|| श्री स्वामी समर्थ||
लोकहो,
कुंडलीतील ग्रहयोगावरून व्यक्तीच्या स्वभावाचा अचूक
बोध होतो. पत्रिकेतले ग्रहयोग हे जातकाचं व्यक्तिमत्व सांगत असतात. ते वाचण्याची
आणि समजण्याची बुद्धी ज्योतिर्विदाकडे असणे अत्यंत आवश्यक आहे.
एक गृहस्थ सोबतची कुंडली दाखवायला आले. कुंडलीवर नजर
टाकल्यावर आम्ही त्यांना विचारले की, "कुणाची कुंडली आहे ही?"
ते म्हणाले, " माझ्या बायकोची."
आम्ही त्यांना म्हटलं, " मानलं तुम्हांला बुवा. अशा
विक्षिप्त बाईबरोबर इतकी वर्षे संसार केलात म्हणजे खरतर तुम्हांला सर्वोच्च नागरी
बहुमान द्यायला पाहिजे."
खाली ती कुंडली दिली आहे. गोपनीयतेच्या कारणास्तव नाव
जन्मतपशील दिलेले नाहीत. कुंडलीतील हर्षल, शनी, गुरूच्या स्थितीवरून कुंडली १९५६
सालची आहे, हे या शास्त्राचा अभ्यास केलेला समजू शकेल.
ज्या ज्या कुंडल्यात चंद्राचे हर्षल, मंगळाशी प्रथम
दर्जाचे कुयोग असतात, तसेच बुध, शुक्र रवी बिघडलेले असतात, त्या व्यक्ती मानसिक
दृष्टीने अत्यंत लहरी आणि विक्षिप्त असतात.
स्वभाव प्रचंड तापट असतो, वृत्ती तामसी
असते, कधी काय बिघडेल याचा नेम नाही. संतापावर ताबा मिळवता येत नाही. राग आल्यावर
तोडफोड करण्यापर्यंत मजल जाते. या योगावर शनी,राहु,नेपच्यून यापैकी ग्रहांचा कुयोग
असेल तर मानसिक विकृती असते. मॅनिया, सिझोफ्रेनिया असे मानसिक विकार असतात. शनीचा
संबंध आल्यास सिव्हीयर डिप्रेशनमध्ये जातात.
वरील पत्रिकेत चंद्र दशमात कर्केत हर्षलच्या युतीत आहे. तसेच तो चतुर्थातील मकरेच्या मंगळाच्या प्रतियोगात आहे. मंगळ हर्षलही प्रतियोग आहे. या सर्व योगांमुळे या बाईंचा स्वभाव फारच तापट आणि विक्षिप्त आहे. मकरेचा मंगळ म्हणजे तापता निखारा असतो. आम्ही नेहमी म्हणतो की, या लोकांच्या डोक्यावर लोणी ठेवलं तर ते ही वितळेल.
परिस्थिती एवढ्यावर थांबत नाही. लग्नेश शुक्र अष्टमात केतुच्या युतीत आला आहे. हा मोठा कुयोग आहे. या बाईंच्या अंगात वगैरे येतं होतं का? असं त्यांच्या यजमानांना विचारल्यावर, त्यांनी "क्या बात है पंत" म्हणून सहमती दर्शवली. काही वर्षांपूर्वी यांच्या शुक्रवारी अंगात यायचं. घराबाहेर चपलांचा ढीग जमायचा एवढे लोक यांच्या दर्शनाला यायचे. पुढे सायकिएट्रिक ट्रीटमेंट दिल्यावर ते बंद झालं.
यांच्या विक्षिप्तपणाचा अनुभव त्यांच्या यजमानांनी सांगितला. तो असा की, एकदा या बाईंनी घरात पावभाजी केली होती. भाजीत मीठ थोडं जास्त झालाय असं यांच्या यजमानांनी सांगितल्यावर, या बाईंनी अख्खं पातेलं बीनमध्ये उलटं केलं. भांड्यांची आदळआपट करून अनेक भांड्यांना आणि डब्यांना पोचे आल्याचेही या गृहस्थांनी सांगितले.
मेषेचा रवी आणि बुध. रवि दृष्टीअधिष्ठित केंद्रयोग मकरेचा मंगळ. सिव्हियर मायग्रेनचा त्रास.
लग्नभावाच्या आरंभी नेपच्यून. अत्यंत लहरी स्वभाव. उत्तम काव्यलेखन.
चतुर्थेश शनी राहु युक्त धनात. चंद्राचा चतुर्थेश शुक्र स्वस्थानापासून अष्टमात केतुयुक्त. चतुर्थातल्या मंगळाचा नेपच्यूनशी केंद्रयोग. मंगळ स्वतः कुटुंबेश. या बाईंच्या आईंना अग्निपासून काही त्रास झाला होता का? असे विचारले. या बाईंच्या आई स्वयंपाक करतांना भाजल्या होत्या, हे उत्तर.
कुंडली काय काय सांगत असते, याची ही एक झलक.
आपला,
(विचक्षण) धोंडोपंत



1 प्रतिसाद:
या कुंडलीत स्पष्ट लग्न तूळेत ४ अंशावर आहे. म्हणजे लग्नस्थानाचा जवळजवळ अर्धा भाग कन्या राशीने व्यापला आहे. याचा(ही) काही संबंध स्वभावाशी निगडित आहे का? माझ्या पाहण्यातल्या दोन व्यक्तींच्या पत्रिकेमध्ये असं ५०-५० (जवळपास) कन्या-तूळ लग्न आहे. दोन्ही व्यक्तींचे स्वभाव तसे वेगळे आहेत ते कळण्यासाठी तुम्ही केलंय तसं ग्रहयोगांचं बॅलन्सिंग करावं लागणारच. पण तरी या कन्या-तूळ बॉर्डरवरील लग्न असलेल्या दोन व्यक्ती मनस्वी आहेत आणि तुम्ही वर ज्यांची पत्रिका दिली आहे ती व्यक्ती तापट असायला मनस्वी स्वभाव(ही) कारणीभूत असावा असे वाटते. कृपया या संदर्भात तुमचं काय मत आहे हे सांगाल.
Post a Comment