|| श्री स्वामी समर्थ||
लोकहो,आजचा लेख एका वेगळा विषयावर आहे. यात दशाफळाचा विचार आहे. हा लेख नीट वाचा. समजून घ्या. म्हणजे तुम्ही चुकीचे ग्रह करून घेणार नाही.
माणसाच्या आयुष्यात घटना घडतात त्या त्याला लाभलेल्या ग्रहस्थितीनुसार. ज्योतिष सांगणे म्हणजे कुठल्या गोष्टी कुठल्या कालखंडात घडणार आहेत त्याचा ऍनॅलिसिस करणे. तसेच जातकाला कुठली सुखे आयुष्यात मिळणार आहेत आणि कुठली मिळणार नाहीत याचा अंदाज घेणे म्हणजे भविष्यकथन करणे.
जेव्हा एखादी दशा सुरू होते, तेव्हा तो दशास्वामी ज्या स्थानांचा कार्येश असतो, त्याच बाबतीत त्या दशेत घटना घडते. ज्या स्थानांचा तो दशास्वामी कार्येश नसतो, त्या बाबतीत कुठलीही फळे त्या कालखंडात मिळत नाहीत. तसेच जर तो दशास्वामी घटना घडविणार्या स्थानांबरोबर, घटनेला विरोध करणार्या स्थानांचा जर बलवान कार्येश असेल, तर ती घटना घडता घडता फिस्कटते, त्यातून कुठलेही सुख त्या व्यक्तीला मिळत नाही.
वरचा मजकूर नीट समजेपर्यंत पुन्हा पुन्हा वाचा.
समजा एखाद्याला घर घ्यायचे आहे. तर जो दशास्वामी घरासाठी आवश्यक असलेल्या ४/११/१२ या स्थानांचा चांगला कार्येश असेल त्या कालखंडात त्याचे घर होईल. जर तो दशास्वामी वरीलपैकी एकाही स्थानाचा कार्येश नसेल, तर त्याने कितीही प्रयत्न केले तरी त्या दशेत घर होणार नाही.
प्रमोशनसाठी जो दशास्वामी दशमस्थानाचा बलवान कार्येश असेल आणि तो रवी, गुरू, मंगळ यांच्याशी संबंधित असेल तरच त्या दशेत प्रमोशन मिळेल.
काहीवेळा तो दशास्वामी घटना घडविणार्या भावांबरोबर घटनेला विरोध करणार्या भावांचाही कार्येश होतो. अशा वेळेस घटना घडतेय असं वाटतं, पण अचानक त्याला वाईट कलाटणी मिळते. दशास्वामी पंचमभावाचा कार्येश असेल आणि त्याबरोबर चार, आठ या भावांचा बलवान कार्येश असेल, तर त्या दशेत पंचमभावाचे संततीचे फळ तो देईल म्हणजे गर्भधारणा होईल पण तो संततीला विरोध करणार्या चतुर्थस्थानाचा बलवान कार्येश असेल, तर दिवस जातील पण संतती टिकणार नाही. गर्भपात होईल.
नुकतीच एक कटु घटना घडली. अमेरिकेत एक बाई आहेत. त्यांना घर घ्यायचे होते. त्यांच्या यजमानांचा दशास्वामी ४/११ या स्थानाचा बलवान कार्येश आहे. त्यामुळे या दशेत घर होणार हे नक्की. त्यांनी घर पहायला सुरूवात केली. तीन चार घरांची आम्ही प्रश्नकुंडली मांडली. त्यात सर्वात उत्तम कुंडली जी होती ते घर त्यांना घ्यायला सांगितले.
त्यांनी ते घर या आठवड्यात घेतले. तिथे सामान हलवले. आणि त्यांच्या यजमानांचे प्रमोशन होणार होतं, ते होणार नसल्याचं त्यांना कळलं. हे कळल्यावर नुकतेच काही वेळापूर्वी त्यांनी आम्हाला पिंग केले आणि विचारले की, " घर लाभणार होतं, तर यजमानांचं प्रमोशन का नाही झालं?" त्यांच्या बोलण्याचा टोन इतका खटकला की आम्ही लगेच त्यावर लेख लिहायचे ठरवले. जेणेकरून वाचकांच्या मनात कधी असा प्रश्न आला तर त्यांना त्यामागच्या कारणमीमांसेचे आकलन होईल.
घर आणि प्रमोशन या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत. त्यासाठी लागणारी मुख्य स्थाने वेगळी आहेत. घर लाभदायक आहे, म्हणजे प्रमोशनही होईल, विवाहही होईल, संततीही होईल, राजकारणात यश मिळेल, व्यापार व्यवसाय धावायला लागेल असे नव्हे. यापैकी जे जे दशास्वामी देतो आहे तेवढेच होईल.
सुखी माणसाचा सदरा असतो, तसे सुखी माणसाचे घर असले म्हणजे जीवनात सर्व मनासारखेच होईल असे नव्हे.
