Friday, August 17, 2012

एका सेकंदात भविष्यकथन.......


|| श्री स्वामी समर्थ||
लोकहो,

अमावास्या संपून काम सुरु करण्यापूर्वी हा अजून एक लेख तुमच्यासाठी लिहितोय. आजच्या दिवसातला तिसरा :)

नंबरावरून एका सेकंदात केलेल्या भविष्यकथनाबद्दल बरेच महिन्यात लेख लिहिलेला नाही, याची जाणीव काही जातकांनी करून दिली आहेच. हा जातकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. गेल्या काही दिवसातले अनुभव.

१) " ती" "हो" म्हणेल का? असा प्रश्न दयाशेठच्या हॉटेलात एका मुलाने विचारला होता. प्रश्न फार गांभीर्याने विचारला नव्हता. कारण तसे असते तर हॉटेलात विचारला नसता. त्यामुळे प्रश्नकुंडली वगैरे मांडायची गरज नव्हती. आम्ही त्याला नंबर द्यायला सांगितले. त्याने ५०५ नंबर दिला. 

या नंबराची उपपत्ती कशी लावायची? याचा आम्ही विचार करत होतो. अशाच प्रश्नाला पूर्वी एकाने ५० नंबर दिला होता, त्याला प्रेमप्रकरणात यश मिळणार नाही, असे आम्ही सांगितले होते आणि तसेच झाले होते. ५०५ ला काय लॉजिक लावायचं? हा विचार करत होतो. 

यात पाच च्या पुढे शून्य म्हणजे प्रेमप्रकरणात नकार, प्रेमप्रकरणाची निष्पत्ती शून्य इतपत ठीक आहे. पुढे पाच आहे त्याचे काय? हा विचार करत असतांना, सप्तमाचे लाभस्थान पाच हा संकेत मिळाला. म्हणजे "ती" जी कोणी आहे तिची मैत्रिण. 

आम्ही त्याला म्हटले, ती नाही म्हणेल आणि त्याचे कारण तिच्या मैत्रिणीने तुझ्याबद्दल काहीबाही सांगितलेले असेल.

तो म्हणाला, " च्यामायला, पंत हे पण कळतं तुम्हांला?" म्हटलं, " म्हणजे?" तो म्हणाला, " अहो, हे अगदी असचं आहे. तिला मी आवडतो. पण तिची जी खास मैत्रिण आहे, ती तिला माझ्याबद्दल काहीतरी निगेटिव्ह मनात भरवत असते. यावरून त्या मैत्रिणीचा आणि माझा दोनदा राडादेखील झाला आहे. "

२) गेल्या महिन्यात १७ जुलै रोजी संध्याकाळी आमचे एक ज्योतिर्विद स्नेही रानडे रोडवर भेटणार होते. आम्ही त्यांना भेटायला निघालो असतांना, पवारांच्या सलूनसमोरून जात होतो. त्या बाजूने जातांना सलून मध्ये डोकावायचं. जरा वाईच भांग पाडायचा, पावडर वगैरे लावायची, मालकांशी दोन शब्द बोलायचं, तिथे जिमी नावाची त्यांची मांजर असते, तिला कुरवाळायचं आणि पुढे जायचं, असा कार्यक्रम असतो. 

तिथे एक गृहस्थ भेटले. आमच्या विभागातील एकाला त्यांनी काही पैसे दिलेत आणि ते परत करायला तो गेले काही महिने त्यांना तंगवतोय, अशी स्थिती आहे. त्यांनी विचारलं, "पंत, त्या भडव्याला आता भेटायला जातोय. देईल का काही पैसे? का आजचीही खेप फुकट. नुसती बोलाचीच कढी, बोलाचाच भातं?" 

आम्ही त्यांना नंबर द्यायला सांगितले. त्यांनी ६६ नंबर दिला. कुंडलीतील सहावे स्थान हे रिकव्हरीचं स्थान. समोरच्या व्यक्तीचं व्ययस्थान. या नंबरात दोनदा सहा आला आहे म्हणून म्हटलं, 

" आज सोडू नका भानचोदला. अपेक्षेपेक्षा डबल पैसे मिळतील." 

ते म्हणाले, "बसं. आज घेतोच त्याला आडवा."

रात्री त्यांचा एसएमएस आला. तुम्ही सांगितलतं, त्यानुसार त्याला जरा दमात घेऊन लावून धरलं प्रकरण. आधी म्हणाला पाच हजार देतो आज. पण दहा हजार घेऊन आलो.

३) हाच ६६ नंबर अमेरिकेतल्या एका जातक मुलीने दिला होता. भारतीय वेळेनुसार रात्री तिचा फोन आला, तेव्हा आम्ही संगणक बंद केलेला होता. तिचा आयबीएम मध्ये त्या दिवशी ईंटरव्हू होता आणि ईंटरव्ह्यूला जाण्यापूर्वी "पंतकाका, आशीर्वाद द्या" हे सांगायला तिने फोन केला होता. 

आम्ही तिला सुयश चिंतले. मग तिने तो ठेवणीतला प्रश्न विचारला, " काका, मला हा जॉब मिळेल का?" :) :) :)

तिला म्हटलं, नंबर दे. तिनेही ६६ नंबर दिला. 

म्हटलं, " नक्की मिळेल. अजिबात काळजी करू नकोस. दोन ठिकाणी काम होईल." :) :)

तिचा विश्वास बसला नाही. ती म्हणाली, " काका, मला बरं वाटावं म्हणून तुम्ही काहीतरी सांगताय."

म्हटलं, "बघ तू, दोन ठिकाणहून कॉल येतात की नाही ते."

आणि अगदी तसचं झालं. आयबीएम ची ऑफर आलीच पण तिने दुसर्‍या एका लहान कंपनीत इंटरव्ह्यू दिला होता तिथूनही तिला कॉल आला.

आपला,
(अंकशास्त्री) धोंडोपंत 


5 comments:

Praphulla Deshmukh said...

नमस्कार पंत ,
तुमचे तीनही लेख खूप आवडले . खूप दिवसांनी तुमचे लेख वाचायला मिळाले खूप छान वाटले . आशा करतो नवीन लेख लवकरच वाचायला मिळेल .

Praphulla Deshmukh said...

नमस्कार पंत ,
तुमचे तीनही लेख खूप आवडले . खूप दिवसांनी तुमचे लेख वाचायला मिळाले खूप छान वाटले . आशा करतो नवीन लेख लवकरच वाचायला मिळेल .

Vishakha Mashankar said...

पंत !! दिल खुश !! सॉलिड !!

Marco's family and friends said...

Dear Dhondopant,

Looks like your friend got a job in IBM. Please do share her name or let her know mine - Nanda Joshi. I too work for IBM. May be can start "Dhondopant Fan Club". We have so many social SIGs within IBM.

Nanda

mahendra said...

may i know your contact number.