Saturday, January 7, 2012

बोललो ते काही। तुमचिया हिता ॥

॥ श्री स्वामी समर्थ॥

लोकहो,


तुमच्या आवडत्या " धोंडोपंत उवाच" ब्लॉगाची वाचनसंख्या सहा लाखांवर जाऊन पोहोचली. त्याबद्दल तुम्हां सर्वांना धन्यवाद. असाच लोभ असू द्यावा ही विनंती.


ज्योतिषशास्त्राबद्दल असलेले गैरसमज दूर व्हावेत आणि या शास्त्राची महती समाजाला पटावी म्हणून चार वर्षांपूर्वी हा ब्लॉग सुरु केला. ज्योतिष या एकमेव विषयाला वाहिलेला ब्लॉग, त्यातही एका प्रादेशिक भाषेतला ब्लॉग एवढा लोकप्रिय होऊन, वाचकांच्या हृदयसिंहासनावर विराजमान व्हावा, यामागे आमचे कर्तृत्व काही नसून ही परमेश्वराची इच्छा आहे अशी आमची धारणा आहे. 


या ब्लॉगमुळे जगभरात विखुरलेले हजारो लोक आमच्या संपर्कात आले, त्यांच्या समस्यांचे निराकरण आम्ही स्वामीकृपेने करू शकलो, ही आमच्यासाठी फारच आनंददायी घटना आहे. अनेकांना अकल्पित फळे मिळाली कारण आम्ही जे काही बोललो/बोलतो/बोलू ते केवळ शास्त्राच्या आधारे आणि सद्गुरूंवर निष्ठा ठेवून बोललो आहोत. हा सद्गुरूकृपेचा परिपाक आहे. 


शास्त्राधार नसलेल्या गोष्टी वैयक्तिक स्वार्थासाठी कधी कुणाला सांगितल्या नाहीत. त्यामुळे ही गोमटी फळे येण्यामागे, प्रामाणिकपणा हे खत आहे. 


स्वभाव मुळातच फटकळ असल्यामुळे काही लोकांना आमचे बोलणे लागले असण्याची शक्यता आहे. त्यापैकी बहुतेकांनी आम्ही जसे आहोत, तसे आम्हांला स्वीकारले आहे. काही जणांनी मनात अढी धरली. पण शेवटी समस्या आल्यावर पुन्हा आमच्याच गोठ्याची वाट पकडली. काही जण आमच्या फटकळपणामुळे वैर धरून दुरावले. जे दुरावले त्यांना गोंजारायला आम्ही कधी गेलो नाही. कारण 

"बोललो ते काही। तुमचिया हिता॥ "

हीच आमची भूमिका होती आणि आहे, हे त्यांनी लक्षात घ्यावे.जो अप्रिय पण हिताच्या गोष्टी सांगतो, तो खरा मार्गदर्शक, तो खरा हितचिंतक. 


तसेच आम्ही जगात कधीही मुखवटे धारण करून वावरलो नाही. त्यामुळे लेखनात आम्ही जी भाषा दैनंदिन जीवनात वापरतो, तीच आलेली आहे. हे सुद्धा प्रामाणिकपणाला अनुसरूनच आहे. त्यामुळे शिव्या, अपशब्द याकडे दुर्लक्ष करून लोकांनी आम्हांला स्वीकारलेले आहे. जनतेचे न्यायालय हे अंतिम न्यायालय असते. तुमच्या यशापयशाचा, चांगुलपणाचा, कर्तृत्वाचा फैसला ही जनताच करत असते. 


आणि जनतेने तिचा कौल आमच्याबाजूने दिला आहे, असे म्हणण्याची आजची परिस्थिती आहे. अन्यथा आमच्यासारख्या सामान्य माणसाचे जगभरात एवढे कौतुक होण्याचे काही कारण नाही. 


त्यामुळे, जोपर्यंत आम्ही आमचे काम आमच्या पद्धतीने करतोय, तोपर्यंत "कार्य सिद्धिस नेण्यास श्री समर्थ आहेत" हे नक्की. 


अधिक काय लिहिणे? असाच लोभ असू द्यावा, ही विनंती. 


लेखनसीमा.


आपला,
(कृतकृत्य) धोंडोपंत

10 comments:

अनघा said...

Sundar....hi ghod doud ashich pudhe chalu raho ya sadichha!

अमोल केळकर said...

अभिनंदन पंत

Anay Pujari said...

Hardik Abhinandan

Amit Joshi said...

अभिनंदन !!!

अशीच तुमच्या ब्लॉगला प्रसिध्द्दी लाभो, हीच स्वामीं चरणी प्रार्थना.

(स्वामीभक्त)अमित जोशी

Raju said...

आभिनंदन पंत!

Saee said...

Abhinandan!! :)

धोंडोपंत said...

अनघा, अमोल, अनय, अमित, सईबाई

सर्वांना धन्यवाद.

धोंडोपंत

mynac said...

पंत ..अहो !किती वेगात धावतंय तुम्ही ? पण आम्हाला मना पासून आवडतंय ते.आत्ता-आत्ता, परवा-परवा तर तुम्ही चार लाखांचा टप्पा गाठला होता,आणि आम्ही तुमच अभिनंदन करायला आलो होतो नि गम्मत बघा ,ते चाराचे सहा कधी झाले ते आम्हाला कळलं सुद्धा नाही.आपल्याला पुढील वेगवान वाटचाली साठी लाख-लाख शुभेच्छा.

mahesh said...

Abhinandan Pant

Bhagyashree said...

Manapasun Abhinandan Pant!!
Tumche margdarshan saglyana nehmi asech ghadat rahu de...

~Bhagyashree