Saturday, October 27, 2012

फेसबुकमुक्त जीवनाचे काही फायदे, तोटे.........

॥ श्री स्वामी समर्थ॥

लोकहो,

फेसबुकमुक्त जीवनाचे काही फायदे-

१) वेळेची बचत. 

२) बुद्धिनिष्ठ लेखनाला मिळालेला वेळ. वेळेचा सदुपयोग

३) नको ते लोक मित्र म्हणून मिरवायला न लागणे.

४) नको त्या कविता वाचण्यापासून सुटका

५) तिथे नसल्यामुळे अभिप्राय न दिल्यास कुणी राग धरत नाही.

६) काही निर्बुद्ध प्रतिभावंतांना वृत्त शिकविण्यातून होणार्‍या त्रासातून सुटका

७) नको ती थोबाडं समोर न दिसणं

८) सकाळ झाल्याझाल्या शुभ प्रभात आणि रात्री गुडनाईट करण्याच्या ड्यूटीतून सुटका

९) आपल्या पोस्टवर आणि कवितांवर आलेल्या मूर्ख अभिप्रायांना रजा

१०) द्वेष, मस्तर करणार्‍या राजकीय व सामाजिक भाष्यातून होणार्‍या अप्रस्तुत उद्दीपनातून सुटका.

११) वाढदिवसाचे संदेश पाठविण्यातून मुक्तता.

१२) स्टेटस आणि साहित्य चोर यापासून  दूर.

१३) फेसबुक चॅटिंगमधील, "काय जेवलात का?" आणि " बाकी काय म्हणताय?" या कंटाळवाण्या प्रश्नातून मुक्तता. 

अजून काय लागतं, आनंदात जगायला?

फेसबुकमुक्त जीवनाचे काही तोटे.............

१ ते १००) काही अत्यंत जिवाभावाच्या लोकांशी तुटलेला संपर्क..........  ही खूप बोचरी गोष्ट आहे.

काही अतिशय चांगले मित्र आणि मैत्रिणी फेसबुकावर मिळाल्या. 

फेसबुकावर पुन्हा जाऊ ते केवळ त्यांच्यासाठी. 

आपला,
(संमिश्र) धोंडोपंत 


5 comments:

Sandeep B said...

Namaskar Pant,

Shree Swami Samarth.

Undoubtedly, facebook is an addictive medium. A celebrity like you would certainly invite unwarranted followup from unwanted netizens. This would certainly disturb you for sure.
Secondly, personalities like you who are a treasure of knowledge are blessed by the almighty to help other human beings who are seeking divine help.
So every moment of your time utilised towards this yomen service and for furtherment of the divine science of astrology is like your worship to God.

Yours sincerely
Sandeep Bagalkar
Jagdish Bhawsar said...

फार चांगले झाले पंत , कि तुम्ही फेसबुक मधून निवृत्ती घेतली...काही दिवसांपूर्वी आपण फेसबुकवर तुमच्या निवृत्ती विषयी लिहिले होते...पण तुम्ही फेसबुक मधूनच निवृत्ती घेतली ..अभिनंदन...!!

अभिनव फडके said...

नमस्कार पंत !
आपल्याच होम-ग्राऊंडवर आपले दणदणीत पुनरागमन पाहून अत्यंत हर्ष झाला. सकाळी आपल्या ब्लॉगवर आपले विद्वत्ताप्रचूर व नविनतम लेख वाचून दिवसाची सुरुवात व्हायचे दिवस पुन्हा आलेत. आपल्याला शुभेच्छा ! (आणि आमचे स्वत:चे स्वत:लाच अभिनंदन!)

का.आ.
अभिनव

Mahendra Kulkarni said...

काही दिवस चुकल्यासारखे वाटते, पण नंतर मात्र अजिबात आठवणही येत नाही. एकदम मोकळं वाटतं पहा.

धोंडोपंत said...

सर्वांना धन्यवाद. पंत खरे आहे.