Wednesday, February 29, 2012

फेसबुकावर धोंडोपंत आपटे Fan Club ची स्थापना


॥ श्री स्वामी समर्थ॥ 

लोकहो,

श्री. अभिरामपंत साठे यांनी फेसबुकावर " धोंडोपंत आपटे Fan Club" सुरू केल्याचे नुकतेच समजले. नावामागे कुठलेही ग्लॅमर नसलेल्या व्यक्तीचा असा हा पहिलाच फॅन क्लब असावा.

तुका म्हणे माझे, हेचि भांडवल। बोलविले बोल, पांडुरंगे॥ या न्यायाने आम्ही आजपर्यंत विविध विषयांवर गद्य आणि पद्य लेखन करत आलो. त्यात आम्ही किती चांगले हे समाजाला पटविण
्याचा प्रयत्न कधी केला नाही. त्याची आवश्यकता आयुष्यात कधीच भासली नाही.

पण , नाही लागावे घाटत। एक सित कळे भात ....... यानुसार लोकांनी आमचे लेखन डोक्यावर घेतले, ही परमात्म्याची कृपा. आमचे यात काहीही कर्तृत्व नाही, हे अत्यंत विनम्रपणे कबूल करतो.

तुम्ही आम्ही आहोत तसे आम्हांला स्वीकारलेत, यातच सर्व काही आले.

असाच लोभ असू द्यावा, अशी विनंती.

आपला,
(आपला) धोंडोपंत
 ·  · 

1 comment:

अमोल केळकर said...

मस्त , मस्त पंत , केंव्हा भेटूया क्लब मधे ?