Friday, January 27, 2012

ज्योतिषतत्वांची अनुभूती


|| श्री स्वामी समर्थ||
लोकहो,


गेले दोन आठवडे कार्यबाहुल्ल्यामुळे ब्लॉगावर काही लेखन झाले नाही. नेहमीप्रमाणे अनेक जातकांचे आणि वाचकांचे फोन, ईमेल, गुगल निरोपकावर आणि फेसबुकावर निरोप आले की लिहा, लिहा. त्यात अनेक लोक असे आहेत, ज्यांनी ब्लॉगाच्या एकाही लेखाला आयुष्यात एकदाही अभिप्राय दिलेला नाही. पण लेखनाचा आग्रह मात्र हक्काने करतात. म्हणजे अभिप्राय नाही द्यायचा आणि लिहा, लिहा, लिहा, लिहा करायचं. ही कमाल म्हणायची. असो.


आज सुरू करत असलेली लेखमाला ही वैशिष्ट्यपूर्ण आहे. अशा स्वरूपाचे अनुभव ज्योतिषवाङ्मयात कोणी नमूद केल्याचे आमच्या वाचनात नाही. प्राचीन काळी ऋषिमुनींनी ग्रहांची अनेक अद्भुत फळे दिलेली आहेत. अतीशहाण्यांना वरवर पाहता त्यात फोलपणाही दिसत असेल, पण ही ज्योतिषतत्वे ऋषिंनी किती विचारपूर्वक दिली आहेत, आणि ती देतांना तर्कशास्त्राचा किती उत्तम उपयोग केला आहे, हे पाहिल्यास आनंदाने थक्क व्हायला होतं. 


एखादे ज्योतिषसूत्र अभ्यासतांना त्याच्या कारणमीमांसेचा शोध घेण्याची सवय आपल्या अंगी असावे लागते. " हॅऽऽऽ यात काय?" असे म्हणणार्‍यांना त्यातील ज्ञानाची अनुभूती आयुष्यात येणार नाही. ज्योतिषशास्त्र हे युनिव्हर्सल म्हणजे विश्वव्यापी आहे. त्याची अनुभूती जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी येणारच. फक्त ती समजण्यासाठी नव्हे, समजून घेण्यासाठी पूर्वग्रहरहित आणि व्यासंगी दृष्टीकोण पाहिजे. तेवढी प्रगल्भता असेल तरच हे समजेल.


ऋषिमुनींनी ग्रहांची जी स्थानगत आणि भावेशगत फळे दिलेली आहेत, हा ज्योतिषशास्त्राचा प्रांत आमच्यासाठी फारच लोभसवाणा आहे. यात काय मजा आहे, ती नुसते सबलॉर्ड काढणार्‍यांना नाही कळणार. 


प्रत्येक माणूस हा एक नमुना आहे. आणि त्या नमुन्याचे विविध पैलू, त्याच्या व्यक्तीमत्वाचे विशेष गुण व अवगुण, त्याच्या सवयी, त्याच्या लकबी, त्याची विचारसरणी, त्याच्या प्रतिक्रियेची पद्धत, त्याचा दृष्टिकोण, त्याच्या आवडीनिवडी या त्याला लाभलेल्या ग्रहांच्या स्थितीनुसार ठरत असतात. 


 त्यामुळे स्थानगत फळे, भावेशगत फळे अभ्यासणे,  ग्रहांचे आणि राशींचे कारकत्व अभ्यासणे, त्यावर चिंतन करणे आणि त्याचा प्रत्यय त्याच्या पत्रिकेशी ताडून बघून घेणे, हा आत्यंतिक आनंददायी छंद आहे.


त्या ज्योतिषसूत्रांबद्दल पुढील काही लेखात विचार होईलच.


धन्यवाद आणि शुभेच्छा.
धोंडोपंत


13 comments:

R G said...

Ya leka mule mala The Matrix(1) movie chya shewti Neo jasa "activate" hoto ani manus aani ajubajuchya aaivaji.. code kiwa.. "mul tatva" disayla lagtat.. tase tumhi ghari hatat patrika gheun manus aar-paar pahat ahat ase imagination jhale.. ha ha.. :)

Vikram said...

अनेक लोक असे आहेत, ज्यांनी ब्लॉगाच्या एकाही लेखाला आयुष्यात एकदाही अभिप्राय दिलेला नाही. पण लेखनाचा आग्रह मात्र हक्काने करतात. म्हणजे अभिप्राय नाही द्यायचा आणि लिहा, लिहा, लिहा, लिहा करायचं. -- आमची तेवढी योग्यता नाही हो पंत , म्हणून देत नाही अभिप्राय .. आणि योग्य अभिप्राय देण्यासाठी योग्य शब्द सुचत नाहीत अनेकदा .. पण आग्रह करतो म्हणजे वाट ही बघतो आणि वाचतो हे नक्की .. अगदी URL टाईप करून ब्लॉग वर जातो आणि वाचतो .. so लिहीत राहा !!

आपल्या ब्लॉग चा आग्रही वाचक
विक्रम

Vikram said...

अनेक लोक असे आहेत, ज्यांनी ब्लॉगाच्या एकाही लेखाला आयुष्यात एकदाही अभिप्राय दिलेला नाही. पण लेखनाचा आग्रह मात्र हक्काने करतात. म्हणजे अभिप्राय नाही द्यायचा आणि लिहा, लिहा, लिहा, लिहा करायचं. -- आमची तेवढी योग्यता नाही हो पंत , म्हणून देत नाही अभिप्राय .. आणि योग्य अभिप्राय देण्यासाठी योग्य शब्द सुचत नाहीत अनेकदा .. पण आग्रह करतो म्हणजे वाट ही बघतो आणि वाचतो हे नक्की .. अगदी URL टाईप करून ब्लॉग वर जातो आणि वाचतो .. so लिहीत राहा !!

आपल्या ब्लॉग चा आग्रही वाचक
विक्रम

VINE said...

replying always isn't possible
also anonymous is not possible
people have to log in to comment which is little boring

why don't you add g+1 fb+1 tweeter
etc buttons so people can directly
like & share link to it without any procedure

Saee said...

Yay!! navin lekhmalaaa!! :)

Raju said...

वा वा पंत पुढचा लेख लवकर लिहा!
ब्लॉग वर नवीन लेख दिसला की त्या दिवशी पुण्याच्या थंडीत अमृततुल्य मधला गरम गरम स्पेशल चहा पिल्यावर जे समाधान मिळतं तसं वाटतं.

(चहाबाज)राजेश

GHANSHYAM said...

chala pant ale ........... ! pant jara sadhne sambdhi liha please

Abhijit said...

Pudhil lekhachi manapasun vaat baght asato nehemich

Abhijit said...

Pudhi Lekhachi vat manapasun vat baghtoy

sheetal shinde said...

Pant namaskar

Commetn lkihit nahi asa ,mhanalat ani saglyani tyala pratisaad dila. ektar lekh evdhe zakkas astaat ki tynchya yogyatecha pratisaad detach yet naahi mhanje nustach chaan, mast, zabardast...ya saglyanpeksha kahi uchaa asel asa pratisaad dyayla hava.

navin lekh nasle nasle ki kharach chuklya chuklya sarkha watate.

Tumchya navin lekhachi roj roj aturtene vaat pahat asto.

Ani said...

पंत आजकाल तुम्ही काहीच लिहित नाही.. २००९ पासून ते आतापर्यंत सर्वात कमी लेख तुम्ही या महिन्यात लिहिले आहेत..! बहुतेक बरेच काम येत असल्याने बराच वेळ मोजण्यात किवा थप्या लावण्यात जात असावा ..:)

Tushar Kulkarni said...

नवीन लेखाची अतिशय उत्सुकतेने वाट पाहत आहोत !

M.PRASAD said...

अभ्यासपूर्ण माहिती, खुसखुशीत शैलीत,.!
धोंडोपंत, तुमच्या या "धोंडोपंत शैलीचा" मी "पंखा" झालोय,.!
पुहील लेखन वाचण्यास नेहमीच उत्सुक....