Sunday, July 8, 2012

येत्या काही दिवसातील प्रमुख अशुभ ग्रहयोग......


|| श्री स्वामी समर्थ||
लोकहो,


येत्या काही दिवसात होऊ घातलेल्या, ग्रहांच्या दोन कुयोगांबद्दल तुम्हाला माहिती मिळावी, म्हणून हा लेख.


आपल्याला माहीत असेल की, मंगळ कन्येत आलेला आहे. आणि तो शनिच्या अधिकाधिक जवळ येतो आहे. मंगळाच्या समोर मीन राशीत हर्षल आहे. आज हर्षल मीनेत १४ अंशांवर आहे आणि मंगळ कन्येत ०८ अंशांवर.


दिनांक १९ जुलै २०१२ रोजी, म्हणजे अजून ११ दिवसांनी हे दोन ग्रह अंशात्मक प्रतियोगात येतील. 


मंगळ-हर्षल प्रतियोग हा एक मोठा कुयोग आहे. अपघात, आगी, स्फोट हे त्याचे मुख्य फळ आहे. आत्मघातकी कारवाया या काळात होतात. खून, मार्‍यामार्‍या, लूटमारीतून मृत्यू यांचे प्रमाण या काळात वाढते. 


त्यामुळे या काळात जागरूकपणे राहणे गरजेचे आहे. नको तिथे प्रवासाला जाऊ नये. पेट्रोल पंप, विद्युत टॉवर्स, रसायने घेऊन जाणारे टॅंकर्स यांच्या जवळ गाडी उभी करू नये. तसेच रस्त्यातून वावरतांना आपल्याच तंद्रीत असू नये.


वैयक्तिक पातळीवर विचार करता, ज्यांच्या पत्रिकेत मुळात मंगळ हर्षल अशुभयोग आहे, त्यांना त्याची जोरदार फळे मिळतील. हा योग माणसाला "प्रोव्होक" करणारा आहे. अनेकांशी भांडणं या काळात होतात. चिडचीड वाढते. एक अशांती, खळबळ याचे वातावरण अनुभवायला येते. ऑफिसमध्ये डोकं शांत ठेवा. कुणाशी राडे करायला जाऊ नका. आपण बरं आपलं काम बरं, असं लायनीत जगा. ज्या भानगडींशी आपला संबंध नाही, त्यात मध्यस्थी करायला जाऊ नका. एखादा त्यातूनच तुमच्यावर खुन्नस काढण्याची शक्यता असते. 


या काळात महिलांनी स्वयंपाकघरात गॅस, मायक्रोव्हेव अशा गोष्टी वापरतांना फार काळजी घ्यावी. विद्युत उपकरणे जपून हाताळावीत. विद्युत उपकरणे सुरू करण्यापूर्वी हात ओले नाहीत ना, याची खात्री करावी. 


त्या भिकारचोट पाण्याच्या इस्त्र्या हल्ली निघालेत. त्या फार जपून वापराव्यात. 


आत्ताच्या या योगात दोन अशुभ गोष्टींची भर पडली आहे. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे हा योग शनीच्या जवळ होत आहे. ही गोष्ट कुयोगाची तीव्रता वाढविणारी आहे. तसेच, हा योग नेपच्यूनच्या षडाष्टकात पडतोय. मंगळ नेपच्यून षडाष्टक असतांना, मंगळ हर्षल प्रतियोग तो ही शनिसोबत, ही ग्रहस्थिती गंभीर आहे. नुकतीच मंत्रालयाला लागलेली आग ही मंगळाच्या आगमनाची नांदी म्हणावी लागेल. 


तेव्हा काळजी घेणे आवश्यक आहे. कुंभ लग्नाच्या लोकांसांठी द्वितीय अष्टमातून हा योग होतोय. त्यांना तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. तसेच कन्या लग्नाच्या लोकांना लग्न-सप्तम या स्थानातून हा योग होतोय. त्यांनीही जपून रहावे.


हा योग संपतो न संपतो तोच दिनांक १७ ऑगस्ट रोजी शनी मंगळ युती होणार आहे. हा एक प्रचंड वाईट योग आहे. 


