Wednesday, March 30, 2011

काठोकाठ भरू द्या प्याला, फेस भराभर उसळू द्या......

|| श्री स्वामी समर्थ||
लोकहो,

पाकड्यांना धूळ चारत भारतीय संघाने आजचा अत्यंत महत्त्वपूर्ण सामना जिंकला आणि देशाची शान राखली त्याबद्दल भारतीय संघाचे अत्यंत मनःपूर्वक अभिनंदन. आजचा सामना फायनलपेक्षाही महत्त्वाचा होता कारण तो देशाच्या शत्रूबरोबर होता.

संपूर्ण भारतीय संघाचे पुन्हा पुन्हा अभिनंदन.

आज सामना सुरू झाल्यावर भारतीय फलंदाजांनी जे प्रदर्शन केले ते अत्यंत हीन दर्जाचे होते. आपण विश्वचषक सामन्याची उपांत्य फेरी पहात आहोत की रणजी ट्रॉफीचा सामना हे कळत नव्हते. सेहवाग आणि रैना उत्तम खेळले. सचिनने चार जीवदानांच्या बळावर चांगली धावसंख्या उभारली. पण मधल्या फळीतील फलंदाजांनी पूर्ण अपेक्षाभंग केला. गौतम, विराट, युवराज आणि साक्षात विश्वचैतन्य धोणीमहाराजांनी पार निराशा केली. इतकी की आम्ही सामना बघायचा सोडून चक्क झोपलो. त्यानंतर रैनामुळे २६० चा पल्ला गाठता आला.

२६० हे विश्वचषक मालिकेतील अशा महत्त्वाच्या सामन्याचे आव्हान असू शकत नाही. किमान ३२० ची धावसंख्या अपेक्षित होती. पण भारतीय गोलंदाजांनी चांगला खेळ केला. विशेषतः नेहराने चांगली गोलंदाजी केली. भारताचे क्षेत्ररक्षण चांगले होते. झहीरला नेहमीप्रमाणे जाम झोडला हा भाग वेगळा.

एकंदरीत आमची ब्लॅकलेबल फुकट जाणार नाही.खरे सांगायचे तर, भारत हा सामना जिंकेल हे आम्हाला कालच माहीत झाले होते. झाले असे की, भावना पवारशी काल गप्पा मारत असतांना आम्ही आजचा सामना कोण जिंकेल हा प्रश्न सोडवला होता. भावनाला क्रिकेटमध्ये खूप रस असल्यामुळे क्रिकेटमधील प्रत्येक घडामोडीवर आमच्या नेहमी गप्पा होतात. काल जेव्हा आजच्या मॅचबद्दल तिच्याशी बोलत होतो तेव्हा तिलाच पर्याय लिहून त्यांना नंबर द्यायला सांगितले. तिने लिहिलेले पर्याय असे:-

१) पाकिस्तान २) भारत

आम्ही रुलिंग प्लॅनेट्सची जुळवाजुळव करून एक मिनिटात तिला भारत सामना जिंकेल असे सांगितले होते. आमचे भावनाशी झालेले संभाषण आणि प्रश्नवेळेची रुलिंग कुंडली खाली देत आहोत. रुलिंग प्लॅनेट्स वरून एका मिनिटात कसे अचूक उत्तर देता येते ते त्यावरून समजेल.fromभावना पवार
todhondopant@gmail.com
date29 March 2011 19:57
subjectChat with भावना पवार
mailed-bygmail.com

hide details 29 Mar (1 day ago)
19:37 भावना: kiwis kahi jinklay nahit aaj
19:39 me: हो ना
19:41 भावना: lankela harawaNa kathin jaNaar apalyala
  tumhi mandali ka prashna kundali udyachya match sathi?
  itaka karun tya pakaDyankaDun harayala nako
19:44 me: नाही अजून
19:46 भावना
  उद्या कोण जिंकेल हा प्रश्न नीट मनात धर
  आणि दोन पर्याय लिही
  भारत व पाकिस्तान
  आणि त्यांच्यापुढे नंबर लिही
 भावना: hayala, tumhi malach sankaTat padatay :D
19:47 me: रुलिंग वरून पाहू
  तुझ्या मनात जे येतील ते नंबर दे
 भावना: book warun dete
 me: नो नो
  नंबर नाही म्हणत
  भारत आणि पाकिस्तान लिही
19:48 त्यांच्या पुढे १ आणि २ असे नंबर टाक
  कुणाच्याही पुढे कुठलाही नंबर टाक
 भावना: aaNee ?
19:49 manat prashna dharu
19:50 me: नको
  मला नंबर सांग
  १ कोण आणि २ कोण
 भावना: 1 pak, 2 india
19:51 me: इंडिया जिंकणार
 भावना: AWESOME !!!!
19:52 me mhananar hote ki tumhi jar pakaDe jinaktil asa mhanale tar tumacha hya weLee bhavishya khoTa tharu det
  asa mala kadhich waTat nahi ki tumacha bhavishya khoTa tharawa. pan udyacha samana apan jinakalach pahije

