Saturday, October 27, 2012

जन पळभर म्हणतिल हाय हाय.............

॥ श्री स्वामी समर्थ॥

लोकहो,

आम्ही फेसबुक सोडल्यावर ज्यांनी फोन, इमेल, गुगलटॉक यावर संपर्क साधून, पुन्हा तिथे येण्याचा आग्रह केला, त्यांच्या प्रेमाबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत. 

पण फेसबुकावर जाणारा अनुत्पादित वेळ ही मोठी समस्या आहे. त्यामुळे आम्ही तूर्तास तरी तिथे येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. खूप कामे आहेत. ब्लॉग लेखनासाठी वेळ देणेही आवश्यक आहे.

आम्ही तिथे नसल्यामुळे त्यांना खूप खिन्न आणि उदास वाटेल, फेसबुक सुनंसुनं होईल, जावसचं वाटणार नाही वगैरे गोष्टी भावनिक आहेत आणि त्या अल्पकाळ टिकणार्‍या आहेत. 

जगात कुणाचं कुणावाचून अडत नसतं, हे वास्तव आहे. आणि आमच्यावाचून कुणाचं अडावं, एवढे मोठे आम्ही नक्कीच नाही. आम्ही तिथे नसलो तर काही दिवस काहींना चुकल्यासारखे वाटेल, पुढे सवय होईलच. भास्कररावांनी म्हटले आहेच ना? 

जन पळभर म्हणतिल हाय हाय
मी जाता राहील कार्य काय ?

आणि जीमेल, फोन, गुगल निरोपक, प्रत्यक्ष भेट याद्वारे आपला संपर्क असेलच. स्नेह अबाधित आहे, फक्त माध्यमात बदल झाला आहे. त्यामुळे आम्ही फेसबुकावर नाही, ही गोष्ट मनाला लावून घेण्यासारखी नाही. 

आपला,
(मैत्रेय) धोंडोपंत

3 comments:

Dattatraya Dange said...

मूल्यवान लेखनास प्राधान्य हे खरेच स्तुत्य!
Right move on all counts!!!

sheetal shinde said...

Agdi barobar aahe Pant tumcha !!!

ektar kami vel aani ikde tikde chohikade thoda thoda lihinyapeksha je kahi aahe te blog war lihinech bare.

Mahendra Kulkarni said...

जेंव्हा फेसबुक नव्हतं, तेंव्हाही मित्र मैत्रिणी होत्याच की! काही फरक पडत नाही, उलट कामासाठी जास्त वेळ मिळतो, आणि ्जास्त लक्ष लागतं कामा मध्ये.