Thursday, December 29, 2011

कारभारी दमानं......

॥ श्री स्वामी समर्थ॥

लोकहो,

यावर्षी ३१ डिसेंबरला चंद्र बहुतेक ग्रहांच्या कुयोगात येतो आहे. चंद्र-शनी षडाष्टक आहे. चंद्र हर्षल युती आहे. तसेच बुध मंगळाच्या केंद्रयोगात आहे.

शनीचं उत्तराभाद्रपदा नक्षत्र आहे. रात्री १०.३५ ला अष्टमी सुरू होतेय. भद्रा लागतेय. सगळं जोरदार
 काम आहे. सोबत ३१ डिसेंबरची रात्री ११ ची कुंडली दिली आहे. ११ नंतरच राडे सुरू होतात. तोपर्यंत बहुतेकजण कंट्रोलमध्ये असतात.


तर सांगायची गोष्ट ही की, ३१ डिसेंबरची रात्र जरा जपून "साजरी" करा. नसत्या लफड्यात अडकू नका. "प्रोव्होक" करणारी ग्रहस्थिती आहे. हायपर होऊ नका. कुणाशी राडे करायला जाऊ नका.

नको ती झंझटं मागे लागण्यापेक्षा घरात बसून ब्लॅकलेबलचा आस्वाद घ्या.

आपला,
(पर्यायसूचक) धोंडोपंत

0 प्रतिसाद: