Friday, September 30, 2011

वाङ्‌मय शब्द बारहात कसा लिहावा....

॥ श्री स्वामी समर्थ॥

लोकहो,


मागील लेखात वाङ्‌मय हा शब्द बारहामध्ये टंकित कसा करतात ते माहीत नाही असे आम्ही लिहिले होते. त्यावर आमचे कवी व गझलकार स्नेही श्री अविनाश ओगले, बेळगाव, यांचे मार्गदर्शनपर पत्र आले आहे. त्यात वाङ्‌मय हा शब्द बारहात कसा लिहावा हे त्यांनी सांगितले आहे. आपल्यापैकी बहुतेकजण बारहा वापरतात. त्यामुळे सर्व वाचकांच्या माहितीसाठी अविनाशपंतांचे  ते येथे प्रकाशिक करतो. श्री. अविनाशपंतांना धन्यवाद आणि शुभेच्छा.


fromAvinash Ogale
toधोंडोपंत <dhondopant@gmail.com>
date28 September 2011 21:00
subjectVANGAMAAY
mailed-bygmail.com
Signed bygmail.com
Important mainly because of the people in the conversation.
hide details 28 Sep (1 day ago)
पंत नमस्कार

संदर्भ: पण कृष्णमूर्ती वाङ्मयात ती नाही आहेत. (इथे ङ चा पाय मोडायला पाहिजे. पण तशी सोय या प्रणालीत दिसत नाही. असो.)
 
तुम्ही बरहा वापरत असाल तर वाङ्‌मय शब्द लिहिता येतो. पण भलता खटाटोप आहे. आधी vA~gmy असे टाईप करावे. म्हणजे  "वाङ्म्य" हा शब्द तयार होतो. यानंतर left aroow वापरुन कर्सर एकदा वा आणि ङ्म्य यांच्यामध्ये न्यावा. मग right arrow वापरुन पुन्हा शब्दाच्या शेवटी न्यावा. नंतर back space वापरुन म्य हा शब्द खोडून वाङ् एवढाच शब्द ठेवावा. नंतर या शब्दापुढे ^^ ही चिन्हे करावीत.  (shift 6- दोन वेळा. ही चिन्हे उमटत नाहीत. फक्त टाईप करायची.) मग पाय मोडलेला तसाच राहतो. पुढे मय लिहावे.

- (वाङ्‌मयप्रेमी) अविनाश ओगले.
 Reply
 Forward
अविनाश is not available to chat

Thursday, September 29, 2011

करू या उदो उदो उदो अंबाबाईचा....

॥ श्री स्वामी समर्थ॥

करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मातेच्या चरणी विनम्र दंडवत


मायेचा वाहे झरा। शहरी कोल्हापुरा। घेऊया लाभ दर्शनाचा॥
करूया उदो उदो। उदो अंबाबाईचा॥

ब्लॉगाच्या सर्व वाचकांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.
आई जगदंबेच्या कृपेने तुमचे सर्व मनोरथ सिद्धिस जावोत ही प्रार्थना.
आपला,
(शुभचिंतक) धोंडोपंत

Wednesday, September 28, 2011

मुक्तक

॥ श्री स्वामी समर्थ॥

तुझ्या प्रीतिच्या झुळुकेने मी तरंग झालो
प्रतिभेचे आभाळ लाभले विहंग झालो
सर्वस्वाची दिली आहुती तुझ्याचसाठी
ज्वाला तू जाहलीस तेव्हा पतंग झालो.....मंगळ -नेपच्यून षडाष्टक - अनुभव


॥ श्री स्वामी समर्थ॥

fromSachin Kulkarni
toधोंडोपंत <dhondopant@gmail.com>
date25 September 2011 10:10
subjectRe: Consultancy
mailed-bygmail.com
Signed bygmail.com
Important mainly because of the people in the conversation.
hide details 25 Sep (3 days ago)
Pant,
 
Aplya blogvar Mangal Neptune shadashtaka baddal atta vachle. Surprisingly, kal amchya gharat gas thoda leak houn ( stove bighadlyamule) chhoti ka hoina pan aag lagli hoti. 

Apan mahan ahat. Abhar for the update on the blog !!
 
Aapla Pankha,
 
Sachin
- Show quoted text -
 Reply
 Forward
Sachin is not available to chat

मुक्तक...

॥ श्री स्वामी समर्थ॥

लोकहो, 


स्वार्थी लोकांचं कोंडाळं आपल्या प्रत्येकाच्या भोवती असतं. विशेषकरून तुमच्याकडून लोकांचा जेवढा जास्त फायदा होत असेल तेवढे तुमच्याभोवती स्वार्थी लोकं जास्त.त्यातून तुम्ही ज्योतिषासारखे लोकांच्या भल्याचे काम करत असाल तर बघायलाच नको. पण ज्यांना आपण आपले समजतो, त्यापैकी काही लोक, त्यांचे स्वार्थ जपण्यासाठीच आपल्याशी संधान बांधत असतात. तुमच्याकडून त्यांच्या स्वार्थांना मिळणारी रसद जेव्हा थांबते, तेव्हा त्यांची खरी रूपं उघड होतात. उसके हवाले से ये बात कही है ।


तुझ्याभोवती जमले स्वार्थी बगळे आता 
वस्त्र समजुनी मिरवतोस का ठिगळे आता 
आभासावर किती काळ जगशील ’अगस्ती’ 
टाक तोडुनी बंध येथले सगळे आता

 ---- धोंडोपंत

Tuesday, September 27, 2011

महादशास्वामीचा उपनक्षत्रस्वामी-- अत्यंत महत्वाचा ग्रह

|| श्री स्वामी समर्थ||
लोकहो,

कुंडलीतील सर्वात महत्त्वाचा ग्रह कोणता? असा प्रश्न विचारल्यास वेगवेगळी उत्तरे मिळतील. पारंपारिक ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केलेले लोक म्हणतील लग्नेश सर्वात महत्त्वाचा, कोणी म्हणेल भाग्येश सर्वात महत्त्वाचा, कुणी म्हणेल दशमेश, कुणी म्हणेल लाभेश तर कुणी म्हणेल पंचमेश.

काही जण म्हणतील माणसाची सर्व धडपड ही सुखासाठी आहे. त्यामुळे सुखेश सर्वात महत्त्वाचा. अनेक उत्तरे येतील.

पण यापैकी एकही उत्तर अचूक नाही, हे आम्हांला सांगू द्या. लोकांची अशी समजूत असते की कुंडलीतले बाराच्या बारा ग्रह रात्रंदिन फळे देत असतात. तसे नाहीये.

कुंडलीतील सर्वात महत्त्वाचा ग्रह म्हणजे महादशास्वामी. त्याहून महत्त्वाचा कोणताही ग्रह नाही. महादशास्वामी जे काही देतो तेच आणि तेवढेच माणसाला त्या महादशेत मिळते. 

पत्रिकेत विवाहाचे कितीही प्रबळ योग असतील, पण महादशास्वामी जर विवाहाला विरोधी भूमिका घेत असेल, तर त्या महादशेत आकाश-पाताळ एक केलं तरी विवाह होत नाही.

पत्रिकेत धनार्जनाचे कितीही उच्च योग असतील, पण महादशास्वामी जर २/ ६/ १०/ ११ या स्थानांऐवजी,  ५ / ८/ ९/ १२ या स्थानांचा बलवान कार्येश असेल, तर त्या माणसाने कितीही गांड आपटली तरी त्याला पैसा मिळत नाही.

माणसाला कोणतं सुख द्यायचं आणि कोणतं द्यायचं नाही, हे महादशास्वामी ठरवतो.

या महादशास्वामीबरोबरच त्याचा उपनक्षत्रस्वामी हा महत्त्वाचा ग्रह आहे. दुर्दैवाने महादशास्वामीच्या उपनक्षत्रस्वामीबद्दल आजपर्यंत फारसे लेखन झालेले नाही. कारण त्याला अनेकदा गृहीत धरले जाते. 

कृष्णमूर्ती पद्धतीच्या क्लासमध्येसुद्धा या ग्रहाचे महत्त्व विद्यार्थ्यांना नीट समजावून सांगितले जात नाही.  नुसता महादशास्वामी एखाद्या घटनेचा कितीही बलवान कार्येश असेल, पण त्याचा उपनक्षत्रस्वामी जर त्या घटनेसंबंधीत भावाचा कार्येश नसेल तर, ती घटना त्या महादशेत घडत नाही. 

कृष्णमूर्तींनी असे म्हटले आहे की, the nature of results will be decided by the sub-lord of the dasha lord. हे वाक्य फार मोघम आहे. या विधानाचा उहापोह करण्यासाठी बरीच उदाहरणे द्यायला हवी होती. पण कृष्णमूर्ती वाङ्मयात ती नाही आहेत. (इथे ङ चा पाय मोडायला पाहिजे. पण तशी सोय या प्रणालीत दिसत नाही. असो.)

खालील कुंडली आम्ही काल पाहिली. या कुंडलीत विवाहाचा योग शंभर टक्के आहे. सप्तमाशी शनीचा संबंध आहे, त्यामुळे उशीरा विवाह होईल असे म्हणू शकतो. पण उशीरा म्हणजे किती. तीस बत्तीस पर्यंत तर व्हायलाच हवा.


या कुंडलीला १९८८ ते २००७ शनीची महादशा होती. म्हणजे त्याच्या वयाच्या २२ ते ४१ पर्यंत. शनी स्वतः सप्तमात आहे आणि सप्तमेशही आहे. म्हणजे शनी महादशेत विवाह व्हायलाच हवा. शनीची दशा २००७ ला संपली. पण त्यात विवाह झाला नाही. २००७ साली या माणसाचे वय ४१ वर्षे होते. 

त्यानंतर आता बुध महादशा सुरू झाली आहे. बुध स्वतः २/११ या विवाहासाठी आवश्यक असलेल्या स्थानांचा मालक आहे. तसेच तो सप्तमस्थ आणि सप्तमेश शनीच्या नक्षत्रात आहे. आता अजून काय पाहिजे याचं लग्न व्हायला? पण अजूनही त्याचा विवाह झालेला नाही. आज या माणसाचे वय ४५ वर्षे आहे.

ज्यांना ज्यांना याची पत्रिका दाखवली असेल, त्यांनी वरील गोष्टी पाहून भरमसाठ भाकिते केली असतील. विशेषतः जे लोक  नवखे असतात, त्यांना अशी भाकिते करतांना तर फार उचंबळून येतं. " नया नया मुसलमान, ज्यादा अल्लाह अल्लाह करता है" अशी म्हण आहे. तसे हे नवीन केपी शिकलेले महाभाग असतात. सहा महिने केपी शिकल्यावर ते स्वत:लाच कृष्णमूर्ती समजायला लागतात. 

क्लासमध्ये शिकवलेलं असतं की सप्तमाचा सबलॉर्ड जर २/७/११ यापैकी एका स्थानाचा कार्येश असेल तर विवाह होतो. यापैकी एक स्थान लागलं तरी होणारचं. पण क्लासमध्ये पुढच्या गोष्टी शिकवत नाहीत. 

२/७/११ लागले म्हणजे विवाह होईल, हे फार बाळबोध ज्ञान झालं. २/७/११ लागूनही विवाह होणार नाही याचे कारण काय? हा पुढच्या चिंतनाचा विषय आहे. असो.

तर असं का व्हावं? दोन्ही महादशास्वामी आवश्यक त्या स्थानांचे बलवान कार्येश असून विवाह का नाही झाला? 

याचं कारण हे की दोन्ही महादशास्वामी चंद्राच्या उपनक्षत्रात आहेत आणि चंद्र विवाहासाठी आवश्यक असलेल्या एकाही स्थानाचा कार्येश नाही. खरं तर चंद्र राहूच्या नक्षत्रात आहे. राहू आणि केतूशी जेव्हा संबंध येतो तेव्हा तो ग्रह अनेक स्थानांचा कार्येश आपोआप होतो. असे असूनही चंद्र विवाहासाठी आवश्यक असलेल्या एकाही स्थानाचा कार्यश होत नाही.

याला दुर्दैव नाही तर अजून काय म्हणायचं?

आपला,
(मर्मग्राही) धोंडोपंत

मेरे नसीब में तू है कि नहीं, तेरे नसीब में मैं हूं कि नहीं...


|| श्री स्वामी समर्थ||
लोकहो,

ज्योतिष हे असे क्षेत्र आहे की, त्यात मानवी जीवनाच्या आत्यंतिक खाजगी गोष्टींचा संबंध येतो. एखाद्या चार्टर्ड अकाऊंटंटकडे गेल्यावर माणूस त्याच्या पैशांबद्दल बोलेल, वकीलाकडे गेल्यावर त्याच्या कायदेशीर अडचणींबद्दल बोलेल, डॉक्टरकडे गेल्यावर फक्त रोगांबद्दल बोलेल. पण ज्योतिषाकडे कुठल्याही विषयाच्या मर्यादा नाहीत. प्रमोशन होईल का? इथपासून ते प्रेमप्रकरणात यश मिळेल का? इथपर्यंत कुठलेही प्रश्न ज्योतिषाला विचारता येतात, विचारले जातात.

त्यामुळे प्रत्येक ज्योतिषाने अत्यंत उच्च व्यावसायिक मूल्ये पाळण्याची नितांत आवश्यकता आहे. कुठल्याही परिस्थितीत जातकाच्या खाजगी जीवनाबद्दलची माहिती, त्याने कुठेही, कधीही सांगू नये. आम्ही स्वतः अत्यंत उच्च दर्जाची व्यावसायिक मूल्ये पाळणार्‍यातले आहोत. ब्लॉगावर ज्या कुंडल्या प्रसिद्ध केल्या आहेत, त्या करतांना, सबंधीत जातकाची परवानगी घेऊनच केलेल्या आहेत. अभिप्रायाच्या बाबतीत थोडी वेगळी परिस्थिती आहे. भाकीताचे परिणाम काय झाले, हे जातक जेव्हा स्वतः पत्र लिहून कळवितो, तेव्हा त्या पत्रात जर तसे नमूद केले नसेल, तर प्रसिद्धीसाठी असते.

पण पत्रिका प्रकाशित करतांना, जातकाची परवानगी घेऊनच ते केले पाहिजे. तसेच जातकाच्या खाजगी गोष्टी, ज्या ज्योतिषाला माहीत आहेत, त्या गोष्टींची वाच्यता त्याने प्राण गेला तरी जगात कुठेही करता कामा नये. ही मूल्ये आम्ही पाळतो म्हणूनच लोक निर्धास्तपणे त्यांचे अत्यंत खाजगी प्रश्न आम्हांला विचारतात.

दिनांक १४ सप्टेंबर रोजी एक मुलगी आमच्याकडे एक प्रश्न घेऊन आली. तिचे एका तरूणाबरोबर प्रेम प्रकरण सुरू होते आणि काही दिवस त्याला वेगळे वळण लागले होते. त्यांच्यात असलेला जिव्हाळा त्या मुलाकडून लोप पावत असल्याची जाणीव तिला झाली. अशा परिस्थितीत जर समोरची व्यक्ती मागे जात असेल, तर आपण पुढे जायचे का? हा अत्यंत गंभीर प्रश्न तिच्यापुढे निर्माण झाला. तिने आम्हाला फोन करून परिस्थितीची कल्पना दिली. आम्ही हा प्रश्न प्रश्नकुंडलीच्या आधारे सोडवला.

तिचा प्रश्न होता, त्या ठराविक व्यक्तीबरोबर असलेले प्रेमसंबंध अबाधित राहतील का? त्या प्रेमसंबंधातून यश मिळेल का? आम्ही तिला नंबर द्यायला सांगितले. तिने १३२ नंबर दिला.

नंबर ऐकल्यावरच, कुंडली नकारात्मक उत्तर देणार हे आम्हाला समजले. कारण या नंबराची एक अंकी बेरीज ६ येते जे समोरच्या व्यक्तीकडून मिळणार्‍या सुखाचे नकारात्मक स्थान आहे.

इथे प्रश्न नीट समजून घ्या. माझे प्रेमप्रकरण होईल का? किंवा मला माझ्यावर प्रेम करणारी व्यक्ती भेटेल का? असा प्रश्न इथे नाहीये. तर विवक्षित व्यक्तीबरोबर असलेले प्रेमप्रकरण यशस्वी होईल का? असा प्रश्न आहे. आम्ही १३२ नंबराची प्रश्नकुंडली मांडली जी खाली दिली आहे.


प्रश्नकुंडलीत चंद्र हा जातकाच्या मनाचे प्रतिनिधित्व करतो. इथे चंद्र षष्ठात असून तो व्ययेश बुधाच्या नक्षत्रात आहे. त्यामुळे त्याचा सहा बारा या स्थानांशी संबंध कुंडली दाखवते. ही स्थाने जोडीदाराचे सौख्य बिघडवणारी स्थाने आहेत. म्हणजे या मुलीने प्रश्न मनापासून विचारला आहे.

याप्रश्नासाठी नियम असा की - पंचमस्थानाचा उपनक्षत्रस्वामी मार्गी ग्रहाच्या नक्षत्रात असून तो ५ किंवा ११ या स्थानाचा कार्येश असावा. तसेच तो उपनक्षत्रस्वामी किंवा त्याचा नक्षत्रस्वामी यापैकी एक ग्रह तरी स्थिर राशीत असावा. तसेच यापैकी कोणताही ग्रह द्विस्वभाव राशीत नसावा किंवा तो बुध नसावा.

या कुंडलीत पंचमाचा उपनक्षत्रस्वामी शनी आहे. शनी प्रश्नवेळी मार्गी आहे. तो चंद्राच्या नक्षत्रात आहे. चंद्र नेहमीच मार्गी असतो.

पण शनी हा ग्रह कन्या या द्विस्वभाव राशीत आहे तसेच त्याचा नक्षत्रस्वामी चंद्र हासुद्धा मीन या द्विस्वभाव राशीत आहे. त्यामुळे या मुलाबरोबरचे तिचे प्रेमप्रकरण यशस्वी होणार नाही. तसेच शनी स्वतः व्ययात असून तो षष्ठस्थ चंद्राच्या नक्षत्रात आहे. शनि सप्तमाचा उपनक्षत्रस्वामीदेखील आहे. त्यामुळे हे प्रकरण पुढे नेले आणि अगदी विवाहापर्यंत ताणले तरी तो विवाहही टिकणार नाही, असे उत्तर येते.

आम्ही तिला तसे सांगितले. नकारात्मक उत्तर ऐकल्यावर ती निराश होईल असे वाटले. पण ज्योतिषाने जे वास्तव आहे, ते सांगितले पाहिजे कारण पुढे जाऊन तसेच घडणार आहे. एक झालं, की या कुंडलीमुळे तिच्या मनातले काहूर शांत झाले. जो आपला नाहीच त्याचा विचार आपण करण्यात काही अर्थ नाही, हे तिला उमगल्यामुळे ती लवकरच यातून बाहेर येऊ शकेल.

जेव्हा जेव्हा, इच्छित व्यक्तिबरोबर प्रेमसंबंध फुलतील का? इच्छित व्यक्तीशी विवाह होईल का? असे प्रश्न विचारले जातात, त्याचे उत्तर प्रश्नकुंडलीवरूनच द्यावे.

नंतर जेव्हा त्या मुलाची कुंडली आम्ही पाहिली, तेव्हा त्याच्या पत्रिकेत अशा स्वरुपाचे सौख्य त्याचा सध्याचा आणि पुढचा महादशास्वामी देत नाही, हे कळले.

प्रश्नकुंडली किती अचूक उत्तर देते याचे हे उदाहरण.आम्हांला ते गाणे आठवले.

मेरे नसीब में तू है कि नहीं, तेरे नसीब में मैं हूं कि नहीं
ये हम क्या जाने, ये वो ही जाने
जिसने लिखा है सबका नसीब,,,,

आपला,
(विचक्षण) धोंडोपंत

Friday, September 23, 2011

चारही भारतीय संघांना आयसीसी स्पर्धेसाठी शुभेच्छा...

॥ श्री स्वामी समर्थ॥

लोकहो,


कुठलीही मोठी क्रिकेटस्पर्धा सुरू होतांना, आम्ही आमच्या हस्ताक्षरात भारतीय संघाला शुभेच्छा देतो, हे आपण जाणताच.


आजपासून आयसीसी कप सुरू होत आहे. त्यासाठी चारही भारतीय संघांना आमच्या हस्ताक्षरात आमच्या शुभेच्छा. 


आपला,
(प्रेक्षक) धोंडोपंत

तू साजणा, काय शोकार्त होशी, हिची मांडतांना, तिथे कुंडली..


|| श्री स्वामी समर्थ||
लोकहो,


विवाह जुळवितांना जे गुणमेलन केले जाते त्याबद्दल आम्ही अनेकदा या ब्लॉगावर लिहिले आहे. केवळ वधु-वराच्या नक्षत्रांना दिलेल्या गुणांचे विपर्यस्त अर्थ काढून, २८/३०/३३ गुण जमतात म्हणजे त्यांचा संसार सुखाचा होईल, अशा भ्रमात राहू नये, हे आम्ही वेळोवेळी विविध कुंडल्यांची उदाहरणे देऊन वाचकांच्या निदर्शनास आणले आहे. पत्रिकामेलन हा गंभीर विषय आहे. दोन व्यक्तींच्या आयुष्याचा प्रश्न आहे. इतक्या गहन प्रश्नाची सोडवणूक एका एकपानी कोष्टकाच्या आधारे धोपटपणे करणे म्हणजे त्या दोघांच्या आयुष्याशी खेळण्यासारखे आहे.


त्यासाठी पारंपारिक गुणमेलनाला सोडचिठ्ठी देऊन, सखोल पत्रिकामेलन केले पाहिजे. दोघांच्या पत्रिकेत वैवाहिक सौख्य, संतती सौख्य, आयुष्ययोग, करिअर आणि स्वभाव या गोष्टी कशा आहेत ते पाहिले पाहिजे. दोघांच्याही जीवनात विवाहानंतर येणार्‍या किमान २०/२५ वर्षांच्या महादशा कोणते सुख दाखवतात, कोणते नाकारतात हे पाहिले पाहिजे. तसेच दोघांचीही लैंगिक क्षमता आणि भूक काय आहे व ती भागविण्याचे दोघांचेही मार्ग समान आहेत का? याचाही विचार करणे अत्यंत आवश्यक आहे. 


एखाद्या पत्रिकेत शुक्र हर्षलने बिघडला असल्यास त्या व्यक्तीच्या संभोगाच्या आवडीनिवडी विचित्र असतात. त्याला विकृती म्हणायचे का? विकृती म्हणता नाही येणार खरतरं. विकृतीसाठी त्यावर अजून एखाददोन कुयोग पाहिजेत. पण विचित्रपणा असतो. दुसर्‍या व्यक्तीच्या पत्रिकेत तसेच योग असतील तर दोघांनाही त्यातून आनंद मिळतो. अन्यथा एकाचा आनंद हा दुसर्‍याचा त्रास ठरू शकतो. 


एवढ्या प्रगल्भतेने विचार केल्याशिवाय केवळ गुणमेलन कोष्टकाच्या आधारे पत्रिका जुळवणे हे बेजबाबदारपणाचे काम आहे. असो.


तसेच महादशास्वामी हा वैवाहिक सौख्याला विरोध करणार्‍या स्थानांचा किती बलवान कार्येश आहे हे ही पाहिले पाहिजे. हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. दशा कितीही चांगली असली आणि महादशास्वामी हा षष्ठस्थानाचा (वैवाहिक सौख्याचे सर्वात नकारात्मक स्थान) एकमेव बलवान कार्येश असेल तर लग्न टिकत नाही. किती लोक हा विचार गुणमेलन करतांना करतात?


खालील पत्रिका घेऊन आमची एक जातक मुलगी पत्रिकामेलनासाठी आली. गुणमेलन कोष्टकात पहा किती छान गुण जमत आहेत ते.


या दोन पत्रिकांचे २६ गुण जुळत आहेत. म्हणजे ७२ टक्के. नाडी एक असून. मघा ४ आणि पूर्वाषाढा २ यांचा पादवेध होत नाही. त्यामुळे त्याचे ८ गुण धरले जातात. म्हणजे ३४ गुण समजा.


मुलाच्या महादशा बघा

कुंडलीला सध्या चंद्राची महादशा सुरू आहे. १४/०५/२०१० ते १४/०५/२०२०. त्याची कुंडली खाली दिली आहे. ज्यावरून चंद्राचे कार्येशत्व लगेच कळेल.
 चंद्र स्वतः सप्तमात आणि षष्ठेश. चंद्र लाभातल्या केतुच्या नक्षत्रात. केतु स्वनक्षत्री त्यामुळे तो उपनक्षत्रस्वामी शनीची फळे देईल. शनी स्वतः भाग्यात आणि लग्नेश व्ययेश. केतु गुरूच्या राशीत आहे. त्यामुळे तो गुरूची सर्व फळे देईल. गुरू स्वतः दशमात धनेश आणि लाभेश. गुरू शनीच्या नक्षत्रात शनी आधी सांगितल्याप्रमाणे.


म्हणजे महादशास्वामी चंद्र हा विवाहासाठी आवश्यक असलेल्या २/७/११ या तीनही स्थानांचा कार्यश आहे. म्हणजे विवाह होईल. सहा बाराशी संबंध असल्यामुळे वैवाहिक जीवनात मतभेद होतील पण दोन, सात, अकरा लागल्यामुळे लग्न करायला हरकत नाही. म्हणजे वैवाहिक सौख्य मिळेल. म्हणजे नल-दमयंतीसारखा संसार होईल. आनंदी आनंद गडे. लवकर मांडव घाला आणि बार उडवा.


इथे पत्रिकामेलन संपत नाही. ही झाली प्राथमिक पायरी. जरा चंद्राच्या कार्येशत्वाकडे नीट नजर टाका.


चंद्र षष्ठेश आहे. षष्ठात कुठलाही ग्रह नाही. चंद्राच्या नक्षत्रात कुठलाही ग्रह नाही. चंद्राच्या उपनक्षत्रात कुठलाही ग्रह नाही.


अशा वेळेस चंद्र षष्ठस्थानाचा एकमेव बलवान कार्येश होतो. 


घटनेला सर्वात विरोधी भावाचा जेव्हा महादशास्वामी हा एकमेव बलवान कार्येश असतो....  तेव्हा त्या घटनेचे सुख तो माणसाला मिळू देत नाही.


या माणसाचा विवाह होईल पण तो टिकणार नाही. दुसरं केलनं तर ते ही मोडेल. तिसरे केलनं तर ते ही मोडेल. अशी पुढची दहा वर्षे आहेत.


काय सांगू त्या मुलीला विवाह कर याच्याशी म्हणून????


आमचं संपूर्ण समाधान झाल्याशिवाय आम्ही होकार देत नाही. अशाही घटना घडतात की सात आठ पत्रिकामेलनाला आम्ही नकार दिला की काही जणं म्हणतात, " नको ते पंत. दरवेळेस नाहीच सांगतात. दुसर्‍या कोणाकडून तरी करून घेऊ. दर वेळेला स्थळं घेऊन जायचं आणि जमत नाही म्हणून सोडून द्यायचं."


आम्हाला काहीही फरक पडत नाही कुणी नाही आलं तर. आम्ही अनेकांना सांगतो की, " आमच्याकडे येऊ नका. तुमचे काम दुसर्‍या कुणाकडून तरी करून घ्या." विशेषतः कुणी आमच्याशी कधी वेगळ्या पद्धतीने बोललं की हेच सांगतो की, " बाबा तू दुसर्‍या कुणाकडे जा. आपले काही जमणार नाही."  


२४ तास पुरेल इतके काम आमच्यापाशी आठवड्यातले सात दिवस, महिन्यातले तीस दिवस आणि वर्षातले तीनशे पासष्ठ दिवस असतं. आम्हाला काय फरक पडणार आहे कुणी नाही आलं तर?


पण हेच लोक पुढे पस्तावल्यानंतर परत येतात. "चुकलो पंत, माफ करा" अशा विनवण्या करतात. पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. असो.


सखोलपणे पत्रिका न पाहता वरवर गुण पाहून जमवलेले विवाह तुटतांना जेव्हा आम्ही पाहतो, तेव्हा आमचं मन विषण्ण होतं. काहीच सुचत नाही. एखादी पंचवीस,तीस वर्षाच्या मुलीची पत्रिका समोर असते... तिच्या उद्ध्वस्त झालेल्या संसाराबद्दल तिने विचारलेले असते आणि तिची झालेली परवड ऐकून, मनातला शोक, दु:ख आणि खिन्नता लपविण्याचा प्रयत्न करत आम्ही तिची कुंडली पहात असतो. 


शेजारी बायको येऊन उभी राहिलेली असते. आमचा मूड लपत नाही. काहीतरी गंभीर आहे हे बायको ओळखते.  खुणेनेच काय झालं? म्हणून विचारते. तेव्हा ती ग्रेसच्या ओळी म्हणतेय असा भास होतो. 


संध्या कधी, मत्तमयुराप्रमाणे, अलंकारिते दग्ध, मेघावली
तू साजणा, काय शोकार्त होशी, हिची मांडतांना, तिथे कुंडली.....


आपला,
(शोकाकुल) धोंडोपंत

Saturday, September 17, 2011

मंगळ- नेपच्यून षडाष्टक

॥ श्री स्वामी समर्थ॥
लोकहो,

आजच्या मंगळ - नेपच्यून षडाष्टकाच्या बातम्या यायला लागल्या आहेत. त्या जसजशा येतील त्याचे दुवे आम्ही येथे देऊ.

.

http://timesofindia.indiatimes.com/world/china/China-restaurant-blast-injures-29-State-media/articleshow/10009083.cms


http://timesofindia.indiatimes.com/world/rest-of-world/Three-dead-50-hurt-in-multiple-Thai-south-bombs/articleshow/10008725.cms


आपले हरितात्या नावाचे वाचक आहेत नागपूरचे. त्यांनी पाठविलेली ही लिंक.  http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/10031558.cms


http://timesofindia.indiatimes.com/india/East-north-India-quake-6-dead-and-counting/articleshow/10032252.cms


http://timesofindia.indiatimes.com/world/south-asia/Panic-as-quake-kills-5-in-Nepal/articleshow/10032214.cms


http://timesofindia.indiatimes.com/world/pakistan/US-drone-crashes-in-Pakistan-security-officials/articleshow/10028918.cms


आमचे जातक श्री. मंदार इंगळे यांनी मंगळ -नेपच्यून षडाष्टकाच्या बंगलोर येथील वायूगळतीच्या परिणामांबद्दल पाठविलेली ही लिंक
http://www.ndtv.com/article/cities/marriage-hall-collapses-in-bangalore-after-cylinder-blast-135274


आमच्या जातक सौ. विनया प्रधान यांनी तारापूर येथील वायूगळतीसंदर्भात पाठविलेली ही लिंक
http://articles.timesofindia.indiatimes.com/2011-09-21/india/30184226_1_leakage-of-poisonous-gas-hydrogen-sulphide-gas-thane-district


ही टेक्सटाईल मिल ला लागलेली आग. मंगळ-नेपच्यूनच्या अशुभयोगात आगीशी संबंध असतो हे तुम्हांला माहीत आहेच.
http://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/Fire-in-Maharashta-textile-mill-four-dead/articleshow/10075093.cms

मंगळ - नेपच्यून षडाष्टक

॥ श्री स्वामी समर्थ॥

लोकहो,


धोंडोपंत उवाच या तुमच्या आवडत्या ब्लॉगावर बदलत्या ग्रहयोगांच्या परिणामांबद्दल आम्ही भाष्य करत असतो. त्याचा अनुभव येतोच येतो. गेल्या पंधरवड्यातील शनी मंगळ केंद्रयोगाचे परीणाम ताजे आहेतच. 


असाच एक योग आज आहे. तो म्हणजे मंगळ - नेपच्यून षडाष्टक. याचा संबंध अग्नी, विद्युत, ऍसिड, विषारी वायू यांच्याशी आहे. 


या योगामुळे आगी लागण्याची, शॉर्ट सर्किट होण्याची, विजेचा धक्का बसण्याची, वायूगळती होण्याची, तसेच रसायनांचा स्फोट होण्याची शक्यता असते.


त्यामुळे येत्या काळात विद्युत उपकरणे जपून हाताळा. महिलांनी स्वयंपाकघरात गॅसजवळ वावरतांना विशेष काळजी घ्यावी. तसेच लहान मुलांना विद्युत उपकरणांपासून दूर ठेवावे. इलेक्ट्रिक शॉक बसण्याचे प्रमाण या काळात जास्त असते. 


वर सांगितलेली काळजी घ्या.


आपला,
(सर्वांचे सर्वकाळ भले चिंतणार) धोंडोपंत


 

Thursday, September 15, 2011

लो फिर तेरे लबों पे उसी बेवफ़ा का ज़िक्र...


|| श्री स्वामी समर्थ||
लोकहो,

सकाळी परवाच्या एका प्रश्नकुंडलीबद्दल लिहायचे वचन दिले होते. मध्येच पवन स्वामीच्या मित्राबद्दल लिहिले. त्या दिलेल्या वचनानुसार, परवाची ही प्रश्नकुंडली.