त्यांच्या यजमानांना चालू असलेला दशास्वामी खालीलप्रमाणे कार्येश आहे.
त्यांच्या यजमानांना सध्या राहुची अंतर्दशा दिनांक ०६/११/२०१० ते २५/०५/२०१३ पर्यंत सुरू आहे. दशास्वामी राहू खालीलप्रमाणे कार्येश होतो.
राहु - ११ नक्षत्रस्वामी शनी १ , ५ , ६ (राहुला दृष्टी नाही)
राहुचा राशीस्वामी चंद्र ३, ११ नक्षत्रस्वामी १ , ४ , ७ (चंद्राची दृष्टी - ९)
दशास्वामीचे वरील कार्येशत्व पाहिले तर तो घर खरेदीसाठी आवश्यक असलेल्या ४ व ११ या स्थानांचा चांगला कार्येश आहे. त्यामुळे या दशेत घर झाले. तसेच तो तृतीयस्थानाचा कार्येश असल्यामुळे राहत्या घरातून नवीन घरात स्थलांतरही दाखवतो.
हा दशास्वामी प्रमोशनला आवश्यक असलेल्या दशमस्थानाचा कुठल्याही प्रकारे कार्येश होत नाही. तर तो नोकरी व्यवसायात नकारात्मक भूमिका घेणार्या पाच व नऊ या स्थानांचा कार्येश आहे.
महादशास्वामी बुध हा दशमाचा बलवान कार्येश आहे. त्यामुळे या महादशेत करिअर चांगले राहीलच. पण प्रमोशनच्या वेळेचा अंतर्दशास्वामी त्या स्थानाचा कार्येश नसल्यामुळे ही अंतर्दशा प्रमोशनला उपयुक्त नाही. कारण वर सांगितल्याप्रमाणे दशास्वामीचा घटनेशी विचारणीय भावाशी संबंध असणे आवश्यक आहे.
त्यामुळे घर झाले, प्रमोशनला विरोध झाला.
प्रमोशनचे जेव्हा घाटत होते, तेव्हा शनीची विदशा सुरू होती. शनीदेखील कुठल्याही प्रकारे दशमस्थान देत नाही. त्यानंतरची बुधाची दशा दशमाशी चांगली निगडीत आहे.
हे आम्ही त्यांना तिथेही सांगू शकलो असतो, पण तुम्हांला समजावे म्हणून हा लेख लिहिला. किमान तुम्हांलातरी हे समजेल आणि घर घेतल्यानंतर नवर्याचे/बायकोचे प्रमोशन न झाल्यामुळे तुम्ही फ्रस्ट्रेट आणि पॅनिक होणार नाही.
धोंडोपंत


6 प्रतिसाद:
कुंडलीचे स्पष्टीकरण देणारा लेख आवडला!
Namaskar Pant,
Many Thanks for a very well written article.
One can sense the 'sad' feeling you have despite your best efforts to provide 'divine guidance' to your 'jataks.'
Unfortunately, many believe that, by paying some money , they can make an astrologer change their destiny to suit their wishes.
Your genuine concern for all is clearly visible and may "Swami Samarth" always bless you with strength to guide one and all..
Best Wishes,
Sandeep Bagalkar
पंत,
उत्कृष्ठ लेख,अत्यंत संयमपूर्वक लिहिलेला दिसतो.
नेहमीच्या शैलीत आणखी चटकदार झाला असता!!!!
धन्यवाद
विजय बुद्धिसागर
नमस्कार पंत, त्या सचिनला काय दशा लागलीय..? च्यायला त्या महाशाताकाची अजून किती वेळ वाट बघायची?
नमस्कार,
नेहमीप्रमाणेच आपल्या खुमासदार शैलीत लिहिलेला हा लेख अप्रतिम.आपल्या लेखांचा शब्दात वर्णन करू शकणारा शब्दकोश निदान माझ्याकडे तरी नाही.महादशा स्वामी आयुष्यात किती महत्वाचा आहे हे समजले.आमच्या वाचकांच्या दशा कुठल्याही असोत ,पण आम्हा ६ लाख वाचकांना जी " धोंडोपंत" नावाची दशा आता आयुष्यभरासाठी लागली आहे ती आम्हाला पदोपदी संकटातून वाचवत आहे,मार्गदर्शन करत आहे.माझ्याशी सगळेच वाचक सहमत असतील अशी आशा करते.आपले असेच मार्गदर्शन आम्हाला उत्तरोतर लाभो आणि देव आपल्याला उदंड आयुष्य देवो हे त्या परमेश्वराजवळ प्रार्थना.
आमच्या वाचकांच्या दशा कुठल्याही असोत ,पण आम्हा ६ लाख वाचकांना जी " धोंडोपंत" नावाची दशा आता आयुष्यभरासाठी लागली आहे ती आम्हाला पदोपदी संकटातून वाचवत आहे,मार्गदर्शन करत
>> Very well said Asmita. Totally agree ! We are blessed with DIVINE GUIDANCE.
Post a Comment