॥ श्री स्वामी समर्थ॥
लोकहो,
आम्ही सांगितल्यानुसार त्याचा विवाह ऑगस्ट महिन्यात जुळला. पत्रिकामेलन आणि विवाहमुहूर्ताचे काम आम्हीच केले. १३ नोव्हेंबर रोजी ते विवाहबद्ध झाले. त्या उभयतांना उत्तम वैवाहिक जीवनासाठी आमच्या शुभेच्छा.
नांदा सौख्यभरे !!!
|
hide details 12:13 (20 hours ago)
| |||||||||||||||||||||||||||||||
पंत,
मी ऑक्टोबर २०१० ला 'माझा विवाह योग कधी' असा प्रश्न घेऊन आपल्याशी प्रथम संपर्क साधला होता. तेव्हा आपण सांगितले होते कि माझ्या पत्रिकेत १०० % विवा ह योग आहे. शुक्र हाच सप्तमा चा बलवान कार्येश होत असल्याने विवाह ठरण्यासाठी शुक्राची दशा लाभलीच पाहिजे. शुक्राची आणि रविची प्रत्यंतर दशा महत्वाची असल्याचे आपण सांगितले होते.
त्या प्रमाणे जुलै २०११ ते ऑक्टोबर २०११ या कालावधीत माझा विवाह जमू शकतो असे आपण सांगितले होते. तसेच नवनाथ भक्तिसार २८ व्या अध्यायाचे संकल्प करून पठण करावे असेही आपण सांगितले होते.
२६ जुलै २०११ रोजी मी संकल्प करून नवनाथ भक्तिसार २८ व्या अध्यायाचे पठण सुरु केले. त्यानंतर ७ ऑगस्टला ज्या मुलीला भेटलो तिच्याशी महिन्याभरात विवाह योग जुळून आला. अगदी तुम्ही सांगितलेल्या कालावधीत विवाह योग जुळून आला आणि १३ नोव्हेंबर २०११ रोजी आपण काढलेल्या मुहूर्तावर आमचा विवाह संपन्न झाला.
आपले भाकीत अतिशय अचूक ठरले. आपण दिलेल्या मोलाच्या मार्गदर्शनाबद्दल मनःपूर्वक आभा र.
धन्यवाद,
गौरव


0 प्रतिसाद:
Post a Comment