Wednesday, February 8, 2012

उचल्यांची उचल

लोकहो,


आज हर्षदा ने एक लिंक पाठवली. ज्योतिषविषयक ब्लॉगाची. ती म्हणाली, " हा माणूस तुमचा शिष्य वगैरे आहे का?" म्हटलं, " मी तर ओळखत नाही असल्या नावाच्या कुणा इसमाला."


ती म्हणाली, " अगदी तुमची स्टाईल चोरून ब्लॉग लिहितोय. अगदी ब्लॉगवरील शीर्षकेही तशी च्या तशी उचलली आहेत." 


सहज म्हणून त्या लिंकवर क्लिक केली. अक्षरश: word to word म्हणतो तसे त्याने  उचलले आहे. अरे, स्वत:ची प्रतिभा वापर ना. उधार-उसनवारी काय करतो. अगदी लेखाचा शेवटही आम्ही आमच्या विशिष्ट पद्धतीने, 


आपला, आणि कंसात विशेषण घालून. 


काय बोलायचं कळत नाही असल्या उचल्यांना. 


साईबाबांसारखे कपडे घालून अनेक साईबाबा म्हणवणारे सभोवती फिरतात, त्यातलाच हा प्रकार आहे. 


त्याला मोडी येत नसावी. नाहीतर त्याने आमच्यासारखी मोडीत मुद्राही वापरली असती,. 


आमचा शिष्य वगैरे कुणाला समजू नका, आणि उचलेगिरी करून लेखन केलेल्या गोष्टीला आमचा वरदहस्त आहे असा भ्रम निर्माण होऊन देऊ नका. हा माणूस इथे आमचा ब्लॉग वाचतो आणि तिथे स्वत:चा ब्लॉग बनवतोय. 


नाही घाटावे लागत। एक शित कळे भात ॥ असे तुकारामाने म्हटले आहे. 


ओरिजनल ते ओरिजनल, तोतये ते तोतये. 


आमच्या जातकांचा गैरसमज नको, म्हणून हे स्पष्टीकरण. 


आपला,
(स्वयंभू) धोंडोपंत8 comments:

R G said...

Saglyat aadhi mhanje.. Swayambhu awadla... :)
Ani mala watta tumhi aslya uchlyanna dum dilach pahije!! Content jar sarkha asel.. tar thobad fodayla harkat nahi!!

Soham said...

आपली लिहिण्याची पद्धत इतकी छान आहे की ती कॉपी करण्याचा मोह होणे हे समजू शकतो.
पण ती स्वतःची शैली आहे असा भास निर्माण करून त्याचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करण्याची वृत्ती पटत नाही.

फिरस्ता said...

Me kadhi blog lihila nahi tyamule nakki mahit nahi. Jya site var ha blog ahe tikde takrar karta yeyil ka?

फिरस्ता said...

Blog lihilya nassalya mule nakki mahit nahi. Jya site var ya uchalyacha blog ahe tikde takrar karta yeyil ka?

अमोल केळकर said...

काय सांगता पंत ??? एक काम करा कॉपी पेस्ट न करता यायचे अनेक HTML कोड मिळतात ते लावा , म्हणजे निदान कॉपी पेस्ट कराता येंणार नाही. आपणास नाही मिळाल्यास मी देतो.
तसेच त्या ब्लॉगची जरा लिंक प्रसिध्द करा. निषेधाचे असंख्य मेल आम्ही पाठवू जेणेकरुन तो ब्लोग बंद करेल

आपला
अमोल केळकर

श्रेया said...

तो दुवा इथे द्या की, सगळे मिळून त्याचा ब्लॉग बंद पाडूया !

abhinav said...

मला ती लिंक पाठवा! मी त्यावर असे प्र(ति)साद देतो कि जन्मात पुन्हा ब्लॉग चा ब उच्चारणार नाही. तुम्ही त्याची दखल घेण्याच्या भानगडीत पडू नका कारण चिखलातल्या डुकराशी कुस्ती जितकी जास्त खेळली जाईल तितकी डुकरालाच मज्जा येते. शिवाय तुम्ही व्यक्तिश: दखल घेणे म्हणजे त्यालाही उगीच मोठेपण मिळेल. सध्या तो देवाची मूर्ती वाहणा-या गाढवासारखा आहे सगळे देवाला नमस्कार करतात गाढवाला वाटते कि त्यालाच नमस्कार होत आहेत. :)

Padmakar said...

नमस्कार पंत,
गाढवाने वाघाचे कातडे पांघरले म्हणून तो वाघ होऊ शकत नाही.
असल्या गाढवांचा त्रिवार धिक्कार. आणि हो त्या ब्लॉगची लिंक पाठवाच आम्हाला आम्ही त्याचा निषेध जरूर करू.