काही लोक आपल्या राशीला लागतात. श्रीकांतच्या बाबतीतही तसेच झाले. त्याचा घटस्फोट होऊन दोन वर्षे उलटली तरी त्याची प्रथम पत्नी अजून त्याच्याशी संपर्क साधते, भांडते, पुन्हा लग्न करूया म्हणते, वगैरे वगैरे. 

खरे तर आम्ही तिची पत्रिका पाहिली तेव्हाच त्याला सांगितले होते की, नशिबाने हिच्यातून बाहेर आला आहेस, आता पुन्हा तिच्यात गुंतू नकोस. आयुष्याचं मातेरं करून घेशील. नवीन मुलगी बघ. लग्न कर आणि मोकळा हो.

पण ही बया त्याला सोडेल तर शपथ. ती सारखे त्याला फोन करून इमोशनल टेपा देते आणि हा हडबडतो. मध्येच त्याला वाटायला लागतं की हिच्याशी पुन्हा विवाह केला तर? पण तिचं एकंदर व्हिम्झिकल वागणं, तिचे राडे, भांडणं त्याला आठवतात आणि पुन्हा तो विचार डोक्यातून जातो. 

गेले काही दिवस तर तिने त्याला इतका त्रास दिला की त्याने आम्हाला प्रश्न विचारला की, "पंत, मी पुन्हा तिच्याशी लग्न केलं तर चालेल का?" 

आम्ही त्याला म्हटले, " तुला आम्ही आधीच सांगितले आहे की ती सायको आहे. त्या येडीच्या नादाला कुठे लागतोस. आत्तापर्यंत काशी करून घेतलीस ना? आता कायदेशीर घटस्फोट झालाय तर सुखाने जग ना."

आणि समजा उद्या केलं लग्न आणि तिने टाकली ४९८ए ची एखादी बोगस केस तुझ्यावर की झाली तुझ्या आयुष्याची काशी.

परवा दिनांक १३ सप्टेंबर रोजी त्याने फोन करून फायनल डिसिजन घेण्यासाठी प्रश्न विचारला. आम्ही त्याला नंबर द्यायला सांगितले. त्याने १०७ नंबर दिला. नंबर ऐकल्यावरच आम्हाला उत्तर मिळालं. आम्ही प्रश्नकुंडली बनवली ती खाली देत आहोत.या कुंडलीत चंद्र स्वतः सप्तमात आहे. म्हणजे जातकाचा विवाहाबद्दलचा प्रश्न कुंडली व्यवस्थित दाखवते आहे.

या कुंडलीचा सप्तम भावाचा उपनक्षत्रस्वामी मंगळ आहे. मंगळ स्वतः लाभस्थानात आहे, तृतीयेश आणि अष्टमेश आहे. मंगळ स्वतः प्रश्नवेळी मार्गी आहे.  पण.........  मंगळ गुरूच्या नक्षत्रात आहे आणि गुरू वक्री आहे...........

पुढे काहीही बघायची गरज नाही. हिच्याशी लग्न करणे म्हणजे स्वतःची काशी करून घेणे, या पलिकडे काही नाही.

आम्ही श्रीकांतला नि:संदिग्धपणे तसे सांगितले. आमचे म्हणणे ऐकल्यावर त्याचाही ताण एकदम कमी झाला. तो पोपटासारखा मनातलं बोलायला लागला. श्रीकांतचे आणि आमचे जे संभाषण झाले, त्यातला काही भाग खाली देत आहोत.


Fromश्रीकांत 
todhondopant@gmail.com
date13 September 2011 16:26
subjectChat with श्रीकांत 
mailed-bygmail.com 
hide details 13 Sep (2 days ago)
16:26              me: मिळाली काय कुंडली?
 श्रीकांत: hoy..thanks
 me: तिला वन्स फॉर ऑल सांगा की भोसड्यात जा म्हणून
  होती तेव्हा घटस्फोट घेतला
  आता अजून कुठे डोक्याला ताप देतेस म्हणावं
16:27 श्रीकांत: Nakki pant...he final ...aata tap nakoy
 me: मग
  किती वेळा सांगितलं तुम्हाला नका पडू या चिखलात
 श्रीकांत: till now thinking she will change..but not even 1%
16:28 me: आम्ही तुम्हांला खूप पूर्वी सांगितले आहे की हिचा नाद सोडा
  आज प्रश्नकुंडलीने नि:संदिग्ध उत्तर दिले आहे
 श्रीकांत: aata nahi janar parat thichya samparkat
 me: आता नाद नका करू
  शुभेच्छा
 श्रीकांत: thanks
 me: कुंडली ब्लॉगवर टाकतो
 Reply
 Forward
Reply by chat to श्रीकांत

अहमद फ़राज़चा शेर आहे:-

उसको जुदा हुए भी ज़माना बहोत हुआ
अब क्या कहें ये किस्सा पुराना बहोत हुआ

लो फिर तेरे लबों पे उसी बेवफ़ा का ज़िक्र
’अहमद फ़राज़’ तुझसे कहा ना बहोत हुआ