 Reply
 Forward
Reply by chat to भावना

हा प्रश्न आम्ही कुठल्याही प्रश्नकुंडलीच्या फंदात न पडता, सरळ रुलिंग प्लॅनेट्सवरून सोडवला. त्यासाठी प्रश्नवेळेचे रुलिंग प्लॅनेट्स घेतले.


प्रश्नवेळेचे रुलिंग प्लॅनेट्स असे होते -

लग्न- कन्या - बुध - ९
नक्षत्र - श्रवण - चंद्र -४
राशी - मकर -शनी- २१
वार -मंगळवार - मंगळ - ९
-----------------------
एकूण -  ४३ - ३ = ४० ( बुधाचे ३ वजा केले.)

पर्याय २ आहेत म्हणून चाळीस ची एक अंकी बेरीज ४ त्याला २ ने भागले की बाकी शून्य. म्हणजे शेवटचा पर्याय हे उत्तर. भावनाने लिहिलेल्या पर्यायात शेवटचा पर्याय भारताचा आहे. म्हणजे भारत जिंकणार हे उत्तर. ते ही एका मिनिटात. 

असे सर्व आहे. असो. 

एकंदरीत सर्व आनंदीआनंद झाला. तुम्हां सर्वांचेही हार्दिक अभिनंदन.


आणि हो,

पाकड्यांना जाताजाता भेटही द्यायला हवी. भोसडीचे आपले पाहुणे म्हणून आले. अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे. म्हणून पाकड्यांना आमच्यातर्फे ही प्रेमळ भेट.आपला,
(आनंदित) धोंडोपंत
Tuesday, March 29, 2011

आमचा रामराम घ्यावा.....

॥ श्री स्वामी समर्थ॥

लोकहो,


ऑस्ट्रेलियाचा माजोरडा कप्तान रिकी पॉंटिंगने कप्तानपद सोडले आहे. भारताकडून बेफाम धुलाई झाल्यावर मायदेशातून येऊ लागलेल्या दडपणापुढे त्याला झुकावे लागले. 


तसेच अत्यंत उर्मट गोलंदाज शॅन टेटने देखील एकदिवसीय सामन्यातून निवृत्ती घेतल्याची घोषणा केली आहे. आता तो फक्त ट्वेन्टी ट्वेन्टी खेळणार आहे. 


माणसाने माज दाखवू नये. गर्वाचे घर खाली येतेच येते हे पॉन्टिंगवरून समजते. 


आम्हाला काल कु. प्रीति कदमने एक इमेल पाठवला. त्यात अत्यंत कल्पकतेने सचिनला पॉंटिंग "भजतांना" दाखविले आहे. प्रीतिला धन्यवाद. तुमच्याकडेही हा मेल आला असेल. नसेल आल्यास विरंगुळा म्हणून ते चित्र खाली जोडत आहोत. छायाचित्राचे सौजन्य कु. प्रीति कदम.
आपला,
(सचिनभक्त) धोंडोपंत


Saturday, March 26, 2011

जातकांचे प्रतिसाद - डोळस प्रेम

॥ श्री स्वामी समर्थ॥
लोकहो,

पूर्वी प्रेमविवाह म्हटला म्हणजे पत्रिका बघायची नाही असा एक फोबिया समाजात होता. नाही जुळली तर काय करा? कशाला उगाच डोक्याला ताप? जे काय व्हायचं असेल ते झाल्यावर काय तो ताप होऊ दे. अशी कमकुवत मनोवृत्तीची विचारसरणी होती. पण हल्ली तसे नाही.

आम्ही जे पत्रिकामेलन करतो, त्यात प्रेमविवाह करू इच्छिणार्‍यांच्या पत्रिकांचे मेलन मोठ्या प्रमाणावर असतं. विशेषत: सुशिक्षित आणि उच्चशिक्षित समाजातील जातक, प्रेमविवाह करतांना सुद्धा पत्रिका पाहून पुढे जातात. काय समस्या येऊ शकतात? त्यावर उपाययोजना काय? याची आधी माहिती करून घेतलेली केव्हाही चांगली असते. याला डोळस प्रेम म्हणता येईल. 

तशाच स्वरूपाच्या पत्रिकामेलनासंदर्भात आलेले हे पत्र. श्री निलेश कुलकर्णी आणि त्यांच्या सौभाग्यवतींना सुखी वैवाहिक जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा.

आपला,
(शुभचिंतक) धोंडोपंतfromNilesh Kulkarni
toधोंडोपंत
date25 March 2011 11:05
subjectअचूक पत्रिकामेलन..
mailed-bygmail.com
Signed bygmail.com
 11:05 (20 hours ago)
श्री धोंडोपंत गुरुजी,
यांचे चरणी साष्टांग दंडवत.... 
मी आपल्या कडून काही महीन्यांपूर्वी आमचं पत्रिकामे
लन करुन घेतल होतं आणि पुढचा प्रश्न होता की आमच्या लग्नाला घरुन संमती मिळेल का?
पण ह्याचं उत्तर शोधण्याआधीच जरा चक्र फिरली आणि मी घरी तिच्याबद्दल सांगितल...
२१ तारखेला घरच्यांचा रितसर मुलगी पहाण्याचा कार्यक्रम झाला आणि सगळ्यांना मुलगी आवडली आणि तिच्या कडच्यांनाही मी आवडलो... त्यामुळे सगळं सुरळीत झालं..आता साखरपुडा आणि लग्नाच्या तारखा काढणं चालू आहे..

तुम्ही केलेलं पत्रिकामेलन आणि तिच्या बद्दल सांगितलेल्या सागळ्या गोष्टी आगदी तंतोतंत जुळल्या..
तुम्हाला ही बातमी कळवावी म्हणून हा पत्रप्रपंच...
असाच लोभ असू द्यावा ही विनंती...

आपला
निलेश कुळकर्णी
(सी..  पुणे..)

 Reply
 Forward
सी is not available to chat

Friday, March 25, 2011

चल.... फूऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽट

॥ श्री स्वामी समर्थ॥
लोकहो,आजच्या न्यूझिलंड विरूद्ध दक्षिण अफ्रिकेच्या सामन्यात न्यूझिलंडने जो थरारक आणि अनपेक्षित विजय मिळवला आहे, तो पाहून आम्ही थक्क झालो.

न्यूझिलंड संघाचे हार्दिक अभिनंदन. ऑस्ट्रेलियापाठोपाठ दक्षिण अफ्रिकेचा बलाढ्य संघ विश्वचषक स्पर्धेतून फेकला गेला, याचा आम्हाला अतीव आनंद आहे. डॅनिअल व्हेट्टोरी आणि रॉस टेलरने अफ्रिकेच्या संघाला "चल फूऽऽऽऽऽट" केले.

खरे तर  न्यूझिलंडने केवळ २२१ धावांचे आव्हान दक्षिण अफ्रिकेसमोर ठेवले होते. त्यावेळेस ग्रॅमी स्मिथ विश्वचषक जिंकण्याची स्वप्ने रंगवत असणार.

पण १२१ ला ३ वरून १४६ ला ८ ही त्यांची घसरण पाहण्यासारखी होती. १७२ ला न्यूझिलंडने दक्षिण अफ्रिकेला गुंडाळले आणि सेमीफायनलचा प्रवेश निश्चित केला. किवी उत्तम खेळले. आमचा लाडका रॉस टेलरही छान खेळला. 

मजा आली सामना बघायला. 

आपला,
(रममाण) धोंडोपंत


Thursday, March 24, 2011

मिल जाये रैना......

|| श्री स्वामी समर्थ||


लोकहो,


आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करून भारतीय संघ सेमीफायनलला पोहोचला, ही फारच आनंदाची बाब आहे.

सचिन, गौतम, युवी आणि रैना यांनी सुरेख खेळ केला, त्याबद्दल त्या चौघांचे अत्यंत मन:पूर्वक अभिनंदन.

