Wednesday, January 11, 2012

ग्रहयोग - मंगळ प्रतियोग वक्री हर्षल


|| श्री स्वामी समर्थ||

लोकहो,

ग्रहयोग कसे धडधडीत फळे देतात ते काही कुंडल्यांवरून दाखवणार आहोत.

ही कुंडली आहे एका अठ्ठावीस वर्षे वयाच्या मुलाची.


या कुंडलीत द्वितीय स्थान पूर्णपणे बिघडले आहे. द्वितीयात चंद्र ज्येष्ठा नक्षत्रात हर्षलयुक्त आहे. हर्षल वक्री आहे. द्वितीयेश मंगळ अष्टमस्थानात गेला आहे. नुसता तिथे गेलेला नाही तर त्याचा द्वितीयातील वक्री हर्षलशी अंशात्मक प्रतियोग आहे. मंगळ हर्षल प्रतियोग हा आगीशी, रसायनांशी संबंधीत स्फोटक घटना दाखवतो.


चंद्राचा द्वितीयेश गुरू आहे. तोसुद्धा धनस्थानात म्हणजे स्वतःच्या स्थानापासून बारावा आहे. हा गुरु वक्री हर्षलच्या पूर्ण अंशात्मक युतीत तसेच मंगळाच्या अंशात्मक प्रतियोगात आहे. चंद्राच्या द्वितीयातही केतू नेपच्यून हे पापग्रह युतीत आहेत.


सर्वात कहर म्हणजे या कुंडलीचा नवमांश द्वितीयेशही मंगळ आहे.


हा मुलगा अठरा वर्षाचा असतांना याचा उजवा डोळा फटाका डोळ्यात जाऊन गेला आहे.


अपघाताच्या वेळेस केतु महादशा सुरू होती. केतू मूळ नक्षत्रात.


अशी रोकडी प्रचिती पाहिल्यावर या शास्त्राची महती पटते.


आपला,
(अचंबित) धोंडोपंत


2 प्रतिसाद:

Sandeep B said...

Namaskar Pant,

Its always a pleasure reading your thoughtful articles.

You have written many articls in past regarding Rahu and its effects.
Whenever possible, Kindly enlighten readers about Ketu Mahadasha and ketu's karakatwa.

Regards,
Sandeep Bagalkar

mahesh said...

Namaskar Pant,
Its a thoughtful article.

Regards
Mahesh Tawde