॥ श्री स्वामी समर्थ ॥
साडेसाती खरचं असते काय? असा प्रश्न विचारला जातो. याचे उत्तर जो साडेसातीत सापडलाय तोच देईल. राहु ग्रह आहे की नाही? आकाशात तर दिसत नाही. मग तो ग्रह कसा मानायचा? या प्रश्नाचे उत्तरही ज्याला राहु महादशा येऊन गेलेय तोच देईल. राहुच्या महादशेत कशी वाट लागली, हे त्याच्याकडून ऐकावे.
ज्यावेळेस एखादी ग्रहदशा पाच, आठ, बारा या स्थानांशी संबंधीत येते, तेव्हा अपयश हे लिहिलेलं असतं. त्या काळात कितीही गांड आपटली, तरी यश मिळत नाही. ती दशा संपल्यावर यश आपोआप चालत येतं. प्रत्येकाच्या आयुष्यात हा काळ येतोच.
नव्याण्णव शतके सहज झळकावून, जगातले सर्व विक्रम मोडीत काढणार्या आपल्या लाडक्या सचिनला, शंभराव्या शतकाला धापा टाकाव्या लागतात. खरे तर सचिन अजून पन्नास शतके ठोकू शकेल एवढा गेम त्याच्यात बाकी आहे. पण समस्त चाहत्यांनी शंभराव्या शतकासाठी देव पाण्यात बुडवूनही या दशेत ते झालं नाही.
ही ग्रहदशेची फळे.
आपला,
(ग्रहांकित) धोंडोपंत


0 प्रतिसाद:
Post a Comment