाले, "गुरू, केसचा निकाल तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपल्या बाजूने लागला. तुम्ही सांगितल्यासारखेच सर्व झाले. मला मंगळवारी सुटी असते. मिठाईचा बॉक्स घेऊन येतो मंगळवारी."
अजून 'तो' मंगळवार उजाडायचा आहे. आम्हांला मिठाईची पडलेली नाही. आम्हांला मिठाई आवडतही नाही. पण वागणं कसं असतं, हे सांगितलं. केस सुरू असतांना हगल्या-पादल्याला धोंडोपंत आठवायचे. आता काम झालं की, भोसड्यात गेले धोंडोपंत.
हे झालं ज्यांनी सल्ला पाळल्यामुळे फायदा झालं त्यांच्याबद्दल. सल्ला न पाळल्यामुळे नुकसान झालेलेही काही लोक असतात. फायदा होऊन न कळविणारे लोक आहेत तर सल्ला न पाळल्यामुळे नुकसान झालेले कसले कळवणार?
एखादाच सुबोध बांदल सारखा असतो, जो सल्ला न ऐकल्यामुळे, जे नुकसान झाले ते प्रांजळपणे पत्र लिहून कळवतो. त्याचा अभिप्राय " काय भुललासी वरलिया रंगा" या शीर्षकाखाली प्रकाशित केला आहे.
अशा लोकांचे ज्यांचा फायदा आणि नुकसान झाले, त्यांचे एक एक उदाहरण नमूद करतो.
१) प्रेमविवाह करून अमेरिकेत मुलगी गेल्यावर तिच्या आईवडिलांनी दोघांच्या पत्रिका दाखवल्या. "लग्न कुठल्याही परिस्थितीत करायचेच होते, म्हणून पत्रिका पाहिली नाही" असे त्यांनी सांगितले. आम्ही म्हटले, " आम्ही पत्रिकेचे पोस्टमॉर्टेम करत नाही. आता तिच्या विवाहाबद्दल आणि वैवाहिक सौख्याबद्दल आम्ही काही सांगणार नाही."
ते म्हणाले, " विवाह नाही. पण पुढच्या इतर गोष्टी म्हणजे संतती, करिअर याबद्दल तरी सांगा."
आम्ही पत्रिका पाहिली. "येत्या दीड वर्षात तिला मूल झालेच पाहिजे, हे तुमच्या मुलीला सांगा. दीड वर्षात मूल झाले नाही तर आयुष्यात होणार नाही" असे म्हणालो.
त्या मुलीने आणि तिच्या नवर्याने चार पाच वर्षे प्लॅनिंग करायचे ठरविले होते. पण "धोंडोपंतांनी सांगितलाय तर लगेच चान्स घ्या" असे तिच्या पालकांनी कानीकपाळी ओरडून त्या दोघांना सांगितले. त्यांनी नाईलाजाने चान्स घेतला. एक मुलगी झाली.
गेली काही वर्षे द्वितीय संततीसाठी प्रयत्न करत आहेत. पण द्वितीय संतती होत नाही. द्वितीय संतती होण्यासाठी त्यांनी आयव्हीएफच्या सायकल घेतल्या. तीन सायकल फेल गेल्यावर डॉक्टरांनी सांगितले की यापुढे आयव्हीएफ केलेत तर, तुमच्या तब्येतीला धोका आहे.
ती मुलगी मुंबईत आली की आम्हांला फोन करते. गेल्या वेळेस आली तेव्हा फोन करून म्हणाली, "पंत, काही तरी उपाय/ तोडगा सांगा ज्याने अजून एक मूल होईल."
आम्ही तिला सांगितले की, " ब्रह्मदेव जरी इथे येऊन तुला झवला, तरी तुला यापुढे मूल होणार नाहीये. हा नाद सोडून दे. मुलीचे नीट पालनपोषण कर."
२) राजापूरला घर आणि जमीन स्वस्तात मिळतेय ती घेऊ का? असा प्रश्न घेऊन एक जण आला होता. प्रश्नकुंडली बनवली. चतुर्थाशी राहूचा संबंध पाहून आम्ही हैराण झालो. जरी चतुर्थस्थानचा उपनक्षत्रस्वामी लाभस्थानाचा कार्येश होता, तरी चतुर्थाशी राहूचा घनिष्ट संबंध पाहून मनात शंकेची पाल चुकचुकली.