याबद्दल आम्ही पूर्वी ब्लॉगावर लिहिले होते. ते लेख आर्चिव्हमध्ये मिळतील. साधारण चार वर्षांपूर्वी गुरूपौर्णिमेला हा योग होता आणि त्याच दिवशी मुंबईत बॉम्बस्फोटाची मालिका झाली होती, हे तुम्हांला आठवत असेल.


शनी मंगळ युती ही अपघातप्रवण आहे. मोठे मोठे अपघात, स्फोट, मनुष्य आणि वित्तहानी, हाडांची दुखणी अशा घटना या काळात घडतात. 


मीन लग्नाला ही युती अष्टमात येतेय. लै बेकार योग आहे हा त्यांच्यासाठी. तसेच तुळ राशीच्या लोकांना मुळात ऐन साडेसाती असतांना, जन्मस्थ चंद्रावर होणारी ही शनी मंगळ युती तापदायक आहे.


असे एकामागून एक धडधडीत कुयोग पाहिले की, काय होणार याची चिंता वाटणे स्वाभाविक आहे.


लोकहो, काळजी घ्या. जपून रहा. एवढेच सांगणे.


आपला,
(सावध) धोंडोपंत


14 comments:

VISHWANATH KULKARNI said...

पंत, एवढे जर धडधडीत कुयोग असतील,तर जपून तरी कसे राहावयाचे? आता परत मुंबईत बॉम्बस्फोट होणार असेल तर लोकांनी बाहेरच पडावयाचे नाही कि काय? आपण गाडी अगदी व्यवस्थित चालवू हो... पण समोरूनच जर एखादा जोरात आदळला तर आपण काय करणार?

Sunil Nayakwadi,Thane said...

Pant,very thankful for awareness you crated among all of us by taking into consideration Mangal-Shani-Harshal-Neptune combinations.
These combinations are really life threatening..!!! But the best part is that Current Guru(Jupiter) is in the Taurus sign & Jupiter having 5th aspect on the combination of Mars-Saturn,which will definitely relax/reduce or eliminates the dangerous effect of combination of Mars-Saturn at very extent.
Thank you once again,Pant..!!
Sunil Nayakwadi,Thane.

आठवणी said...

जागरूक केल्याबद्दल आभार पंत,
असे मार्गदर्शन मिळाल्या बद्दल आभार पंत

VISHWANATH KULKARNI said...

माझ्या कुंडलीत अष्टम स्थानात मंगल-हर्शल युती आहे, पत्नी तुळ राशीची असून तिचे कन्या लग्न आहे, आणि माझी रास कन्या! काय काय वाढून ठेवले आहे? त्यातून मी सध्या अनेक शारीरिक,आर्थिक अडचणीतून जात आहे, परंतु दत्त महाराजांची कृपा आहे म्हणून आनंदी आहे! तेंव्हा मी काय काळजी घेउ?

Vikram Bapat said...

Pant he yogachi tivrata kadhi paryant asel he pan sanga ki.

Vikram Bapat said...

Pant he yogachi tivrata kadhi paryant asel he pan sanga ki.

वरुणराजे said...

Pant 1 July chya divashi pan asa kahi kuyuog hota ka ?

tya divashi mazya olakhitalya 2 lokanche car accident zale aahett.

sheetal shinde said...

Pant he yogachi tivrata kadhi paryant asel he pan sanga na

ravindra said...

thank u pant

ravindra said...

dhanyawad pant

संकेत said...

सावध केल्याबद्दल धन्यवाद!

sheetal shinde said...

Pant

Aajchya Prahar paper madhe aaleli hee batmi. Ghatna ghadli to war pan Mangalwar

Vasaila zalela chemical cha chotasa
sphot he pan tya Mangal Harshal pratiyoga mule zaleli ek ghatana asu shakte ka?


Sheetal

Sandip SS said...

aajach 2 baatmya paahilya
1) Kasara Local aani Vidarbha Express Accident near Kasara
2) Metro Train Bridge Collapse near Wadala

sheetal shinde said...

Pant hya yogachi tivrata kadhi paryant asel he pan sanga na ?

Pls pls