Tuesday, December 27, 2011

पत्रिकामेलन - अशा ही पत्रिका येतात.....

|| श्री स्वामी समर्थ||

लोकहो,

नुकतेच एक पत्रिकामेलन केले. त्यातील मुलीची ही पत्रिका. गुण २८.५ जमत होते. आम्ही त्या मुलाला विवाह करू नकोस असे सांगितले. कदाचित त्याच्या घरच्या मंडळींनी आधी पत्रिका कुणाला दाखवली असेल आणि त्यांनी पत्रिका जुळतेय असे सांगितले असावे. त्यामुळे आमचे म्हणणे ऐकल्यावर तो एकदम नर्व्हस झाला.


लग्न हा आयुष्याचा प्रश्न आहे. पत्रिकामेलन करतांना फार जबाबदारीने केले पाहिजे. नुसते गुण जमतात म्हणून पत्रिका जुळतेय असे सांगू नये. तर समोरच्या व्यक्तीच्या कुंडलीतील ग्रहयोगांचा, महादशांचा संपूर्ण सखोल विचार करून मग निर्णय द्यायला पाहिजे.


त्या मुलीची पत्रिका खाली दिली आहे. नाव आणि जन्मतपशील गोपनीयतेच्या कारणास्तव उघड करत नाही. ही पत्रिका पहा.

या पत्रिकेत लग्नात लग्नभावारंभी शनी हर्षल युती आहे. हा अत्यंत अशुभयोग आहे. तो लग्नभावारंभी आहे म्हणजे फारच अशुभ आहे. त्यातूनही ही युती मूळ नक्षत्री आहे. हे विशेष आहे. त्यामुळे अशुभत्व पराकोटीचे वाढले आहे. त्यातून शनी हर्षलशी युती करायला जातो आहे. ही होऊन गेलेली युती नाही, होऊ घातलेली युती आहे. पापग्रहांच्या युतीयोगात दोन ग्रहांपैकी शीघ्र ग्रह कमी अंशावर असणे, ही असली स्थिती लै बेकार.   


सप्तमेश बुध धनात आहे. म्हणजे स्वस्थानापासून आठवा. सप्तमेश बुध मकरेत शनीच्या राशीत असतांना शनी मूळ नक्षत्रात, हर्षलच्या अंशात्मक युतीत. म्हणजे शनी धनेश म्हणून बिघडला.  सप्तमस्थानावर चार पापग्रहांची दृष्टी. (यात आम्ही रवि धरलेला नाही.) 

हाच शनी चंद्रकुंडलीचा सप्तमेश आहे. तो स्वत:च्या स्थानापासून बारावा, हर्शलच्या अंशात्मक युतीत. कुंडलीत कारक शुक्र मकरेचा. शनीची हालत वर दिली आहेच. 


पंचमेश मंगळ व्ययात. चंद्रकुंडलीचा पंचमेशही तोच. असे असतांना कारक ग्रह गुरू राहुयुक्त. नवमांशात पंचमस्थानी मंगळ शनी. 


कुंडलीला २०२१ पर्यंत शुक्राची महादशा सुरू आहे. शुक्र धनात. षष्ठेश आणि लाभेश. शुक्र मंगळाच्या नक्षत्रात मंगळ व्ययात, पंचमेश आणि व्ययेश.


काय सांगू याला? लग्न कर हिच्याशी? आणि काशी करून घे स्वत:ची? ज्यांनी ही पत्रिका जमवली असेल त्यांनी काय झ्याटं पाहिली ते कळत नाही.


आम्ही काही चांगलं सांगायला गेलो की, मग लोक आमच्यावर नाराज होतात. एवढं वाचवलं खड्ड्यातून ते गेलं कुठेच.  आम्हाला कशाला वाटेल कुणाचं लग्न होऊ नये म्हणून? पुढे काय खड्डे आहेत ते दाखवणं हे आमचं काम आहे. वास्तव जे आहे ते आम्ही सांगतो. 


गोड-गोड बोलणारे बरे वाटतात. अप्रिय पण हिताच्या गोष्टी सांगणारे, चालत नाहीत. तरी आम्ही प्रत्येक गोष्टीचा शास्त्राधार काय आहे? हे जातकाला सांगत असतो. आम्हांला वाटताय म्हणून तू हिच्याशी लग्न करू नकोस असे कधी कुणाला सांगितलेले नाही. तर तुला आम्ही करू नकोस असे सांगतोय, त्याची कारणे काय? तर ही अशी कारणे आहेत. हे खुलासा करून प्रत्येकाला सांगतो. शास्त्र काय आहे ते सांगतो. 


ज्यांची सत्य ऐकायची तयारी असेल त्यांनीच आमच्याकडे यावे. जातकाच्या मतानुसार ज्योतिष सांगणारे, त्याला खूश करून पैसे उकळण्यासाठी या शास्त्राचा वापर करणारे खूप आहेत. तुमच्या सोयीचे ऐकायचे असेल तर त्यांच्याकडे जा. आम्ही त्यातले नाही, हे नक्की. 


आपला,
(सत्यवादी) धोंडोपंत

4 प्रतिसाद:

asmita said...

namaskar...kase ahat pant?

asmita said...

नमस्कार,आपला कालचा लेख वाचला..नेहमीप्रमाणेच अप्रतिम.आपले सगळे लेख खूप काही शिकवून जातात..हल्ली २७ -३० गुण जुळूनही विवाह मोडले गेल्याची खूप उदाहरण ऐकायला मिळतात,त्यामुळे लोकांच्या डोळ्यात अंजन घालणारा हा लेख वाचनीय आणि प्रशंसनीय आहे.ज्योतिषातील संशोधन तसेच ह्या BLOG च्या माध्यमातून ज्योतिष शास्त्रातील अचूक ज्ञान लोकांपर्यंत पोचवण्याच जे काम आपण करत आहात आणि ती धुरा यशस्वीपणे पेलत आहात त्याबद्दल बोलायला शब्दच नाहीत..खरतर वाचकांचा आकडा ६ लाखांपर्यंत जाने हीच त्याची खरी पावती आहे...आपले आशीर्वाद आमच्या सर्वाना लाभावेत ..स्वामिनी आम्हा सर्वांसाठी पाठवलेला वाटाड्या आहात आपण....श्री स्वामी समर्थ.

थोडेसे वास्तूशास्त्रा विषयी said...

फारच उत्तम...... पंत तुमचा सारखे परखड मत मांडणारे फार कमी असतात.काही लोकांना फक्त पैशाशी देणे घेणे असते दक्षिणा किती मिळते यावरच डोळा असतो.

Padmakar said...

नमस्कार पंत,
लेख खरच माहिती पूर्ण आहे. पण कुंडली वाचन आम्हाला येत नाही. ग्रहांच्या दशा, योग सारं काही वरून जाता. कुंडली वाचन शिकण्याची इच्छ्चा आहे. मार्ग सांगा. मग लेख वाचण्याला अजून रंगत येऊ शकेल. धन्यवाद.