Saturday, July 21, 2012

जातकांचा प्रतिसाद - नोकरीतील बदल

॥ श्री स्वामी समर्थ॥

लोकहो,


विशालच्या जॉब बदलाच्या भाकिताबद्दलचा त्याचा आलेला हा अभिप्राय.


विशालला नवीन जॉबसाठी शुभेच्छा.


vishal 
00:45 (14 hours ago)to me

नमस्कार पंत !

८-१० दिवसांपूर्वी फोन केला होता पण त्यावेळी तुम्ही गाडी
चालवीत असल्याने नंतर करायला सांगितला, घाई-गडबडीत 
लिहायचे सांगायचे राहून गेले होते. 

पण आपण केलेल्या भाकिताचा प्रत्यय कसा आला हे 
कळविण्यासाठी आज हा पत्रप्रपंच करीत आहे.  

२ महिन्यापूर्वी मी आपल्या नोकरीतील स्थिती / बदला
संबंधित प्रश्न विचारला होता, त्यावर तुम्ही सांगितले होते की

१) cost cutting /man power cutting / salary delay असे प्रश्न 
असले तरी नोकरी जात नाही 

२) १/२ जूनच्या सुमाराला जॉब शोधायला सुरवात कर, 
तिसऱ्या आठवड्यात ऑफर मिळणार. 
पुढे सगळे चांगले आहे.  

मी हाताळतं असलेला प्रकल्प, आर्थिक बाबींची जबाबदारी  
आणि माझे MD/ Management बरोबरचे संबंध यात 
नोकरीला काही होत नाही हे नक्की होते आणि पंतांनी 
हेच परत नक्की केले.  

आता पश्न जॉब चेंजचा, मे अखेरीलाच प्रयत्न सुरू केले आणि 
१ जूनला दोन ठिकाणाहून ईंटरव्हू नक्की झाले होते,  पण नेमके 
याच वेळी ऑफिसच्या  कामानिमित्त २ दिवस दिल्लीला जावे 
लागले, मनात म्हटलं आता काय खरं दिसत नाही गेलं सगळं 
मुसळ केरात. पण दिल्लीच्या दोन्ही मीटिंग एकाच दिवशी 
उरकल्या आणि त्याच दिवशी मुंबईला परत आलो. 

२ तारखेला दोन्ही इंटरव्हू झाले आणि दोन्ही कडे ऑफर 
मिळाली एक मुंबईत आणि एका सौदीला- रियाद / मदिनाला, 
मुंबईची ऑफर जास्त चांगली होती म्हणून स्वीकारली.  

पण राजीनाम्याचा प्रश्न तसाच होता.... प्रोजेक्ट,  
Management यांचे कसे करू म्हणून ऑफर हातात 
असूनही राजीनामा दिला नव्हता. 

जून तिसर्‍या आठवड्यात पुण्याच्या प्रोजेट करता प्रमोशन 
ऑफर करून बंगळुराला बोलवणे आले. दोन-तीन दिवस काम 
झाल्यावर last दिवशी MD कडे राजीनाम्याचा विषय काढला, 

तासभराच्या चर्चेनंतर काही अटी, लॉग टर्म रिलेशन आणि  
handover ची चर्चा झाल्यावर विषय मोकळा झाला. 

या आठवड्यात नवीन कंपनीत good पोझीशन आणि 25% hike 
घेऊन रुजू झालो. 
मागचे handover पुढच्या आठवड्यात आहे. ...... 

पंत तुम्ही केलेल्या भाकिताचा अनुभव परत एकदा आला 
आणि पुन्हा एकदा मार्गदर्शनाबद्दल मनपूर्वक  धन्यवाद !!! 

thank you, with best regards,
vishal  
Click here to Reply or Forward

No comments: