Monday, October 29, 2012

कोजागरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...............

॥ श्री स्वामी समर्थ॥

लोकहो,

कोजागरी पौर्णिमेच्या तुम्हां सर्वांना हार्दिक शुभेच्छा.........

कोजागरी म्हणजे--- को जागर्ति??? कोण कोण जागे आहे?, असा प्रश्न महालक्ष्मी त्या रात्री येऊन विचारते. जो जागा असेल त्याला वैभव देते. झोपलेल्यांना ते मिळत नाही, अशी मोठी रंजक आख्यायिका आहे. 

ज्योतिषशास्त्रीय दृष्टीने आजच्या पौर्णिमेला विशेष महत्व आहे. चंद्र या पृथ्वीच्या सर्वात जवळ आज असतो. आजच्या पौर्णिमेचा चंद्र सर्वात मोठा दिसतो.

आज रात्री खालील गोष्टी करा.......

लक्ष्मी आणि इंद्रपूजन - लक्ष्मीमातेची आणि इंद्राची पूजा आज करावी. या पूजेनंतर देव आणि पितरांना नारळाचे पाणी आणि पोहे यांचा नैवेद्य दाखवा.

आकाश दीपदान - आकाशाला दिव्याने ओवाळणे, लक्ष्मीच्या आगमनासाठी दिव्यांची आरास करणे

नवान्न प्राशन - नवीन धान्य (पोहे)  भक्षण करणे. आजपासून नवे तांदूळ वापरायला सुरूवात करावी. हे शहरातल्या लोकांना किती समजेल ते कोडचं आहे. असो.

आग्रयण - ज्येष्ठ अपत्यास आज ओवाळावे. त्याला स्नान घालून, पक्वान्नाचे भोजन करावे. त्याला ओवाळावे. हा त्याचा मान आहे. 

दूध आटवून त्यात केशर, बदाम इत्यादी पदार्थ घालून त्याचे प्राशन करावे आणि मग मौजमजा करावी. 

आपल्या परंपरा उदात्त आहेत, तसेच सामाजिक आनंदवृद्धी करणार्‍या आहेत.

हे असं का? हा नीरस प्रश्न ज्याला पडतो, त्याचे उत्तर हेच की, हे असे... कारण हे असेच. 

आपला,
(सनातनी) धोंडोपंत 3 comments:

Shardul said...

आता जरा पहिल्यासारखे वाटत आहे.. :)
मस्त लिहिले आहे.

Shubhangi Zarapkar said...

Jaroor he sarva karoo.
dhanyawad.

amruta said...

Attach ghari aale shoot warun.. Baki Jamel nahi pan garam badaam dudh prashan kele hehehe... Jokes apart sir ... Like ur sanatani approach by spread awareness for the. Preserverence of our culture