सचिन गौतमे रचला पाया | युवी झालासे कळस||

असे वर्णन करावे लागेल. सुरेश रैनाने देखील अत्यंत महत्त्वाच्या क्षणी येऊन उत्तम फलंदाजी केली त्यामुळेच हा विजय शक्य झाला.

या सामन्यात धोणीचे कॉन्ट्रिब्युशन काय? हा प्रश्न उपस्थित होतोच. लोकांच्या पुण्याईवर जगणारी काही माणसे जगात असतात. त्यांचा लाभेश लग्नात असतो. तसा हा धोण्या.

ऑस्ट्रेलिया जरी हरली तरी रिकीने कर्णधाराला साजेशी खेळी केली. हे आमचं येडझवं ८ चेंडूत ७ धावा काढून गोठ्यात परतलं. धोणी फलंदाजी करतांना जे नयनमनोहर शॉट्स मारतो, ते सोनीच्या जाहिरातीतच. प्रत्यक्ष मैदानावर कधी तसे पहायला मिळत नाही. असो. आनंदाच्या क्षणी धोणीचा विचार नको.

बुधवारचा सामना पाकड्यांबरोबर आहे. तो जिंकलाच पाहीजे. पुढे विश्वचषक नाही जिंकला तरी चालेल पण पाकड्यांना हरवलेच पाहिजे. 

त्या सामन्यासाठी टीम मॅनेजमेंटने ठरवून दिलेल्या स्ट्रॅटेजीप्रमाणे धोणीने खेळावं, स्वतःची अक्कल चोदवायला जाऊ नये, ही आग्रहाची मागणी.

आपला,
(आनंदित) धोंडोपंत


Wednesday, March 23, 2011

एका सेकंदात भविष्यकथन - लेख ९ वा

|| श्री स्वामी समर्थ||
लोकहो,

एक सेकंदात भविष्यकथन या लेखमालिकेतील हा नववा लेख.

नंबरावरून केलेल्या भविष्यकथनाचे गेल्या काही दिवसातील हे अनुभव. यापूर्वीचे लेख आर्चिव्हमध्ये एक सेकंदात भविष्यकथन या शीर्षकाखाली वाचावयास मिळतील.

१) पत्नीला व्हिसा मिळेल का? असा प्रश्न एका गृहस्थाने विचारला. यापूर्वी त्याच्या पत्नीचा इंटरव्ह्यू झाला होता पण तेव्हा तिला व्हिसा नाकारण्यात आला होता. त्यामुळे आता पुन्हा प्रयत्न करण्याच्या खटपटीत तो होता. दोन दिवसांनी तिचा पुन्हा व्हिसासाठी इंटरव्ह्यू होता. आम्ही त्याला नंबर द्यायला सांगितले. त्याने १७९ नंबर दिला.

शंभर टक्के यावेळेस तुझ्या बायकोला व्हिसा मिळेल असे सांगितले. येथे एक हा स्वतः जातक, सात हे पत्नीचे स्थान आणि नवम हे सप्तमाचे तृतीय स्थान आहे. वस्तुत: ती जेव्हा दुसर्‍या वेळेस मुलाखतीला गेली तेव्हा कोणतीही फारशी चौकशी न होता तिला व्हिसा मंजूर झाला.

२) आम्हाला 'समाधान' हा ताकाचा मसाला फार आवडतो. तो घेण्यासाठी सर्वोदय स्टोअर्स येथे गेलो असतांना एक ओळखीचे जोडपे भेटले. सुखी जोडपे असे त्यांचे वर्णन करता येईल. बायकोच्या केसात नुकताच माळलेला मोगर्‍याचा गजरा, बरोबर त्यांची लहान मुलगी. हा माणूस एका राष्ट्रीयकृत बँकेत नोकरीस आहे. त्यामुळे पाच वाजता घरी यायचं, बायकोच्या हातचा शिरा, पोहे, उपमा खायचा, नंतर बायको आणि मुलीला घेऊन फिरायला जायचं, बायकोला गजरा घ्यायचा, रानडे रोडला खरेदी करायची, घरी आल्यावर टिव्ही पहायचा, वेळेवर जेवून झोपून दुसर्‍या दिवशी उठून बँकेत, असं आखीव रेखीव आयुष्य.

 नाहीतर आम्ही तिच्यायला..... दिवसभर लोकांच्या कुंडल्या बघा. घरात बसूनही जेवणाचा पत्ता नाही. दुपारच्या जेवणाला अडीच तीन आणि रात्रीच्या पावणेअकरा अकरा, साडेअकरा काहीही. असो. ज्याचं त्याचं नशीब.

