Wednesday, April 18, 2012

शनी अमावास्येचा तोडगा.............


॥ श्री स्वामी समर्थ॥
लोकहो,

दिनांक २१ एप्रिल रोजी शनी अमावास्या आहे. साडेसातीचा त्रास ज्यांना होतो आहे, तसेच त्यांच्या पत्रिकेत पापग्रहांवरून शनिभ्रमण सध्या सुरू आहे, किंवा ज्यांना शनी किंवा राहु महादशा वा अंतर्दशा आहे, किंवा आमच्यासारखे जे लोक शनीच्या अंमलाखाली येणारे आहेत, अशा लोकांसाठी हा लेख आहे.

साडेसातीचा त्रास असणार्‍यांनी किंवा वर उल्लेख केलेल्या कुठल्याही प्रकारात असलेल्या लोकांनी, या अमावास्येला शनीमंदिरात जाऊन तैलाभिषेक करावा. शनीचे दर्शन घ्यावे. शनीला काळे उडीद अर्पण करावे. शनीच्या पुराणोक्त वा बीजमंत्राचा जप करावा आणि या त्रासातून सोडविण्यासाठी प्रार्थना करावी. देवळाबाहेर काळ्या रंगाची गाय असेल तर तिला चारा घालावा. जेवणापूर्वी काकबळी काढून कावळ्याला ठेवावा. तसेच आजूबाजूस काळ्या रंगाचा कुत्रा असेल तर त्याला खायला द्यावे. त्या दिवशी शक्यतो काळे कपडे वापरावेत.

शनीमंदिरात जाण्यापूर्वी एका मातीच्या पणतीत गोडेतेल घेऊन, त्यात आपला चेहरा नीट न्याहाळावा. आणि ते तेल एका बाटलीत घेऊन, शनीमंदिरात जी समई लागलेली असेल, त्यात वाहावे.

ते तेल जळले गेले पाहिजे, मूर्तीवर जाता कामा नये, हे लक्षात ठेवावे.

राहु महादशा असलेल्यांनी त्या दिवशी खालील तोडगा करावा. 

सव्वा वार काळे कापड घ्यावे. ( धार्मिक वस्तूंच्या दुकानात हे बरोब्बर सव्वा वार कापलेले मिळते.) मूठभर काळे तीळ घ्यावेत. ( काही लोक सव्वा किलो घेतात. आमच्यामते त्याची आवश्यकता नाही. आमचे आजोबा मूठभर घ्यायला सांगायचे आणि हजारोंना चांगला अनुभव आल्याचा इतिहास आहे. असो.) आणि एक कास्याची वाटी व सात आठ बिब्बे घ्यावेत.  

त्या काळ्या कापडावर कास्याची वाटी ठेवून त्यात काळे तीळ ठेवावेत. त्यात बिब्बे खुपसावेत. घरातल्या कुठल्याही पुरूष व्यक्तीने कापडासकट वाटी उचलून, राहु महादशेचा त्रास असलेल्या व्यक्तीच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा ते उतरवावे. उतरलेली वस्तू कधीही घरात ठेऊ नये. तर ताबडतोब ते घेऊन शनीमंदिराच्या आजूबाजूस एखाद्या झाडाखाली किंवा गावात वाहते पाणी म्हणजे नदी किंवा समुद्र असेल तर त्याखाली ते नेऊन ठेवावे. शनी मंदिरासमोर कुणी गरीब बसलेला असेल त्याला  दान द्यावे. 

काही गावात शनीमंदिर नसतं. अशा वेळेस मारूतीचे मंदिर असल्यास तेथे बसलेल्या गरीब व्यक्तीस  दान द्यावे. 

उतरवलेली वस्तू घराबाहेर गेल्यावर राहुचा त्रास असलेल्या व्यक्तीने राहुच्या बीजमंत्राचा म्हणजेच 


ॐ ऐं र्‍हीं राहवे नमः

या मंत्राचा जमेल तेवढा जप करावा. 

ज्यांना हे त्रास आहेत त्यांनी जरूर अनुभव घेऊन पहावा. राहुमुळे संतती होण्यासंबंधी ज्यांना त्रास असेल त्यांनी दोघांनीही हा तोडगा करावा. गुरू- राहु चांडाळयोग ज्यांच्या पत्रिकेत आहे, ज्यामुळे गर्भधारणा होण्यास विरोध होतो, त्या लोकांनी हा तोडगा करावा.

ती हजारो रुपयांची रत्ने वापरण्यापेक्षा, हे साधे, सोपे आणि स्वस्त तोडगे मोठी कामं करतात, असा आमचा अनुभव आहे. 


आपला,
(सर्वांचे सर्वकाळ भले चिंतणार) धोंडोपंत


महत्वाची बाब- घरातील गर्भवती महिलांवर हे तोडगे करू नयेत. तसेच, अंगावर पिणारे मूल असेल त्या महिलांनीसुद्धा हे करू नये. राहुचे दान उतरविण्याचे काम पुरूषांनीच करावे. 

6 comments:

Sandeep B said...

Namaskar Pant,

Finally your blog readers feel relieved that you are back in action.
This is a typical article from 'Shree Pant' that readers / jataks look forward to.
As always, its a blessing from Shree Swami Samarth which manifests through your medium.

Thanking you for your kind advice,
Sandeep Bagalkar

sheetal shinde said...

पन्त !!!
हज़ार वेळा धन्यवाद् !!!!!!!
काय वेळेत माहिती दीलीत? मी शोधतच होते अस काहीतरी

पण माला कही शंका आहेत . या आधी पण मी त्या विचारल्या होत्या
स्त्रियाना साडेसाती असेल तर ........

1. स्त्रिया शनी मंदिरात जाऊ शकतात का ? नाही जाऊ शकत तर मग स्त्रिया शनीला तैलाभिषेक , उडीद, कसे अर्पण करणार ? की स्त्रियानी सड़ेसतित पूजा करू नये

२. खालील पैकी शनी बीज मन्त्र कोणता आणि पुरानोक्त मन्त्र कोणता?

1."Om pram preem proum sah shanaischaraya namah "
or
2.Nelanjan samabhasam ravi putram yamagrajam
Chaaya martand sambhutam tam namami shanaischaram
३. चेहरा न्याहाळालेल तेल शनी ऐवजी , मारुतीच्या मंदिरातील समई वाहिल तर चालेल का ?
४. शनी मंदिर नसेल तर तेल, तीळ, उडीद , मारुतीच्या मंदिरात वाहिले तर चालेल का?
प्लीज़ हे सांगाल..कारण मग जवळ शनी मंदिर कुठे आहे ते शोधाव लागेल म्हणून विचारले .

कळावे
आपली विश्वासु
शीतल शिंदे

Soham said...

एकाच दिवशी २ लेख !! वाह ! धन्यवाद !
तुमची सुट्टी असेल शनिवारी !!! मजा आहे !!!

Soham said...

एकाच दिवशी २ लेख !! वाह ! धन्यवाद !
तुमची सुट्टी असेल शनिवारी !!! मजा आहे !

sheetal shinde said...

Pant Please reply dyana .

Khup confusion aahe .

Regards
Sheetal

Vipul Salkar said...

नमस्कार पंत,
पूर्वी हा लेख वाचला होता, यावेळेला तोडगा केला. सध्या शनि महादशा चालू आहे.

विपुल.