Friday, March 16, 2012

गोचरफळे

|| श्री स्वामी समर्थ|| 

लोकहो, 


गोचर भ्रमणाबद्दल काल आमच्या काही विद्यार्थ्यांशी चर्चा केली. ग्रहांची गोचर भ्रमणे हा ज्योतिषशास्त्रातला आमचा अत्यंत आवडता भाग आहे. गोचरीचे ग्रह "केला इशारा जाता जाता..." अशा स्वरूपाची फळे देऊन जातात. गोचरभ्रमणाची फळे निश्चितपणे कोणाला काय मिळतील हे प्रत्येक कुंडलीतील जन्मस्थ ग्रहयोगांवर अवलंबून असतं. कुंडलीतील जन्मस्थ योगांना अव्हेरून गोचरफळे मिळत नाहीत. पण तात्कालीन फळांसाठी, तसेच महादशा- अंतर्दशांवरून कालनिर्णय करतांना, त्याला गोचरभ्रमणाची जोड असेल तर भाकिते सहसा चुकत नाहीत. 


गोचरीची फळे ही चंद्रावरून पहावीत असा दंडक आहे. वर्तमानपत्रात आणि नियतकालिकात जी भाकिते दिलेली असतात ती चंद्रापासून गोचरभ्रमण पाहून दिलेली असतात. त्यामुळे त्याला राशीभविष्य किंवा राशीफल असे म्हणतात. 


आमच्यामते ही पद्धत फारशी अनुभवाला येत नाही. हे वास्तव आहे. हे सत्य आहे आणि अनुभवाअंती निर्माण झालेले आमचे मत आहे. यात मतभेद असू शकतात. पण प्रचीतीगम्यता हा निकष लावून, पूर्वग्रहरहित दृष्टीने जर कोणी विचार केला, तर त्याला आमचे म्हणणे पटेल. 


गोचरफले ही लग्नावरून पहावीत. चंद्रावरून पाहू नयेत. याचा अर्थ चंद्रकुंडलीला अर्थ नाही, असा होत नाही. चंद्रकुंडलीचे महत्त्व आहेच. पण लग्नभावापासून विशिष्ट अंतरावर असलेला ग्रह हा त्या स्थानानुसार फळे देतो हे वास्तव आहे. 


एक गमतीशीर उदाहरण पहा. एखाद्या व्यक्तीच्या जन्मकुंडलीत षष्ठात चंद्र आहे आणि चंद्रापासून गोचरीने तिसरा राहू आला आहे. आता चंद्रावरून जर राहुभ्रमणाचे भाकित करायचे असेल तर तृतीयात राहू. पराक्रमस्थानात राहू आला असल्यास कर्तृत्वाला उजाळा मिळेल, महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले जातील, मोठ्या योजना कृतीत येतील वगैरे भाकिते सांगता येतील. 


पण प्रत्यक्षात तसे होत नाही. प्रत्यक्ष अनुभव असा आहे की, जन्मलग्नाला हा राहू आठवा येतो आणि हा आठवा राहू माणसाला रडवतो. प्रत्येक गोष्टीत अडथळे येतात. एक काम धड होत नाही. हातातोंडाशी आलेले घास काढून घेतले जातात. समोर दिसणार्‍या संधी एकाएकी लुप्त होतात. तब्येतीच्या तक्रारी निर्माण होतात. कुत्रा, साप, विंचू यांचे दंश या काळात होतात. 


म्हणजे चंद्रापासून जी भाकिते होती त्याच्या उलटी फळे मिळाली. त्यामुळे काल आम्ही विद्यार्थ्यांना म्हटले की, गोचरीचा अभ्यास करतांना चंद्रापासून न करता लग्नापासून करायची सवय करा आणि आम्हांला अनुभव कळवा. त्यासाठी आम्ही त्यांना आमचा ताजा अनुभव सांगितला. 


२४ जानेवारीला मंगळ आमच्या लग्नापासून सप्तमात म्हणजे सिंहेत वक्री झाला आहे. तृतीयेश (लग्नापासून) सप्तमात वक्री आहे. गेल्या महिना दीडमहिन्यात या मंगळाने जोरदार फळे दिली आहेत. अत्यंत जवळच्या व्यक्तींशी कारण नसतांना वाद आणि भांडणे झाली आहेत. 


मंगळ हा कलहप्रिय ग्रह असल्यामुळे, कुठे जरा एखादं शुल्लक कारण मिळालं की बसं. लगेच राडा. कारण नाही मिळालं तर हा मंगळ काहीतरी खुस्पटं काढून भांडायला लावतो. एरव्ही आपण ज्या गोष्टी कधीही बोलणार नाही, अशा गोष्टी तो आपल्याकडून वदवून घेतो. सहाजिकच त्यामुळे संबंध बिघडतात. 


आजपर्यंत ज्यांच्याशी अत्यंत स्नेहभावाचे संबंध होते, ते शुल्लक कारणांवरून ताणले गेले आहेत. कटुता निर्माण झाली आहे. मने दुखावली गेली आहेत. त्यामुळे मंगळ मार्गी होईपर्यंत आम्ही गप्प रहाण्याचे ठरविले आहे. तोंड बंद ठेवायचं. कारण खुलासे करण्यासाठी एक फोन केला तरी त्यातून राडे. आपण काहीतरी बोलणार. समोरचे लोक दुखावले जाणार. त्यामुळे, मंगळ मार्गी होईपर्यंत - मौनं सर्वार्थसाधनम् | मंगळ मार्गी झाला की बघू. 


आमचे हे बोलणे ऐकल्यावर विराज म्हणाला, "पंत, हे मीसुद्धा शंभरटक्के अनुभवतोय." 


आम्ही त्याला म्हटले, " कारण तुझेही लग्न कुंभ आहे." 


गेल्या महिन्यात अमेरिकेत प्रोजेक्टवर गेलेल्या एका सॉफ्टवेअर इंजिनियरला आम्ही स्वतः होऊन गुगल निरोपकावर ही कल्पना दिली. त्याच्या पत्रिकेत मंगळ अत्यंत बिघडलेला आहे. त्याची कुंडली आम्हांला पाठ असल्यामुळे, तो गुगलनिरोपकावर दिसताच आम्ही पिंग करून त्याला शांत राहण्यास सांगितले. त्याच्या पत्रिकेत गोचर मंगळाचे दशमातून वक्री भ्रमण सुरु आहे. 


आम्ही त्याला सांगितले की, ऑफिसात गप्प रहा. बॉसशी जमवून घे. कुणाशी राडे करू नकोस. रात्र वैर्‍याची आहे, राजा जागा रहा....... 


त्याने आमचे आभार वगैरे मानले. आमच्या जातकांशी आमचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. गिर्‍हाईक म्हणून आम्ही कुणाकडे पहात नाही. नाहीतर कुठला ज्योतिषी जातकाला स्वतः होऊन सांगेल की बाबा, तुझ्या पत्रिकेत अशी स्थिती आहे. या काळात असा वाग. 


आमचे म्हणणे आचरणात आणण्याचे त्याने अभिवचन दिले. पण मूळ पत्रिकेत बिघडलेल्या आणि दशमात गोचरीने वक्री झालेल्या मंगळाने त्याचे गुण दाखवलेच. 


आमच्या बोलण्यानंतर आठ दिवसांनीच त्याने बॉसशी राडा केला. इतरांना तेवढा पगार आणि मी त्यांच्यापेक्षा जास्त काम करून मला एवढाच का? यावरून त्याने बॉसशी रात्री फोनवर जोरदार राडा केला. दुसर्‍या दिवशी ऑफिसला गेला. आणि त्याला प्रोजेक्टमधून रिलीज केल्याचे बॉसने सांगितले. आता नवीन प्रोजेक्ट पहा नाहीतर वळकटी उचलून भारतात परत या, अशी परिस्थिती आहे. 


ही गोचरफळे. यावर अजून बरेच लिहिण्यासारखे आहे. पुन्हा योग येईल तेव्हा लिहू. 


आपला,
(वक्री) धोंडोपंत 17 comments:

Megha said...

ya goshti jo jyotishya cha abhyas karato tyalach kaltil...aamchyasarkhyana total bouncer.....take it easy.

Saee said...

