Thursday, February 23, 2012

जातकांचे प्रतिसाद - धोंडोपंता अचूक तुझे भाकीत

॥ श्री स्वामी समर्थ॥
लोकहो,

काही जातक फार मजेशीर पद्धतीत अभिप्राय पाठवतात. काही पत्रातला मजकूर, शीर्षक हे विलोभनीय असतं. नुकतेच परदेशातून आलेले असे एक पत्र. त्यांचे नाव गोपनीय ठेवावे या त्यांच्या विनंतीनुसार आवश्यक ते फेरफार त्यांच्या पत्रातील नावात केले आहेत. त्यांना आमच्या शुभेच्छा. 

from अ ब क 
reply-to
to धोंडोपंत <dhondopant@gmail.com>
date 23 February 2012 19:35
subject प्रतिक्रिया : धोंडोपंता अचूक तुझे भाकीत
mailed-by yahoo.com
Signed by yahoo.com
hide details 19:35 (2 hours ago)
॥ श्री स्वामी समर्थ॥

आदरणीय पंत

सप्रेम नमस्कार,
प्रतिक्रिया : धोंडोपंता अचूक तुझे भाकीत

आम्ही गेल्या दीड वर्षांपासून धोंडोपंतांचे मार्गदर्शन घेतो आहोत. कोणत्याही कठीण समयी निर्णय घेताना धोंडोपंत आठवतात आणि ते सुद्धा तितक्याच आपलेपणाने कधी जन्म/ रुलिंग कुंडलीतील ग्रहस्थिती/ दशा बघून तर कधी प्रश्नकुंडली मांडून योग्य आणि प्रसंगी सडेतोड मार्गदर्शन करतात.

ऑक्टोबर २०११ मध्ये असेच एकदा माझी जन्मकुंडली पाहत असताना पंत म्हणाले २१ तारखेपासून केतूची अंतर्दशा सुरु होते आहे आणि एकंदरीत ग्रहदशेवरून कामाच्या जागेत, स्वरुपात तसेत सहकार्‍यांमध्ये बदल संभवतो आहे. फोन संपल्यावर मी बायकोला म्हटले, बहुधा यावेळी धोंडोपंतांचे भाकीत चुकणार. कारणच तसे होते . मी आफ्रिकेतील एका देशात दोन प्रोजेक्ट्स सांभाळत होतो आणि सध्याच्या स्थितीत किमान ६ महिने तरी मला इथून हलविणे शक्य नव्हते. पण बायको म्हणाली धोंडोपंत म्हणताहेत तर नक्की तसे होईल. पण तरी सुद्धा माझ्या मनात शंका होती.

धोंडोपंत नेहमी सांगतात कि दशेची फळे पहिल्याच दिवशी मिळत नाहीत. तरीसुद्धा मला आलेला अनुभव शास्त्राची आणि धोंडोपंतांच्या अचूक भाकिताची प्रचीती देणारा होता. २१ तारखेला सकाळीच भारतातून माझ्या साहेबांचा फोन आला. आखाती देशातल्या एका प्रोजेक्ट वर इमर्जन्सी असून मला तिथे किमान १ महिना जावे लागेल असे त्यांनी सांगितले. वर इथल्या प्रोजेक्टची काळजी करू नकोस ते आम्ही सांभाळू असेही सांगितले. फोन ठेवला आणि धोंडोपंताना हात जोडले. पुढे व्हिसा  वगैरे सोपस्कार पार पडून १० नोव्हेंबरला मी विमान पकडले. दशा सुरु होऊन २० दिवसांतच धोंडोपंतांच्या भाकितानुसार कामाच्या जागेत, स्वरूपात आणि सहकार्‍यांमध्ये बदल घडून आला. एक महिन्यासाठी गेलेला मी इमर्जन्सी बर्‍यापैकी आटोक्यात  आणून तीन महिन्यांनी परत आलो.
अशा द्रष्ट्या मार्गदर्शकाचे अचूक मार्गदर्शन आम्हाला लाभते आहे ही स्वामींचीच कृपा आहे. धोंडोपंतांच्या ह्या व्यासंगाला आमचा साष्टांग नमस्कार.
आपला नम्र
अ ब क
 Reply
 Forward

1 comment:

Soham said...

Ha Abhipray khupacha aavadala...

Pant kaka,

Abhinandan