ज्योतिषी भेटला की काहीतरी विचारलेच पाहिजे, असे काहींना वाटत असतं. आम्ही मसाला घेण्याच्या खटपटीत असतांना तो सांगू लागला की, मुलीच्या शाळेच्या ऍडमिशनसाठी एका विख्यात शाळेत प्रयत्न सुरू आहेत. पण त्या दिवसांपर्यंत ज्या याद्या लागल्या त्यात तिचे नाव नाही. तिला मिळेल का ऍडमिशन त्याच शाळेत? असा त्याचा प्रश्न होता. त्याची बायको जीवाचे कान करून धोंडोपंत काय बोलतात हे ऐकायला उत्सुक झालेली दिसत होती. आम्ही त्याला नंबर द्यायला सांगितले. त्याने ५११ नंबर दिला.

नक्की ऍडमिशन मिळेल असे सांगितले. तो म्हणाला, अहो पण आता बहुतेक लिस्ट आऊट झालेत पण हिचे नाव नाही. मोठ्या मेहुण्याच्या (बायकोच्या मोठ्या भावाच्या) तर्फे प्रयत्न कर असे म्हणालो. त्याची बायको म्हणाली, 

" अहो पण माझा मोठा भाऊ तर गेली आठ वर्षे अमेरिकेत असतो. तो काय प्रयत्न करणार यात?"

म्हटलं, त्याला फोन लावून हे सांगा.

घरी गेल्यावर त्यांनी भावाला फोन लावला तर भाऊ म्हणाला की त्याच्या एका मित्राचे वडील त्या शाळेत ट्रस्टी होते. आता ते आहेत की नाही माहीत नाही. पण बघतो.  लगेच फोनाफोनी झाली. भावाने त्याच्या मित्राला फोन लावला. मित्राने त्याच्या वडिलांना सांगितले. ते म्हणाले, उद्या सकाळी ११ वाजता त्यांना शाळेत यायला सांग. 

सगळी सेटिंग झाली. दुसर्‍या दिवशी ऍडमिशन.

इथे पंचमस्थान हे सप्तमाचे लाभस्थान म्हणजे बायकोचा मोठा भाऊ दाखवतो. आणि ११ वे स्थान हे इच्छापूर्तीचे. नंबर किती 'बोलका' असतो हे या उदाहरणावरून समजेल. असो.

३) बायको भांडून तिच्या माहेरी निघून गेलेल्या एका गृहस्थाने, भांडण मिटून ती परत येईल का? असा प्रश्न विचारला. त्याचे आणि बायकोचे नेहमीप्रमाणे काही कारणांवरून कडाक्याचे भांडण झाले होते आणि ती बॅग घेऊन माहेरी निघून गेली होती. यापूर्वीही ती दोन तीन वेळा अशीच माहेरी निघून गेली होती, पण नंतर परतही आली होती. थोडक्यात, पुनर्मीलन होईल का? असा त्याचा प्रश्न होता.

हा प्रश्न आम्ही इराण्याच्या हॉटेलात बसलो असतांना त्याने विचारला त्यामुळे कुंडली बनवता येणार नव्हती. 

आम्ही त्याला म्हटले, तू एक नंबर दे. मग पुढच्या आठवड्यात ये. आपण तेव्हा कुंडली मांडू.

त्याने ७० नंबर दिला. सात पुढे शून्य. वैवाहिक सौख्य संपुष्टात. बायको यावेळेस परत येणार नाही असे सांगितले. 

पुढे चार पाच दिवसात त्याला सेपरेशनची नोटीस मिळाली.

४) एका अति सॉफिस्टिकेटेड माणसाने त्याच्या गाडीबद्दल प्रश्न विचारला. कपड्याची घडी न विस्कटण्याची काळजी घेणारी काही माणसं असतात त्यातला हा येडझवा. स्वतःला फार उच्च दर्जाचा समजणारा.
त्याच्या गाडीचे मोठे काम निघाले होते. याला गाडीतले काही कळत नाही. स्वतःला उच्चभ्रू समजत असल्यामुळे गॅरेजवर स्वतः जाणे त्याच्या स्टेटसला शोभत नाही. अशा लोकांना त्यांचे ड्रायव्हर बरोबर चुना लावतात.