Ata mazi tube petli. Mangal margi kadhi honar te sangitlach nahit pan!
Dhanyavaad. :)

धोंडोपंत said...

सये,

मंगळ १४ एप्रिलला मार्गी होतोय.

तोपर्यंत माझ्याशी सांभाळून बोल हो :) :) नाहीतर आहे तुला पण बोनस. :)

धोंडोपंत said...

मेघा - धन्यवाद.

Abhijit said...

Je anubhavale te tumhi lihit aahat, ekdam patale. "गोचरफले ही लग्नावरून पहावीत" navin shikayala milale Thank you

vnay raje said...

mazhi raas sudha sivha aahe mala hi 14 april paryant shant rahava lagel aatachi mazhi office chi paristithi thoodi bikat aahe

sheetal shinde said...

pant!!!

jyotishacha abhyas naslyamule bouncer gelay sagla....fakt ata ghari javun sharadchi lagna raas baghte.

Tashi raas tyachi Sinha aahe ani tumhi sangitlyapramane sinha rashila pan mangal vakri aahe .

lagna raas pan baghte aajach!

vnay raje said...

माझी रास सिह आहे मला सुद्धा १४ एप्रिल पर्यंत सांभाळून राहावे लगेल
कारण आताची माझी ऑफिस ची परिस्तिथी थोडी बिकट आहे

Shardul said...

हाच मला ज्योतिषशास्त्राचा सगळ्यात उपयोगी भाग वाटतो.
आयुष्याचा रोलरकोस्टर तर चालूच राहील -
पण मजा तेव्हाच येईल जेव्हा तुमच्यासारखे द्रष्ट्या व्यक्ती एखाद्याला सांगू शकतात की
"बाबारे! आता खाली डोके वर पाय होणार आहेत, तेव्हा तयार रहा.." किंवा -
"आता बघ, सगळ्यात उंच ठिकाणी आहेस, बघ आजूबाजूला आणि आनंद घे.."
आणखी काय ?

Shardul said...

१. एक शंका -
इथे तुम्ही सांगितलेल्या उदाहरणात, राहूची अष्टमातली आणि मंगळाची सप्तमातली गोचर फळे आहेत,
ही पहाताना, हे ग्रह जन्मकुंडलीत कुठल्या स्थानाची फळे देतात त्याचा विचार असतो का ? (जसे, राहू ३, ११ चा कारक आणि गोचरीने अष्टमात..)

२. एक आठवण -
तुम्ही जन्मशनीवरून गोचर शनीच्या भ्रमणाची फळे स्वतंत्र लेखात लिहिणार आहात असे वाचल्याचे आठवते..

Sachin Shirish Kulkarni said...

अश्या वेळेस आमच्यासारख्या मेष लग्न आणि मेष चंद्र वाल्यांची वाट लागते मग. आणि पंत, साडेसाती चंद्रावारूनच पहायची ना ?

Harshada said...

Atishay sundar lekh aahe.Ase lekh vachlle kichch grahanche mhatva patte. Dhnyawad Pant.

Harshada said...

Atishay Sundar Lekh aahe. Asha velles grahanche mhatva patte. Thanks for sharing the information. Dhanyawaad Pant!

आठवणी said...

आवडला लेख....
दैनदिन जीवनाची गाडी रुळावर ठेवताना ...
या गोष्टींचा आणि तुमच्या लेखातून केलेल्या मार्गदर्शनाचा
फायदा नक्कीच आम्हाला होत आहे. त्या बद्दल पंतांचे आभार
स्वामींची कृपा आणि तुमचे मार्गदर्शन असेच सर्वांना लाभत राहो
|| श्री स्वामी समर्थ||

amruta said...

Mala pan anubhav aala guru ji,mazya bahiniche same ... khup vaad khup lokaanshi,mazyashi pan ani amhi abola dharla, then I told my father don't worry we both sisters love each other. kaahi diwsaani normal punha bolu khidalu laagu :-))))

amruta said...

Also wanted to know what is to be considered while reading ?? Mahadaha- dasha-pratyantar or gochar???kashaachi fale adheek miltaat???

Vipul Salkar said...

maza job change vhayala pan ya vakri mangalachach hat asel kay? shashthesh(1) mangal vakri dashamat(5).