आम्ही लगेच रुलिंग कुंडली पाहिली. रुलिंग कुंडलीतही चतुर्थात राहू. ते पाहून धक्काच बसला. त्या दिवशीचे नक्षत्र पाहिले तर आर्द्रा. आमची खात्री पटली. "हा सौदा करु नको, हे घर शापित आहे" असे त्याला सांगितले.
त्याने ऐकले नाही. गुपचूप सौदा केला. आत्ता पडत्या भावात घेऊ पुढे चार पाच वर्षांनी चढ्या भावात विकून काही लाख कमवू, असा त्याचा विचार असावा. ते घर घेतल्यापासून कुटुंबात मोठ्या समस्या यायला लागल्या. आई आजारी पडली. सहा महिन्यात आईचा मृत्यू झाला. (प्रश्नकुंडलीच्या चतुर्थात राहू).
राहत्या घरात रोज वादविवाद व्हायला लागले. बायको कंटाळून माहेरी जाऊन राहिली. घरात रात्री अपरात्री भास व्हायला लागले. विचित्र स्वप्ने पडायला लागली. हुशार मुलगा वाईट संगतीला लागला. सख्ख्या बहिणीचा नवरा वारला, ती विधवा झाली.
या सर्व चक्रावणार्या घटना दीड ते पावणेदोन वर्षात घडल्या. मग पुन्हा आमच्याकडे आला. "पंत, चुकलो" म्हणाला. पुढे काय करू? म्हणून विचारलेन.
" मिळेल त्या किंमतीला ते घर विकून टाक" असे आम्ही सांगितले.
जिथे नफा कमवायला गेला, तिथे आयुष्य उद्ध्वस्त व्हायची वेळ आली. महत्प्रयासाने ते घर विकले गेले आणि मग गाडी रूळावर आली.
तुकाराम महाराज म्हणाले आहेत, " अधिकार तैसा, दावियेला मार्ग... चालता हे मग, कळो आले".
पण तो मार्ग दावूनही आंधळे आडरानानेच जातात, त्याला काय म्हणावे? म्हणूनच महाराजांना पुढे म्हणावे लागले की,
" आडरानी भरले जग".
जग धावताय पण आडरानाने धावताय. त्यांना योग्य मार्गावर नेऊन ठेवणारा मार्गदर्शक मिळणे गरजेचे आहे.
आपला,
(वाटाड्या) धोंडोपंत
ता.क. - हा लेख लिहिल्यानंतर पहिल्या प्रसंगात नमूद केल्यासारखे घडले. झाले असे की, Proctor And Gamble या कंपनीतल्या एक बाई आमच्या जातक आहेत. त्यांच्या मुलीचे मागच्याच महिन्यात लग्न झाले. मुलगी TCS मध्ये आहे. पत्रिकामेलन, मुहूर्त सर्व आम्हीच केले आहे. त्या मुलीला संततीच्या दशा कधीपर्यंत आहेत आणि त्यापूर्वी संततीसाठी तिने प्रयत्न केले पाहिजेत, हे आम्ही त्या बाईंना तिचा विवाह ठरण्यापूर्वीच सांगितले आहे.
आत्ता त्यांचा फोन आला होता. मुलीला TCS पुन्हा ऑनसाईट अमेरिकेत पाठवत आहे. नवरा इथे आहे. आम्ही तर तिला मूल लवकर झाले पाहिजे हे सांगितले आहे. ती काही महिने तिथे जाऊन परत येईल असे त्या म्हणाल्या. त्याला आमचा पूर्णपणे विरोध आहे. आमचा आणि त्यांचा संवाद खालीलप्रमाणे झाला.
धोंडोपंत: "I absolutely do not agree with what she is doing and also the support you are extending to her in keeping her away from her husband."
सौ. नायर: " I am not extending support. But you know, she has purchased flat at Andheri and the EMI's are to be paid. For that she has to go onsite. That is why she is going."
धोंडोपंत: " If this dashaa ends without conception then? She is already 31. Are you going to remain pregnant for her?"
सौ. नायर: " And if she doesn't have her flat then where she will keep the child?"
धोंडोपंत: " If the Flat is more important to her, than a child, I have nothing to say"
आडरानी भरले जग.....