त्याच्या ड्रायव्हरने म्हणे सायन कोळीवाड्यातील एका गॅरेजवाल्याला गाडी दाखवून पंधरा हजाराचे कोटेशन आणले. याला काहीतरी संशय आला म्हणून त्याने आम्हाला विचारले. आम्ही त्याला नंबर द्यायला सांगितले. त्याने ७८५ नंबर दिला.

नंबर ऐकल्यावर ड्रायव्हर तुम्हांला फसवतोय असे सांगितले. या नंबरात सात हे समोरच्या माणसाचे स्थान आणि ८ हे त्याचे धनस्थान व ५ हे त्याचे लाभस्थान.

तो म्हणाला, " काय करू मग?"

म्हटलं, " गांडीवर लाथ घाल ड्रायव्हरच्या आणि संजयच्या गॅरेजवर गाडी घेऊन जा. संजयला आमचे नाव सांग. तिथे गेल्यावर आम्हांला फोन लाव. आम्ही बोलतो संजयशी."

प्रत्यक्षात संजयने गाडीची  ट्रायल घेतल्यावर साडेसात हजारात काम होईल असे सांगितले आणि उत्तम काम करून दिले. माणसं अशी बांधलेली पाहिजेत तर कुठेही अडत नाही.

आपला,
(नंबरी) धोंडोपंत

Monday, March 21, 2011

अंगाई गाऊ किती तुज बाई......

॥ श्री स्वामी समर्थ॥

आरती व माधव खाडिलकरांना कन्यारत्न प्राप्त झाल्याचे त्यांचे पत्र.  मुलीचे नाव मंजिरी व तोषणी ठेवले. दोन्ही नावे मस्त आहेत. आरती व माधवरावांचे अभिनंदन आणि बाळ-बाळंतिणीस आमच्या हार्दिक शुभेच्छा. 


fromMadhav Khadilkar
toधोंडोपंत आपटे
date20 March 2011 21:37
subjectएक शुभ संदेश - आम्हाला मुलगी झाली!!!
mailed-bygmail.com
Signed bygmail.com
hide details 20 Mar (1 day ago)
नमस्कार धोंडोपंत,

एक शुभ संदेश देण्यासाठी हे पत्र लिहित आहे.

दिनांक २४ फेब्रुवारी २०११ सकाळी ९:१५ वाजता, सांगली येथे, आम्हाला (मी आणि आरती) मुलगी झाली.
मुलीचे व्यावहारिक नाव "मंजिरी" आणि औरस नाव "तोषणी" असे ठेवले आहे.

मला एक गोष्ट विशेष नमूद कराविशी वाटते ती म्हणजे, साधारण ३ वर्षांपूर्वी आपण मला आणि आरतीला मार्गदर्शन करताना आपण आम्हाला सांगितले होते कि 'आमचे पहिले अपत्य कन्या असेल आणि delivery Caesarean होईल', आणि अगदी तसेच झाले!

आपल्या मार्गदर्शनाबद्दल आपले शतशः आभार.

तिची पत्रिका तयार करावयाची आहे, आणि  आपले मंजिरी साठी मार्गदर्शन हवे आहे.

आपला कृपाभिलाषी,

माधव विश्र्वनाथ खाडिलकर,
आरती माधव खाडिलकर
 Reply
 Forward
 Invite Madhav Khadilkar to chat

महाराष्ट्रधर्म राहिला काही, तुम्हांकारणे.......

॥ श्री स्वामी समर्थ॥

आमच्या संस्थळाच्या सर्व वाचकांना, जातकांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

लोकहो, शिवाजीमहाराज हे आपले दैवत आहे. शिवजयंती हा आपला सण आहे.

तो हिंदु कालगणनेप्रमाणेच साजरा झाला पाहिजे. इंग्रजी तारखेनुसार नाही. 

रामनवमी म्हटली म्हणजे ती चैत्र शुद्ध नवमीलाच साजरी केली पाहिजे ना?..  ती २४ मार्च आणि २५ मार्चला साजरी करून कसे चालेल? 

तसेच छत्रपतींचे आहे. 

त्यामुळे आपले सण आपल्याच पारंपारिक पद्धतीने आणि कालगणनेनुसार साजरे करा. ते परकीय कालगणनेनुसार साजरे करायचा मूर्खपणा करू नका.

छत्रपतींना आमचा मानाचा मुजरा. तुम्हां सर्वांना शुभेच्छा.

आपला,
(नतमस्तक) धोंडोपंत